THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ३१ जुलै, २०१२

लोकशाही की लोकप्रतिनिधी पुरस्कृत ठोकशाही ...


   
        मा. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २ वर्षापूर्वी सीबीआय अधिकाऱ्यांना संबोधित करताना "मोठे मासेही पकडा " असा आदेश दिला होता . पश्चिम विभागाचे सहसंचालक ऋषीराजसिंग यांनी हा हुकुम शिरसावंद्य मानत माजी मुख्यामंत्र्यासह १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप पत्र दाखल केले , त्याची परिणीती त्यांची तडकाफडकी बदली होण्यात झाली . राजकर्ता मग तो कोणीही असो त्याच्या वृत्ती , उक्ती आणि कृतीत जमीन असमानाचे अंतर असते याचा विसर ऋषीराजसिंग यांना पडला आणि त्याची 'बक्षिसी' त्यांना मिळाली .
       सरकारचा विरोध असतानाही त्यांनी आरोप पत्र दाखल केले होते , याचे आशर्य आजी -माजी ( नाम बंधू ) मुख्यमंत्र्यांना वाटले होते . आम्ही  काहीही उद्योग करू त्याचा जाब आम्हाला विचारला कसा जातो , हे महाराष्टाच्या आदर्श परंपरेला साजेसे नाही , याचे ते आश्चर्य असावे .        पृथ्वीराज चव्हाणांनी सीबीआय ला असा तपासाचा अधिकार नाही हे वक्तव्य करून आपणही इतरांपेक्षा फार वेगळे नाहीत हे अधोरेखित केले आणि आपल्या तमाम साथीदारांना दिलासा दिला .ऋषीराजसिंगांची बदली दोन संदेश देते . एक म्हणजे अधिकाऱ्यांनी नसत्या 'उद्योगात ' पडू नये , आपली सर्विस ,प्रगती, करियर  सांभाळावे  आणि दुसरा हा की राज्यकर्त्यांनी आपले 'उद्योग ' चालू ढेवावेत , सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे .     लोकपाल वगैरे सर्व बकवास आहे , सरकार ते कधीही होऊ देणार नाही . जनतेने वेडी आशा बाळगू नये .भारतात 'लोकशाही' आहे हे विसरून जनतेने यापुढे "लोकप्रतिनिधी शाहीच" असेल याचे भान ठेवावे हाच यातून खरा सरकारी  संदेश मिळतो .
       आता ती वेळ येवून ठेपली आहे , या देशातील भ्रष्टाचार खरया अर्थाने संपवायचा असेल तर सर्व सरकारे बरखास्त करून सर्व न्यायालयांकडे हस्तांतरित करावे . इतका उघड भ्रष्टाचार आणि त्याला मिळणारा राजकीय पाठिंबा पाहता भारत "भ्रष्टाचार मुक्त " हे दिवास्वप्नच वाटते . प्रामाणिक स्वचछ अशी बिरुदे  मिरवणारे सर्वच लोकप्रतिनिधींचे पायही   मातीचे आहेत हेही यानिमित्ताने अधोरेखित झाले .

 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा