फ्रेंच कंपनीने म्हाडा वर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील नुकतेच काही मंत्र्यांचे खाजगी सचिव फिक्सर आहेत अशी वाच्यता केल्याने भारतीय यंत्रणेतील लाचखोरी पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आलेली आहे .
"टोकाची दांभिकता " हा भारतातील प्रशासकीय व्यवस्था , राजकीय व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था या सर्वांच्या रक्तात भिनलेला आहे .
" भ्रष्टाचार मुक्त कारभार , पारदर्शक कारभार " अशा दिल्या जाणाऱ्या घोषणा देखील 'दांभिकतेचाच " अविष्कार आहे याची प्रचिती सातत्याने येते आहे . लोकशाहीच्या सर्वच स्तंभाच्या डीएनए मध्येच 'दांभिकता ' ढासून भरली गेलेली असल्यानेच लोकशाहीचे सर्व स्तंभ 'भ्रष्टचाराला हद्दपार 'करण्याच्या घोषणा करून देखील भ्रष्टाचार देशव्यापी झालेला असून तो सुखनैवे नांदत आहे हे कटू वास्तव आहे .
ज्यांनी व्यवस्थेतील लाचखोरी , भ्रष्टाचार हद्दपार करणे अभिप्रेत आहे त्याच प्रशासनाला , राज्यकर्त्यांना तो प्राणप्रिय आहे त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत, लाचखोरी मुक्त भारत हे स्वप्न पूर्णत्वास जाणे नजीकच्या भविष्यात तरी संभवत नाही हे कटू वास्तव आहे .
खरे तर 'हातच्या कंगनाला आरसा कशाला ' या म्हणीप्रमाणे भारतीय लोकशाही यंत्रणेत लाचखोरी , भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे हे दाखवण्यासाठी वा समजून घेण्यासाठी फ्रान्स सारख्या देशाने आरोप करण्याची आवश्यकता असत नाही . तलाठी पासून ते राज्य -केंद्र सरकारच्या सर्वोच्च शिखरापर्यंत लाचखोरी , भ्रष्टाचार 'चालू ' आहे याची प्रचिती पदोपदी , क्षणोक्षणी येतच असते . फक्त आपल्यातील दांभिकतेमुळे लाचखोरीच्या अस्तित्वाला नाकारले जाते आहे .
सर्वात महत्वाची गोष्ट हि आहे की , लाचखोरी -भ्रष्टाचाराला राजमान्यता आहे , वरदहस्त आहे त्यामुळे भारतातून भ्रष्टाचार , लाचखोरी हद्दपार होणे हे गेली अनेक दशके केवळ दिवास्वप्नच ठरते आहे .
भ्रष्टाचार ,लाचखोर हद्दपार होण्याची गोष्ट सोडाच उलटपक्षी अलीकडच्या काही दशकात 'लाचखोरी -भ्रष्टाचार ' या गोष्टी अधिकाधिक 'अधिकृत ' होते आहे . ३ कोटेशनची तांत्रिक अटींचे पालन करून बाजारात १० रुपयांना मिळणारी गोष्ट जर १०० रुपयाला सरकारी यंत्रणांनी खरेदी केली तर ते कृत्य सरकारी भाषेत , कायद्याच्या भाषेत 'कायदेशीर ' बाब ठरते .
विकसित देशात सिमेंटचे रस्ते निर्माण करण्यासाठी विहित केलेल्या प्रति चौरस फुट दरापेक्षा आपल्या देशात ३ /४ पट दर दिला जातो व विकसित देशात सिमेंटच्या रस्त्यांचा डिफेक्ट लायेबिलिटी पिरियड ३० /३५ वर्षाचा असताना आपल्या देशात दोष निवारण कालावधी ५/१० वर्षे विहित केला जात असला तरी देखील तो भ्रष्टाचार ठरत नाही कारण सर्व प्रशासकीय ,कायदेशीर सोपस्कार पार पाडूनच तो दिला जात असल्याने तो भ्रष्टाचार ठरत नाही .
एकवेळ भारतातील देव दक्षिणे शिवाय पावू शकेल पण लक्ष्मीदर्शनाशिवाय भारतातील प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय व्यवस्था पावणे कदापिही शक्य नाही याचे ज्ञान फ्रेंच कंपनीला नसावे असे दिसते . त्यामुळे दोष खरा तर भारताचा, भारतीय व्यवस्थेचा नसून तो फ्रांसचा आहे , फ्रेंच कंपनीचा आहे . फ्रांस देशात , फ्रेंच कंपनीत वेगळी संस्कृती असू शकेल , देश सेवेचे वेगळे निकष वेगळे असू शकतील भारतात देश सेवेचे मोल मोजावेच लागते याची जाण आणि जाणीव हि फ्रेंच कंपनींना नसल्यानेच त्यांनी भारतावर 'भ्रष्टाचार , लाचखोरी ' चे आरोप केलेला दिसतात . खरे तर १४० करोड भारतीयांनी , भारतीय सरकारने फ्रेंच चा जाहीर धिक्कार आणि निषेध करायला हवा . भारत बदल रहा है ! फ्रान्सने देखील स्वतःला बदलायला हवे .
भविष्यात भारतात
कोणतेही 'विकासकामांचे कंत्राट
" घेणाऱ्या विदेशी कंपन्यांनी
, विदेशी
सरकारांनी एक गोष्ट
लक्षात
घेणे
अत्यंत
आवश्यक
आहे
की भारतात भ्रष्टाचार
,लाचखोरी
हा
तर
सरकारी
आस्थापने
, नोकरशाहीचा
, लोकप्रतिनिधींचा
"सरकारमान्य
" मूलभूत अधिकारच ! असून तो
मान्य
असेल
तरच
भारताच्या
'विकास
' कामात
सहभागी
व्हावे
. विनाकारण
भारताची
बदनामी
होईल
असा
पत्रव्यवहार
करण्याचे धाडस दाखवू
नये
.
सुधीर लक्ष्मीकांत दाणी
(लेखक सजग नागरिक मंच नवी मुंबई चे संघटक आहेत)
आपण लिहिलेले सर्व निखालस सत्य आहे. पण यावर उपाय काय असु शकतो? यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे.
उत्तर द्याहटवाउदाहरण द्यायचे म्हटले तर रस्त्यांचा उपयुक्त कालावधी भारतीय मानकानुसार का नाही? हा प्रश्न त्या विभागाच्या मुख्य अभियंता यांना आणि संबंधित मंत्र्यांना लेखी विचारला पाहिजे. तसेच Liability Period हा प्रचलित मानका च्या पेक्षा कमी करण्याचे अधिकार कोणी आणि का दिले? हा प्रश्न सुद्धा लेखी संबंधित अधिकारी तसेच मंत्र्यांना विचारला गेला पाहिजे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये हे Third Party Technical Audit साठी नेमणुक केलेले आहेत. त्यांचे लेखी अहवाल सर्व सामान्य जनतेला उघड केले पाहिजेत जेणेकरुन सर्वांना कळेल की काय आणि कोठे पाणी मुरते आहे.
दिलीपभानु
१. मांजराच्या गळ्यात कोणी घंटी बांधायची यावर उंदरांमध्ये कधीच एकमत होत नसते. कितीही प्रामाणिक अधिकारी किंवा कर्मचारी असला तरी तो भ्रष्टाचाराला उघड करून वरिष्ठांची गैरमर्जी स्वतःवर ओढवून घेणार नाही. २. त्यासाठी राजकीय नेते स्वच्छ चारित्र्याचे हवेत. पण सध्याच्या पद्धतीनुसार निवडून येण्यासाठी इतका पैसा लागतो की झालेला खर्च भरून काढण्यासाठी भ्रष्टाचार अनिवार्य होऊन बसतो. ३. उभे राहिलेल्या उमेदवारांचा वैयक्तिक खर्च टाळणारी निवडणूक पद्धती हाच त्यावर उत्तम उपाय असेल. भ्रष्टाचाराचा मूलस्त्रोतच त्यामुळे नाहीसा होईल.
हटवाबऱ्याच वेळा निवडणुकीच्या अगोदर मत देताना मतदार हा प्रतिनिधीच्या डोक्याच्या वर असतो पण एकदा निवडणुका होऊन एखादा निवडून गेला की मतदार हे त्याच्या पायाखालीच असतात फार क्वचित त्यांची दाद घेतली जाते.?
उत्तर द्याहटवाहे आजच्या लोकशाहीत सत्य ठरत आहे.
नेते व त्यांना निवडून देणारे सामान्य यांच्या त संवाद क्वचितच होऊ शकतो.
यामुळे जनतेला आपली काम व्हायला हवी असेल तर ते इलेक्शन बाजूला जाऊद्या.
आत्ताच्या रहिवासी संघाची दहावी सोसायटी आणि जर त्याने एखादी कमिटी तयार केली काम करू इच्छिणाऱ्या लोकांची तर काम नक्की होऊ शकतो अन्यथा येरे माझ्या मागल्या किंवा पालथ्या शासकीय मशिनरीवर पाणी.?