THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ७ जुलै, २०२०

लॉक डाऊनचा " सोपस्कार" करत ' आर्थिक व्यवस्थेशी ' जीवघेणा खेळ खेळण्यापेक्षा एकदाच " झिरो मुव्हमेंट लॉक डाऊन " लावावा ...



                दिशाहीन होतचकवाझालेली व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येते तसेच सरकारचे लॉक डाऊन बाबत होताना दिसते आहे . अनलॉकची भाषा करणाऱ्या  सरकारने  कोरोना साथ नियंत्रणासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊनची मात्रा लागू केली आहे

स्थानिक प्रशासन वेगवेगळ्या काळात ,वेगवेगळ्या पद्धतींने  लॉक डाउनची अंमलबजावणी करत असल्यामुळे लॉक डाऊन हा आता जनतेसाठी व्यावसायिकांसाठी , उदयॊगधंदयासाठी  'जाच ' ठरू लागलेला आहे 

      प्रश्न हा आहे की , हि मात्रा प्रभावी ठरेल काय ? कुठलेही औषध 'योग्य ' पद्धतीने घेतले तरच ते उपयोगी ठरते , लॉक डाऊन चे देखील तसेच आहे . कोरोना साथ नियंत्रणासाठी लॉक डाऊन उपयोगी ठरण्यासाठी सर्वप्रथम सरकारने धरसोडवृत्तीचा त्याग करतझिरो मुव्हमेंट  लॉक डाऊनघेणे आवश्यक आहे . र्धवट लॉक डाऊन केवळ आणि केवळ यंत्रणेचा अपव्यय ठरतो हे पहिल्या लॉक डाऊनमधून अधोरेखित झालेलेच आहे . सरकारने टाळेबंदीचा  'डोळस ' वापर करायला हवा 

*खरे तर पहिल्या २/३ लॉक डाऊन मध्येच ४/५ दिवसांचे झिरो मूव्हमेंट लॉक डाऊन घ्यायला हवे होते* 




            " झिरो मुव्हमेंट लॉक डाऊन " हा  कोरोनाची शृखंला खंडित करण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो . सध्याच्या लॉक डाऊन मध्ये  भाजीपाला खरेदी , फळ खरेदी -दूध खरेदी , मटण -चिकन-मासे खरेदीसाठी प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती बाहेर पडत आहे . अशा ठिकाणी नाही म्हणले तरी 'सोशल डिस्टन्स ' ला हरताळ फासला जातो आहे . घरातील एक व्यक्ती बाहेर पडत असली तरी त्यामुळे घरातील अन्य सदस्यांना देखील धोका आहेच . हे टाळणे गरजेचे आहे .

       ८० टक्के नागरीकांचे वर्तन जरी संवेदनशील -जबाबदारीचे भान असणारे असले तरी २० टक्के असंवेदनशील -बेजबाबदार नागरीकांमुळे कोरोनाचा विस्तार होतो आहे आणि म्हणूनच सध्या ज्या ज्या ठिकाणी टाळेबंदी लागू केलेली आहे तिचे रूपांतरशून्य हालचाल टाळेबंदी ' करणे हाच सर्वोत्तम ऊपाय तूर्त तरी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी  दिसतो आहे .
                     आजवर सरकार सरकारी यंत्रणा अनेक उपाय योजतच आहेत पण कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता हे उपाय अधिक प्रभावी नाविन्यपूर्ण असायला हवेत . २०- २२ तास पाळले  जाणाऱ्या साथ सोवळ्यावर  केवळ  भाजी -किराणा -दूध यासम  खरेदीसाठी पाणी  फेरले जाणार असेल तर कोरोनाची श्रुंखला खंडित करणे दिवास्वप्नच ठरणार हे निश्चित .
     कोरोना अजून किती काळ राहणार हे अनिश्चित आहे . हे लक्षात घेत सरकारने  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वाधिक गर्दी होणाऱ्या भाजीपाला -फळ वितरण व्यवस्थेचे विकेंद्रीकरण  करणे अत्यंत आवश्यक आहे . 'होम डिलिव्हरी ' हि वितरण व्यवस्था संकल्पना अधिकाधिक प्रमाणात अन्न -धान्य वितरणाच्या बाबतीत वापरली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रसारावर अंकुश आणला जाऊ शकतो . .
                अर्थातच कोरोना प्रसारास कारणीभूत असणारी दुसरी बाजू म्हणजे  नागरिकांचे बेजबाबदार वर्तन .कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या भागात देखील आपल्या आयुष्यातील मांसाहार करण्याचा हा शेवटचा रविवार आहे अशा थाटातील रांगा , भविष्यात भाजीपाला मिळणारच नाही अशा थाटात कोरोना विषाणूला खिजवित भाजीपाला मार्केटमध्ये होणारी भाऊ गर्दी  'भारतीय नागरिक नागरिकशास्त्रात सदैव्य नापासच ' ठरतात याचीच साक्ष देताना दिसतात . वाईट याचे वाटते की अनेक विकसनशील देशातील कोरोना बळींची संख्या समोर दिसत असताना भारतीय नागरीक मात्र अजूनही गंभीर होताना दिसत नाहीत .

                    सारांश हाच की , जगाला हादरून टाकणाऱ्या कोरोना संसर्गाचे लोन भारतात 'कम्युनिटी स्प्रेड ' स्टेजमध्ये जाऊ द्यायचे नसेल भारताची अवस्था अन्य देशासारखी बिकट होऊ द्यायची नसेल तर  तर प्रशासनाने आऊट ऑफ बॉक्स विचार करत नाविन्यपूर्ण उपाय योजायला हवेत नागरिकांनी आपल्या बेजबाबदार वृत्तीला वेसण घालण्याची गरज आहे . कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने ,पालिकांनी सफाई कामगार , अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे कर्मचारी -अधिकारी जीवनावश्यक  खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 'सॅनेटरी व्हॅन' ची व्यवस्था करायला हवी .

                वेळ अजूनही हाताबाहेर गेलेली नाही सरकार नागरीकांनी  वेळीच जागे होणे गरजेचे आहे , अन्यथा अनर्थ अटळ दिसतो .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .

७ टिप्पण्या:

  1. खूप गरज आहे अश्या उपायांची ....सुधीर जी खूप छान analysis केले आहे तुम्ही

    उत्तर द्याहटवा
  2. हा उपाय अगदी रामबाण ठरेल यात काही शंका वाटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. तुम्ही मांडलेले मुद्दे आगदी 100 % बरोबर ख
    आहेत..

    उत्तर द्याहटवा
  4. सरकारसाठी छान प्रबोधनात्मक प्रस्ताव

    उत्तर द्याहटवा