📝 मुख्यमंत्री महोदयांना निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचे "गुपित खुले पत्र"... 📩
प्रति, मा. देवेंद्र फडणवीस साहेब,
🏛️ मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय: वर्तमानातील “निवडणूक बाजार तत्वानुसार” केलेली गुंतवणूक लक्षपटीने वसूल करणाऱ्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेस आपला सततचा वरदहस्त ठेवण्याबाबत... 🙏
देवभाऊ नमस्कार! 👋
निवडणुका कशा जिंकायच्या याबाबत भारतीय जनता पक्ष अत्यंत निपुण आहे व त्याचे शिल्पकार आपण आहात हे आता उघड गुपित राहिलेले नाही. 🏆
लोकशाहीची जननी व जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या व्यवस्थेच्या निवडणूक सूत्रानुसार— "मतदार संघातील एकूण मतदार भागिले २ गुणिले २ ते १० हजार रुपये (प्रति मतदार 'पाकीट मनी')" 💰 अधिक कार्यकर्त्यांच्या दारू, मटण आणि पेट्रोल खर्चासाठी 🍗🍻 आवश्यक पाच-पन्नास लाख अशा सर्व भांडवलाची परिपूर्ण तयारी करून आम्ही रिंगणात उतरलो आणि अपेक्षेप्रमाणे निवडूनही आलो! ✅
आणि हो, एसटीत ज्याप्रमाणे तिकिटासाठी पैसे द्यावेच लागतात, त्याच सूत्रानुसार आम्ही देखील तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये जी ठराविक ‘नजराणा’ देण्याची परंपरा आहे, तीही पूर्ण केली आहे. थोडक्यात, या पाच वर्षांच्या “लोकशाही उद्योगात” आमची गुंतवणूक अत्यंत प्रामाणिक आहे. 📈
आपण जाणता की राजकारण हा समाजसेवेचा भाग ही संकल्पना आता कालबाह्य झाली असून, पॉलिटिक्स म्हणजे "High Risk, Low Investment & Very Very High Return" असा व्यवसाय झाला आहे. 💼✨
💸 आता वेळ वसुलीची... 💸
नगरसेवक म्हणून पाऊल ठेवणे म्हणजेच "निवडणुकीतील गुंतवणुकीचा परतावा वसूल करण्याचा श्रीगणेशा" होय. 🚩 आम्ही आता तातडीने कामाला लागणार आहोत:
जुनाच फॉर्म्युला: रस्ते, फुटपाथ, नाले यांची कामे काढणे. 🛣️
बिल काढण्याची कला: उद्यानात माती शिंपडून करोडो रुपयांची बिले काढणे, जुनेच स्टोन इकडून तिकडे लावून दोन्ही ठिकाणचे पैसे उचलणे. 🏗️
महागाईचा दर: १० हजारांचे बाकडे ३५ हजारांत खरेदी करणे आणि जुन्याच फाईल्स 'कॉपी-पेस्ट' करून नव्या नस्त्या मंजूर करणे. 📋🖊️
काही कंत्राटदारांनी आम्हाला मोठी मदत केली आहे, आता त्यांच्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. 🤝
📢 आमच्या "खास" मागण्या:
1️⃣ केंद्रीय यंत्रणांपासून संरक्षण: 🛡️ आगामी ५ वर्षांत आमची संपत्ती वाढणारच! आयकर विभाग, ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) यांची नजर आमच्यावर पडणार नाही, याची चोख व्यवस्था व्हावी.
2️⃣ समाजसेवकांचा बंदोबस्त: 🚫 "राष्ट्र प्रथम" (आमच्यासाठी राष्ट्र म्हणजे आम्ही आणि आमचे नातेवाईक) काम करताना अडथळा आणणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘सरकारी कामात अडथळा’ असे लेबल लावून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.
'3️⃣ “लाडक्या आयुक्तांची” नियुक्ती: 👨ा टेंडर आणि फाईल्स तातडीने मंजूर करण्यासाठी आमच्या सोयीच्या आयुक्तांचीच नियुक्ती व्हावी.
4️⃣ भूखंडांचे श्रीखंड: 🍰 ट्रस्ट, शाळा किंवा मंदिराच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी लाटण्याच्या आमच्या फाईल्सना विनासायास मंजुरी मिळावी.
5️⃣ गुप्त कारभाराला अभय: 🤐 महापालिका तिजोरीची लूट करण्यासाठी कारभार 'गुप्त' असणे आवश्यक आहे. खर्चाचा तपशील पब्लिक डोमेनवर येणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणुका संपल्याने आता नागरिकांच्या मताला काडीचीही किंमत देण्याची गरज नाही. 🔇
6️⃣ समान निधीवाटप: 💰 राजकीय पक्ष ही संकल्पना आता उरली नाही, त्यामुळे सर्व नगरसेवकांना पक्षभेद न करता समान निधी मिळावा.
निष्कर्ष: 🧐 आपले सरकार “पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त” कारभाराची घोषणा करत असले, तरी वास्तवात आम्हाला आमची गुंतवणूक शांततेत वसूल करता येईल, अशी अदृश्य व्यवस्था आपण जपली आहे. जनतेला ‘गाजर’ दाखवणे 🥕 आणि आम्हाला ‘प्रशासकीय सवलत’ देणे ही कसरत फक्त आपल्यासारखा कुशल लोकनेताच करू शकतो! 🎩✨
"सबका साथ, सबका विकास" (आणि आमचा खास विकास) या सूत्रासाठी आपला वरदहस्त कायम असावा, हीच आग्रहाची विनंती. 🙏
कळावे,
आपले कृपाभिलाषी, सर्वपक्षीय नगरसेवक 🤝 (जनतेचे “तथाकथित” हितचिंतक)
संकल्पना: सुधीर दाणी [भावी नगरसेवक] 📞 9869226272 | 📧 danisudhir@gmail.com
प्रत: माननीय अर्थमंत्री (विशेष 'गुंतवणूक परतावा' निधी देण्याबाबत) 📑💼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा