🇮🇳 *विकास के राजनीती* को दिशा देनेवाले दिल्ली के नतिजे पर *आम् आदमी की मन की बात* पेश करने वाला यह मेसेज पसंद आये तो जरूर शेअर करना 🇮🇳
दिल्ली विधानसभा निकलाच्या अनुषंगाने आम् आदमी च्या मनातील *मत*
*घोषणा _ आश्वासनांना विकासाची चपराक*.....
७० पैकी ६२ जागा जिंकत आम् आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवालांनी एक प्रकारे भारतीय राजकारणाला वेगळे वळण दिलेले आहे. समोर १०० वर्षांचा इतिहास असणारे प्रस्थापित पक्ष असताना देखील सर्व प्रतिकूल तेवर मात करत आपणच दिल्ली चा बादशहा असल्याचे सिद्ध केले आहे .
प्रामाणिक पणे व निर्धारपूर्वक आपली वाटचाल ठेवली तर कुठलाही नवीन पक्ष भारतीय लोकशाही व्यवस्थेत रुजू शकतो हे दाखवून आपने चाकोरीबाहेर जाऊन राजकारण करू इच्छिणाऱ्यांना *राजमार्ग* घालून दिलेला आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. *लोकशाही साठी नवीन पक्षाचे स्थिरावणे नक्कीच सुचिन्ह ठरते*
भविष्यात सत्ताप्राप्तीसाठी " *कृतियुक्त विकास मॉडेलच* " लाभदायी
देश महत्वाचा आहेच पण 'आम आदमी'च्या दृष्टीने सर्वात महत्वाची असती ती म्हणजे दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींच्या प्राप्तीसाठीची लढाई.
_रस्ते -वीज-पाणी -शिक्षण-आरोग्य_ या रोजचे जगणे सुसह्य करणाऱ्या गोष्टी जो देईल , विकासाच्या केवळ संकल्पना -स्वप्ने न दाखवता ती प्रत्यक्ष कृतीतून आमच्यासमोर ठेवेल त्यालाच आम्ही 'मत 'देतो , त्याच पक्षाच्या पाठीशी आम्ही उभे राहतो हा दिल्ली कर मतदारांनी भारतातील सर्वच अन्य राजकीय पक्षांना ,नेत्यांना दिलेला सूचक इशारा आहे _धडा आहे , हेच दिल्ली विधानसभेतील निकालाने दाखवले आहे .
*भावनिक मुद्यांच्या आधारे तुम्ही सहानभूती मिळवू शकता* पण सातत्याने मतदार तुमच्या पाठीशी राहावा अशी अपेक्षा असेल तर 'प्रत्यक्ष कृती शिवाय ' अन्य पर्याय असू शकत नाही हे अरविंद केजरीवालांच्या "आप पक्षाने " दिल्लीच्या सत्तासोपानाला गाठण्याची हॅट्रिक करत सोदाहरण स्पष्ट केलेले आहे .
खरे तर दिल्लीत आप आणि भाजपा या दोन पक्षांमध्येच खरी लढाई होती . भाजपाच्या बाबतीत असे झाले आहे की , " पारदर्शक कारभार " , " ना खाऊंगा , ना खाने दूंगा " "भ्रष्टाचार मुक्त भारत " अशा घोषणांच्या माध्यमातून भाजपने मतदारांच्या अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या पण गेल्या ६ वर्षाचा कारभार पाहता काही गोष्टी देश हिताच्या दृष्टीने झालेल्या असल्या तरी *अनेक आश्वासने हि आजही केवळ 'स्वप्नेच* ' राहिली आहेत. एवढेच नव्हे तर बऱ्याच बाबतीत तर अपेक्षाभंग , स्वप्नभंगच झालेला आहे .
♦भाजपाला नाकारण्याचे प्रमुख कारण ♦
*मतदारांच्या नजरेस पडणारे जमिनीवरील वास्तव व आजवर केलेल्या घोषणा_ दाखवलेली स्वप्ने याबाबतीत टोकाची विसंगती हे मतदारांनी गेल्या काही निवडणुकात भाजपाला नाकारण्याचे प्रमुख कारण दिसते* .
देशातील पालिकांचा उघड उघड लूट करणारा कारभार मतदारांना समोर दिसत असताना , मतदार भ्रष्टाचार मुक्त कारभार यावर कसा विश्वास ठेवेल ?
अनेक सरकारी यंत्रणा आपल्या कार्यालायातील बहुतांश गोष्टी या 'सिक्रेट ' ठेवण्यातच धन्यता मानत असतील तर "पारदर्शक कारभाराच्या " आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा ?
~भाजपच्या बाबतीत गेल्या काही वर्षात उक्ती व कृती याबाबत टोकाची विसंगती दिसते आहे~ आणि म्हणूनच ज्या मतदारांनी भाजपाला २ वेळा देशावर सत्ता करण्याची संधी दिली आता तेच मतदारांचा विचार बदलताना दिसतो आहे . जरी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मुद्दे. वेगवेगळे असले तरी जर भाजपचा कारभार *लोकाभिमुख* असता तर त्यांनी भाजपला विधानसभेत संधी देण्याचा किमान विचार तरी केला असता पण भाजपला दिल्ली करांनी सातवे असमान दाखवत भाजपला भविष्यात आपली *दशा* टाळायची असेल तर आपल्या राजकारणाची *दिशा* बदलण्याची गरज असल्याचा सूचक इशारा दिला असल्याचे दिसते.
काँग्रेसने अन्य कोणाच्या पराभवात आपण किती दिवस आनंद मानायचा याचा देखील विचार करणे गरजेचे दिसते .
विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुकांतील मुद्दे वेगवेगळे असतात या सबबी खाली भाजपा स्वतःचा बचाव करू पाहत असले तरी एक गोष्ट निश्चित आहे की , दोन्ही ही राष्ट्र पातळीवरील पक्षांनी म्हणजेच भाजप -काँग्रेसने लक्षात घेणे गरजेची आहे ती म्हणजे दिल्ली सरकार ने *गेल्या ५ वर्षात देशासमोर "विकासाच्या राजकारणाचे " वेगळे मॉडेल ठेवले आहे व मतदारांनी त्यावर शिक्कमोर्तब करत भविष्यात राजकारणात विकास हेच चलनी नाणे असणार आहे यावरच शिक्कामोर्तब केले असल्याने आता विकासाच्या राजकारणा शिवाय पर्याय नाही हा धडा दिला आहे*
घोषणा -आश्वासने -भावनिक मुद्दे -धर्माधिष्टीत द्रुही करण -देशप्रेमी -देशद्रोही या मुद्यांद्वारे देशभावना भडकावत व अन्य तत्सम मुद्यांच्या आधारे काही काळ , काही लोकांना मूर्ख बनवत सत्ताप्राप्त करू शकता पण त्यात सातत्य राखावयाचे असेल तर " *प्रत्यक्ष कृतीतुन विकासाचे मॉडेलच जनतेसमोर ठेवणे* अपरिहार्य असणार आहे हा धडा या दिल्ली निकालाने दिलेला आहे .
गेल्या ५ वर्षात अरविंद केजरीवाल प्रगल्भ झालेले दिसत असले तरी त्यांनी देखील "मोफत योजनांचा " पुनर्विचार करणे गरजेचे आहे कारण सरकार चालवण्यासाठी पैसा लागतोच लागतो . मोहल्ला क्लिनिक , सरकारी शाळांच्या दर्जात आमूलाग्र सुधारणा यांचा केजरीवालांच्या 'विजयाच्या हॅट्रिक " मध्ये महत्वाचा वाटा आहे .
याच मॉडेलचा विचार प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी खरे तर गरजेचे आहे . *जे केजरीवालांना जमते ते इतर मुख्यमंत्र्यांना का जमत नाही* ? . करोडो रुपये खर्चून देखील सरकारी शाळांचा दर्जा , सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे , सरकारी हॉस्पिटल्स चा दर्जा नेहमीच प्रश्नांकित का राहतो , हा मुद्दा देखील अतिशय महत्वाचा आहे . महाराष्ट्रातील सरकारी शाळा , आरोग्य व्यवस्था देखील त्यास अपवाद नाहीत .
पालिकांची मोठं मोठाले हॉस्पिटल्स देखील 'मृत्यू शय्येवर
" आहेत .
*प्रचाराची घसरती पातळी चिंताजनक*
विविध राजकीय पक्षांनी खरे तर एकमेकांचा आदर ठेवत प्रचार करणे लोकशाही व्यवस्थेत अभिप्रेत आहे .
दुर्दैवाने राजकीय पक्ष प्रचार करताना हे विसरून जातात की , आपली विचार धारा वेगवेगळी असली तरी आपण एकाच देशातील नागरीक आहोत . त्यामुळे *निवडणुका म्हणजे युद्ध नव्हे* हे लक्षात ठेवत प्रचाराची चौकट आखून ठेवायला हवी .
त्यामुळे _केवळ प्रचाराची राळ उडवत निवडणुका जिंकल्या जाऊ शकत नाहीत_ हि गोष्ट लक्षात घेत राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपल्या प्रचाराची पातळी ठरवली पाहिजे .
मतदार अधिक जागरूक झालेला आहे , तो आजवरच्या अनुभवातून अधिक प्रगल्भ झालेला आहे त्यामुळे प्रचार कितीही राळ उडवून देणारा असला तरी त्याचा परिणाम केवळ काठावरचे १०/२० टक्के मतदान आपल्याकडे घेचण्यासाठी होऊ शकतो हे ध्यानात ठेवायला हवे .
एवढेच नव्हे तर हि गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे की , *प्रचार हे दुधारी शस्त्र व शास्त्र आहे*. त्याचा उलटा परिणाम देखील संभवतो . भाजपाला अपेक्षे पेक्षाही कमी जागा मिळण्यात भाजपचा प्रचार हे देखील कारण असू शकते हे नाकारता येणार नाही .
आशा आहे की , प्रत्येक राजकीय पक्ष 'आप'ल्या पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करण्यासाठी प्रामाणिकपणे 'चिंतन ' करत लोकशाही ची 'चिंता ' कमी करतील .
केजरीवाल सरकारला पुढील ५ वर्षासाठी शुभेच्छा 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .
9004 226272
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा