आपल्या संविधानकर्त्यानी अत्यंत विचारपूर्वक प्रत्येक वर्गाला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी , आपल्या न्याय हक्कांना सरकार दरबारी मांडण्यासाठी प्लॅटफॉर्म प्राप्त व्हावा या उद्देशाने लोकसभा ,राज्यसभा व्यतिरिक्त विधानपरिषद , पदवीधर -शिक्षक मतदार संघ असे विविध मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत .
निर्मितीच्या उद्दिष्टालाच हरताळ फासण्याची कुसंस्कृती भारतीय राजकारणात आलेली आहे हे अनेक वेळेला दिसून आलेले आहे . प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित राजकीय पक्ष , राजकीय नेत्यांनाच प्राधान्य ,शिरकाव अशा कार्यपद्धतीमुळे प्रत्येक क्षेत्राचे राजकीयीकरण होताना दिसते . शिक्षक -पदवीधर मतदारसंघ देखील त्यास अपवाद नसून , प्रस्थापित राजकारण्यांच्या शिरकावामुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघा बाबत दस्तुरखुद्द शिक्षक व पदवीधर उमेदवारांमध्ये पूर्णतः अनास्था आहे .
पदवीधर मतदार संघासाठी देखील 'पदवी ' या शैक्षणिक अर्हतेची यात नसेल तर भारतीय लोकशाही व्यवस्था अजूनही किती अप्रगल्भ आहे हे दिसते . सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या पहिल्या १०/२० वर्षात राजकीय नेते हे उच्चशिक्षित ,अगदी बॅरिस्टर होते . पण हळू हळू शिक्षित उमेदवार राजकीय प्रवाहातून दूर फेकले गेले आणि अशिक्षित उमेदवारांची भाऊ गर्दी वाढू लागली . भारतीय राजकीय व्यवस्थेचे शैक्षणिक बाबतीत किती खोलवर अधःपतन झालेले याचा पुरावा म्हणजे " पदवीधरांचे नेतृत्व करणारे पदवीशून्य नेतृत्व "
वस्तुतः राज्यात अनेक शिक्षक संघटना अस्तित्वात आहेत . त्या त्या संघटनात अनेक शिक्षक हे वर्षानुवर्षे त्या त्या संघटनाचे 'यशस्वी ' नेतृत्व करत असतात . अगदी महाविद्यालयीन पातळीवर देखील विविध प्रकारच्या संघटना असतात . त्याचे नेतृत्व देखील पदवीप्राप्त उमेदवार करत असतात . त्या त्या क्षेत्रात काम करत असल्याने त्यांना त्या त्या क्षेत्रातील समस्या , प्रश्न , जमिनीवरील वास्तव याचे परिपूर्ण ज्ञान असते . अशा व्यक्तींना संधी न देता ' प्रस्थापित राजकीय व्यक्तींना ' पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात संधी देणे [ खरे तर ' खुसखोरी ' करणे ] हा प्रकार उद्दिष्टालाच हरताळ फासणारा ठरतो .
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी
किमान
१०
वर्ष
शिक्षक
म्हणून
कार्यरत
असणे
हि
यात
निवडणूक
लढवण्यासाठी
घालायला
हवी
. तरच
शिक्षकांना निवडणूक लढण्याची
संधी
मिळू
शकते
जगातील सर्वात मोठी लोकशाही , जगातील सर्वात प्रगल्भ लोकशाही अशा प्रकारे दवंडी पिटवणाऱ्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी , त्यांच्या नेत्यांनी किमान पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात तरी खुसखोरी करत लोकशाहीचा पराभव करू नये . किमान पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात तरी या बाबत सर्वच राजकीय पक्षांनी विचार करावा . नाशिक मध्ये अपक्ष उमेदवाराला धमकावण्याचे , गायब करण्याचे प्रकार शिक्षक मतदारसंघासाठी झाल्याचे समोर आलेले आहे . असे असेल तर ग्रामपंचायतीसाठी अशिक्षित उमेदवारांची निवडणूक आणि पदवीधर -शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यात काय फरक राहिला .
काही विद्वान मंडळी सल्ला देतील की शिक्षक संघटनांनी , पदवीधरांनी स्वतः पुढे येऊन निवडणूक लढवाव्यात . असा सल्ला देणाऱ्यां विद्वानांना वर्तमानातील राजकीय दबंगगिरी [कु ] संस्कृतीचा अभ्यास नाही असेच असा सल्ला देणाऱ्या विषयी म्हणता येऊ शकेल . अगदीच स्पष्ट भाषेत म्हणायचे झाले तर म्हणता येईल की ' आपल्याकडे बहुतांश ठिकाणी सामान्य नागरिकांच्या दृष्टीने लोकशाही हि केवळ मतदान देण्याच्या हक्का पुरती सीमित झालेली आहे " .
एकुणातच प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन मतदार याद्या तयार करणे , पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवण्यासाठी पदवीची यात अनिवार्य नसणे , शिक्षक पेशाशी दुरान्वये संबंध नसणाऱ्यांना निवडणुकीत उभा राहण्याची संधी उपलब्ध असणे अशा कालबाह्य नियम -अटीं बाबत तातडीने कालसुसंगत बदल करावेत . तशी निवडणूक आयोगाची आणि राजकीय पक्षांची ईच्छाशक्ती नसेल तर भविष्यात उद्दिष्टपूर्तीला हरताळ फासणाऱ्या पदवीधर -शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका रद्द कराव्यात . असे मतदारसंघ बरखास्त करावेत .
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई . 9869226272
मोदी ३ सरकारने यावर गंभीर विचार करून आवश्यक ती घटना दुरूस्ती करावी. उमेदवारांसाठी कमीत कमी पदवी धारक व किमान दहा वर्षे ही पात्रता असावी. महाराष्ट्र सरकारने तशी शिफारस करावी.
उत्तर द्याहटवासुधीर कुलकर्णी
उत्तर द्याहटवाVery true.....
उत्तर द्याहटवालेख सडेतोड आहे. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांना थेट उतरता येत नाही, त्याप्रमाणे या निवडणुका घेणे हा त्यातल्या त्यात बरा उपाय ठरेल. अर्थात तसे केल्यावरही पक्षीय प्रभाव टाकला जाणारच, पण किमान काही उमेदवार तरी स्वतःच्या कार्यामुळे निवडून येऊ शकतात.
उत्तर द्याहटवापदवी प्राप्त व 10 वर्ष शिक्षक म्हणून सेवा हि अट योग्य वाटते
उत्तर द्याहटवामुळात याची गरज आहे का? यांचे विधान सभेतील किती प्रतिनिधी मानतात. हा फार्स आहे तो एखाद्या कार्यकर्त्याला खुर्ची मिळून देण्यासाठी आहे. जे कर दाते आहेत,त्यामध्यें छोटे मोठे उद्योजक यांचा सहभाग असणे गरजेचे असताना त्यांचा विचार केला जात नाही आणि मनमर्जी कोणताही कायदा व कर अनाठायी लावला जातो त्याबाबतीत चर्चा करण्यासाठी त्यांची आवश्यकता असताना त्यांना वंचित ठेवले जाते.😎
उत्तर द्याहटवा