THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

भ्रष्ट व्यवस्था परिवर्तनाचा "राजमार्ग "




         कुठल्याही आंदोलनाच्या  यशापयाशा बाबत  दोन मत प्रवाह  असतात . एक मत प्रवाह सकारात्मक असतो आणि आज ना उद्या याचा समाजाला फायदा होईल या विषयी त्याच्या मनात किंतु नसतो. या उलट एक मत प्रवाह नकारत्मक दृष्टीने ओसंडून वाहत असतो आणि त्याच्या मनात एक खूनगाठ पक्की असते कि आंदोलने होतात आणि कालांतराने हवेत विरून जातात . अश्या मत प्रवाहाची माणसे आंदोलन कर्त्याची भलावण " मेणबत्ती संप्रदाय"  वा तत्सम विशेषणाने करत असतात . जेष्ट समाज सेवक अण्णा हजारेच्या ' भ्रष्टाचार आंदोलना बाबत ही नकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्याची संख्या जास्त होती पण या आंदोलनाचा खोलवर परिणाम झालेला दिसतो आणि तो ही तरुण  वर्गावर हे विशेष. हे अधोरेखित करणारा प्रकार नुकताच घडला तो असा :

                    स्थळ : पनवेल रेल्वे स्टेशन . एक तरुण आपली इंजिनीरिंगचा पेपर  देवून प्रथम वर्गाच्या डब्यातून उतरला . मित्रा सोबत पेपर बाबत चर्चा करत करत फलाटा  वरून जात असताना "टिसी" समोर दत्त म्हणून उभा ठाकला . त्या तरुणाने पास पुढे केला . त्या पासची मुदत संपून एक दिवस उलटला होता . परीक्षेच्या टेन्शन मध्ये तो पास संपला असल्याचे विसरला होता .टीसीने   सहाशे   रुपये दंड भरण्यास सांगितला .त्या  तरुणाकडे नेमकी त्या वेळेस तेवढी रक्कम नव्हती . तरूणा कडे दोनशे रुपये होते . त्याने ते टिसीला दिले. तरुण पावतीची वाट पाहू लागला . पावती पाहिजे असल्यास संपूर्ण रक्कम भरण्यास सांगितले , परंतु त्या तरुणाकडे दंडाची पूर्ण  रक्कम नव्हती .  रिती रीवाजा प्रमाणे टिसीला ही "तडजोड " रक्कम वाटली .  तरुणाने दोनशे रुपयाच्या पावतीची मागणी लावून धरली , पण टिसीही ठाम होता .

                     इतरांनी  'मिटवून' घेण्याचा सल्ला दिला . कशाला वाढवतोस, दोनशे रुपयात मिटतयना मग कशाला स्वतःला "अण्णा हजारे समजतोस !". . तरुण उत्तरला: होय मला माहित आहे कि  मी अण्णा हजारे नाही. पण मी अण्णाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले  तर काय उपयोग. शेवटी त्याने आपल्या मित्राला फोन केला आणि पैसे मागवून घेतले . दरम्यानच्या काळात टिसीचाही  नूर बदलला . त्याच्या चानाक्ष्य नजरेने हा काही तरी वेगळा  प्रकार असल्याचे हेरले. दुसरा टिसी आला , त्यानेही तडजोड करण्याचा प्रयत्न केला .

               .........शेवटी त्या तरुणाने दंडाची संपूर्ण रक्कम भरली  आणि पावती घेवूनच घर गाठले . वडिलांनीही त्याचे कौतुकच केले. वास्तविक तो तरुणही भ्रष्टाचाराचा राजमार्ग अवलंबू शकला असता . असा असतो आंदोलनाचा परिणाम . "  पेरले ते उगवते " हा निसर्गाचा नियमच आहे . फक्त गरज असते ती योग्य संस्कारला प्रोस्ताहन देण्याची आणि थोडी वाट पाहण्याची . बदल सर्वांनाच प्रिय असतो आणि त्या बदलाचा मुख्य स्त्रोत आपण स्वतःच असतो हे अधोरेखित करणारा हा दिलासादायक प्रसंग . नकारात्मक घटनांना प्रसिद्धी मिळते परंतु सकरात्मक घटना पडद्या आडच राहतात , परिणामी सर्व समाज नितीमुल्याच्या कडेलोटावर उभे असल्याचे आभासी चित्र निर्माण होते . याला छेद देण्यासाठी हा पत्र प्रपंच .

"BE CHANGE AND UR THE  SOURCE " हाच व्यवस्था बदलाचा गुरुमंत्र आहे हेच खरे .

                                                    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा