विविधतेने नटलेल्या , शेकडो जाती -धर्म असणाऱ्या १४० करोड जनतेच्या देशात तिसरंद्या बहुमताने सत्तेत येणे हे कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यासाठी अग्निदिव्य असते आणि ते भाजपा आणि मोदींनी अग्नीदिव्य पार करत सत्तेचे सोपान पादाक्रांत केले आहे . यासाठी भाजप आणि मोदींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन .
आता वळू या , महाराष्ट्रातील निकालाकडे .
"शांतीत मतदारांनी केलेली क्रांती " अशा प्रकारचे वर्णन महाराष्ट्रातील निकालाचे करता येऊ शकेल . मतदारांचा आवाज हा सर्वात महत्वाचा आवाज असतो हे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवे हेच मतदारांनी आपल्या मत प्रदर्शनातून व्यक्त केलेले आहे .
या निकालाद्वारे भाजपचा विजय झाला की पराभव , दोन्ही शिवसेनाचा विजय झाला की पराभव किंवा दोन्ही राष्ट्रवादीचा विजय झाला की पराभव की काँग्रेसचा विजय झाला की पराजय हा वादविवादाचा विषय असला [तसे पाहिले तर काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या गेल्या साडेचार वर्षातील वर्तनाचा फटकाच बसलेला आहे ] तरी हि गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की हा निकाल महाराष्ट्रातील सुजाण मतदारांचा "विजय" आहे .
राजकीय दडपशाही , राजकीय कुरघोडी , सरकारी यंत्रणेचा वापर -गैरवापर , खोक्यांच्या अमिषातून आमदार -खासदार विकत घेणे -विकले जाणे शक्य असले तरी महाराष्ट्रातील मतदारांना विकत कोणीच घेऊ शकत नाही हा संदेश मतदारांनी या निकालातून सर्वच राजकीय पक्ष व त्याच्या नेतृत्वाला दिलेला आहे असे म्हटले तर ते अतिशयोयुक्तीचे ठरणार नाही .
गेल्या साडेचार वर्षात सर्वच राजकीय पक्ष व नेतृत्वाने निवडणूक पूर्व युती -आघाडी व निवडणूक पश्चात त्यांचे वर्तन हे पूर्णपणे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करणारे होते . महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर डागाळणारे होते . ते मतदारांना पचनी पडलेले नाही हे आता तरी ध्यानात घ्या .
भाजप , दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की त्यांचे कर्तृत्व होते , त्यांची कामगिरी चांगली होती , त्यांचे जनतेप्रती वर्तन चांगले होते म्हणून मतदारांनी मत पदरात टाकलेले नसून 'दगडा पेक्षा वीट बरी ' किंवा 'एकाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्याच्या पारड्यात अनिच्छेने मतदान' अशा पद्धतीने मजबुरीने मतदान केलेले आहे . त्यामुळे त्यांनी देखील मतदारांना गृहीत धरू नये .
सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना , शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या समस्येला , शेतकरी उत्पादनाच्या निर्यात धोरणाला बगल देऊन लुभावणाऱ्या कितीही जाहिराती केल्या तरी सुज्ञ मतदार त्याला बळी पडत नाहीत हा महत्वपूर्ण संदेश महाराष्ट्रीय मतदारांनी दिलेला आहे आणि तो सर्वच राजकीय पक्षांनी ध्यानात घ्यायला हवा .
भाजप , दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवावे की त्यांचे कर्तृत्व होते , त्यांची कामगिरी चांगली होती , त्यांचे जनतेप्रती वर्तन चांगले होते म्हणून मतदारांनी मत पदरात टाकलेले नसून 'दगडा पेक्षा वीट बरी ', अशा पद्धतीने मजबुरीने मतदान केलेले आहे . त्यामुळे त्यांनी देखील मतदारांना गृहीत धरू नये .
राज्यातील मतदारांनी करोडो रुपये खर्च करून केलेल्या जाहिराती असोत की निवडणुकीच्या निमित्ताने दिल्या गेलेल्या जाहीरनामे ,वचननामे , निवडणूक प्रचारातील भाषणे याला भीक न घालता कोणत्याच पक्षाच्या , नेतृत्वाच्या पदरात पुर्ण दान टाकले नाही .
भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्या साठी
या
निकालातून
हा
संदेश
मतदारांनी
दिलेला
आहे
की " भ्रष्टाचार मुक्त
कारभाराच्या
घोषणा
एकीकडे
तर
दुसरीकडे भ्रष्ट नेत्यांना पायघड्या
" असे दुट्टपी धोरण कदापिही मान्य
केले
जाणार
नाही
. फोडाफोडीतून नेते
आयात
केले
जाऊ
शकतात
पण
त्या
नेत्यांचे
समर्थक
मतदार
त्यांच्या
बरोबर
आयात
होत
नसतात
.
" भ्रष्टाचार मुक्त
कारभार
, भ्रष्टचारावर
प्रहार
" हे भाजपाचे 'प्रामाणिक
धोरण
" असेल तर त्याची
प्रचिती
पक्षविरहित
कारवाईतून
दिसून
येणे
गरजेचे
आहे
. 'वॉशिंग
मशीन
" चे धोरण
हे
देखील
भाजपच्या
पीछेहाटीचे
सर्वात
मोठे
कारण
आहे
हे
नाकारणे
म्हणजे
स्वतःच्या
पायावर
धोंडा
पाडून
घेण्यासारखे
ठरू
शकेल
.
आणखी एक संदेश मतदारांनी या निकालातून दिलेला आहे की ,ज्यांनी मतदारांना गृहीत धरून " जनसंपर्क कार्यालये बंद केले " , जनतेशी नाळ तोडली , जनतेशी संपर्क तोडला तर जनता त्यांना देखील कोणता पक्ष आहे , त्यांचे घराणे किती वर्षांपासून राजकारणात आहे याचा विचार न करता घरचा रस्ता दाखवते .
लोकशाही व्यवस्थेत कोणताच नेता , कोणताच पक्ष "कायमचा राजा " असू शकत नाही. कायमच राजा असतो तो मतदार! तो ज्याच्या पदरात मत टाकेल तोच राजा होऊ शकतो...अन्यथा कोणीच राजा होऊ शकत नाही....तेंव्हा महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्याने आगामी काळात तरी महाराष्ट्रातील मतदारांच्या मताचा अनादर करू नये .
सर्वच राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन !
सुधीर दाणी
९८६९२२६२७२
यामध्ये जनतेपर्यंत ही माहिती उपलब्ध करून देणारे आणि चौथा स्तंभ म्हणून लोकशाहीचा आधार असलेल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सत्य परिस्थिती चा आढावा देणे गरजेचे होते व आहे. पण मुळात भांडवलशाही वर चालणाऱ्या
उत्तर द्याहटवायोग्य व लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार करा.मनमानी केली की जनता जागा दाखवून देते.
उत्तर द्याहटवा