सार्वजनिक धार्मिक उत्सवांना 'वीजचोरीचे ' ग्रहण
गणेशोस्तवाच्या उत्साहाने आसमंत बहरून गेला आहे . गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत आणि सकृत दर्शनी हि आशादायक व आनंदाची बाब आहे . धार्मिक उत्सवांचे मुख्य प्रयोजन हे सामाजिक प्रबोधन , नैतिक मूल्यांचे बीजारोपण , संस्कृतीचा व्यापक स्तरावर प्रचार -प्रसार , सामाजिक एकात्मतेच्या भावनेचे जतन आणि संवर्धन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात काही विरंगुळ्याचे क्षण ईत्यादी असते . वर्तमान सार्वजनिक उत्सव यापैकी किती उदिष्टपूर्ती करतात या प्रश्नांचे 'डोळस ' उत्तर दुर्दैवाने बहुतांश पातळीवर नकारात्मकच आहे .
view expressed on Zee24taas
view expressed on Zee24taas
उलटपक्षी जसजशी उत्सवांच्या संख्येत आणि प्रमाणात वाढ होते आहे तसतशी त्यांचे तोटे अधिक प्रमाणात जाणवू लागले आहेत . ध्वनीप्रदूषण , वायुप्रदूषण , पाणीप्रदूषण हि सर्वज्ञात काही उदाहरणे आहेत . गेल्या काही वर्षात या उत्सवांच्या निमित्ताने एक नवीन डोकेदुखी समोर येत आहे आणि ती म्हणजे सर्रासपणे होणारी वीजचोरी .
गतवर्षीच्या गणेशोस्तवाच्या वीज वापरा संबंधीची माहिती 'सार्वजनिक उत्सवातील वीजचोरी ' अधोरेखीत करणारी आहे . हलोजन बल्ब , हजारो बल्ब , सजावटीच्या माळा यांचा झगमगाट असूनदेखील वीजबिलात दर्शविलेले युनिट मात्र १०० /२०० च्या आसपास तर काही मंडळांच्या बाबतीत अगदीच ३०/५० युनिट आहे . सकृतदर्शनी वीजवापर पाहता हे कदापीही विश्वासार्ह नाही . अनेक मंडळानी वीज बिल देखील भरले नाही . हे झाले अधिकृत 'तात्पुरती वीज जोडणी ' घेणाऱ्या मंडळाच्या बाबतीत परंतु अशी अनेक मंडळे अस्तिवात आहेत की जे या पेक्षा अधिक सुलभ मार्ग स्वीकारतात आणि तो म्हणजे सरळसरळ बेस्ट /एमएसई बी किंवा पालिकांच्या स्ट्रीट लाईटच्या पोलवरून वीजजोडणी घेतात. हे सामान्य नागरिकांना दिसते परंतु वीज कंपन्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मात्र का दिसत नाही ? हा संशोधनाचा विषय आहे . बहुतांश मंडळे हि राजकारण्याची असल्यामुळे त्यांची दबंगगिरी आणि मंडळ आणि वीजकर्मचारी यांची 'अर्थपूर्ण ' युती हि कारणे मात्र कुठल्याही संशोधनाविना उघडपणे दिसतात .
link for news on illegal power connection in Ganesh festival:
http://www.youtube.com/watch?v=D8lYiglvjv4
link for news on illegal power connection in Ganesh festival:
http://www.youtube.com/watch?v=D8lYiglvjv4
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाचा कोणताही कार्यकर्ता यांना लोकशाहीतील कुठलेही नियम बंधनकारक नसतात असा जो अलिखित नियम उदयास येत आहे त्यामुळे सार्वजनिक कुठलेही उत्सव /कार्यक्रम सर्व कायदे -बंधनातून मुक्त असतात हा नवा 'आदर्श ' रुजला आहे . नुकताच साजरा झालेला दहीहंडी उत्सव याचे ज्वलंत उदाहरण आहे . मुख्य मुद्दा हा आहे की वीजचोरीतून होणारा तोटा हा शेवटी सर्वसामान्य ग्राहकावरच टाकला जात असल्यामुळे त्या विरोधात आवाज उठविण्याचा त्याला अधिकार आहे .
प्रतिबंधात्मक उपाय :
- · तात्पुरती वीज जोडण्या घेणाऱ्या मंडळाची यादी संकेतस्थळावर टाकावी .
- · जनतेला अशी वीजचोरी दिसल्यास त्याबाबतची माहिती टोलफ्री क्रमांकावर किंवा त्याचे फोटो मेल करण्याचे आवाहन करावे .
- · प्रसारमाध्यमांनी गणेशोस्तवाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासोबतच वीजचोरी सारख्या गैरप्रकारावर प्रकाशझोत टाकावा
- · वीज कंपन्यांनी स्थानिक लाईनमन आणि कनिष्ट अभियंता यांच्यावर त्या त्या विभागातील मंडळाची वीज जोडणी तपासण्याची जबाबदारी टाकावी .
- · पोलिस प्रशासनाने 'एनओसी ' दिलेल्या मंडळाची यादी वीज कंपन्यांना द्यावी किंवा संकेतस्थळावर टाकावी , जेणे करून अधिकृत वीज जोडणी घेणारे मंडळे उघड पडतील .
- · वीज कंपन्यांनी प्रत्येक उतस्वानंतर मंडळाचे नाव , वापरलेले युनिट , बिल भरले आहे किंवा नाही याची माहिती संकेत स्थळावर टाकावी .
- · वीज कंपन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान १० मंडळांना अचानक भेटी देऊन वीज जोडणी आणि वापरात असणाऱ्या विजेच्या उपकरणांच्या प्रमाणात वीज वापराची मीटर मध्ये नोंद होते आहे का हे तपासावे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा