THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १८ मार्च, २०१५

कुठे आहेत त्या संवेदनशील (?) पालिका ?

            

            कुठे आहेत त्या संवेदनशील (?) पालिका ?

      मा . पंतप्रधानांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना " वीज बचतीचे " महत्व विषद करताना पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश पुरेसा असल्यामुळे पदपथावरील दिवे बंद करून विजेची बचत करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे उदाहरण दिले होते . सुदैवाने त्याच महानगरपालिकेचे तरुण महापौर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत . परंतु "वीज बचतीचा आदर्श " ठेवणाऱ्या पालिका -महानगरपालिका मात्र शोधूनही सापडत नाहीत . उलटपक्षी विजेची वारेमाप उधळपट्टी (वापर नव्हे ) करण्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात चढाओढ लागलेली दिसते . मुले हि अनुकरणशील असतात त्यामुळे त्यांच्या पुढे उघड्या डोळ्यांनी  ' दिसणारे वास्तव की मा . पंतप्रधानांचे बोल खरे मानावयाचे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे .



   बदलणारे ऋतुचक्राप्रमाणे बदलणाऱ्या सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ याला सोडचिठ्ठी देत 

सायंकाळी ६ ते सकाळी ७ असे पथदिवे चालू ठेवले जातात . मुंबईत साधारणपणे ६० हजार तर नवी मुंबईत ३३ हजार पथदिवे आहेत . पथदिव्यावरील बल्ब जास्त व्याटेजसचे असल्यामुळे त्यांना जास्त वीज लागते , त्यात आता  नगरसेवकांच्या प्रतिष्ठेचे असणाऱ्या आणि त्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश जनमानसात पाडणाऱ्या हायमास्टची भर पडली आहे .


   केवळ मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिकेने पथदिव्यांचे संवेदनशीलपणे नियोजन केले तरी काही हजार युनिट आणि काही करोड रुपयांची बचत होऊ शकते . मुख्यमंत्र्यांनी लक्ष देत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना " आदेश " (अंमल बजावणीसह ) दिले तर राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बचत संभव आहे . पालिकांनी एलईडी लावून वीजबचतीसाठी मगरीचे आश्रू गाळण्यापेक्षा पथदिवे टायमरच्या सहाय्याने चालू बंद करण्यासाठी करोडो रुपयांचे कॉनट्रक्ट देउनही "पथदिवे नियोजनात " अंधार का याकडे लक्ष द्यावे . उन्हाळ्याचे आगमन झाले आहे , वाढत्या तापमानानुसार विजेचा तुटवडा वाढत जाणार आहे . ग्रामीण भागाला लोडशेडींग तर शहरात विजेची उधळपट्टी हे असंवेदनशील चित्र बदलल्यास ग्रामीण भागातील जनतेचे  'अच्छी रात्र ची ' स्वप्नपूर्ती काही अंशी शक्य होईल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा