THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

अर्थव्यवस्थेत 'अर्थ ' नसताना वेतन आयोगाचा अट्टाहास कितपत व्यवहार्य ?v


  
  ' तिजोरीला न पेलणारा पगारी भार ' या लेखातून मटाने एक महत्वपूर्ण समस्या चर्चेत आणली आहे . कुठल्याही देशाची दिशा आणि दशा हि त्या देशाचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ठरवत असते . आपल्या देशातील या मंडळींची संख्या जेमतेम २ टक्के . आत्ताच खासदारांना १०० टक्के पगार वाढीचे वृत्त आले आहे . एकूणच विद्यमान परिस्थिती लक्षात घेता  नेते आणि नोकरशहांना 'भस्म्या रोग ' झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . भारताच्या प्रगतील प्रमुख अडचण हे नेते आणि नोकरशहां आहेत हि जनतेची धारणा होण्यामागे याच मंडळीची वर्तवणूक कारणीभूत दिसते .

      एकदा नोकरीला चिकटले की या देशाचे राष्ट्रपती देखील आपणास नोकरीवरून काढू शकत नाहीत या अविर्भावामुळे गेल्या ६ दशकात सरकारी नोकरांमध्ये ' WORKING CULTURE , WORK ETHICS आणि WORK EXCELLENCE ' याचे बीजारोपण होऊ शकले नाही . काम करा अथवा करू नका , प्रामाणिक रहा अथवा राहू नका , कार्यशम असा अथवा नसा वार्षिक पगारवाढ , वेळोवेळी वेतन आयोग 'सब घोडे बारा टक्के ' या सूत्रानुसार सर्वांना लागू होतात . मग काम कशाला करावयाचे ? आयोग हवा परंतु त्याचा लाभ घेताना कार्डपंचिग / बायोमेट्रिकचे मशीन नको, बदल्या नको हि मानसिकता देशाला महासत्ता कशी बनवणार हा संशोधनाचा नक्कीच विषय आहे . 

      देशाची अर्थव्यवस्था हेलकावे खात असताना , २ टक्के लोकांचे लाड करावयाचे की ' देशाच्या भवितव्यास प्राधान्य ' द्यावयाचे याचा निर्णय  देशाचे विद्यमान एकमात्र तारणहार मा . मोदीजींनी करणे क्रमप्राप्त दिसते . जवळपास  ६५ / ३५ ( राज्य / केंद्र )टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर करूनही सरकारी शिक्षण व्यवस्था , सरकारी आरोग्य व्यवस्था … जे जे सरकारी ते ते दर्जाहीन असे का याचे उत्तर सरकारने शोधायला हवे.

     उदार अंतकरणाने वेतन आयोग जाहीर करणारे सरकार दुसरीकडे मात्र जगण्यासाठी प्रती दिन ३५ रुपये पुरेसे असल्याचे  कसे काय म्हणते . लोकशाहीतील आर्थिक विषमतेला सरकार स्वतःच खतपाणी घालते हे देशातील उर्वरित ९८ टक्के लोकांचे दुर्दैव ठरते .उन्हात ८ तास करणाऱ्याला ३०० रुपये तर नोकरदारांना ८ तासासाठी (?) ३००० रुपयापेक्षा जास्त या विचारामागाचे लॉजीक जनतेसमोर यायला हवे . ना खाउंगा , न खाणे दुंगा असे ठणकावणारया मोदींनी ' ना " जादा " खिलाउंगा ' हा मंत्र जपणे सुद्धा गरजेचे वाटते . 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा