THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, २१ मे, २०१९

मतमोजणी बाबत थोडक्यात

  उद्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे . या वेळेच्या मतमोजणीचे वेगळे वैशिष्टय म्हणजे व्ही व्ही पॅट .(Voter verifiable paper audit trail (VVPAT) )  व्ही व्ही पॅट बाबत अनेकांना संभ्रम आहे . ईव्हीएम ELECTRONIC VOTING MACHINE ) आणि व्हीव्हीपॅट या मतदान प्रक्रियेचे दोन वेगवेगळे स्वरूप नसून व्हीव्हीपॅट हे ईव्हीएम मशीनचे एक्सटेंशन आहे . गेल्या काही वर्षात ईव्हीएम मशीन बाबत विविध राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या म्हणून निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या वेळेपासून व्हीव्हीपॅट इंट्रोड्युस केले आहे .  मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने ज्या चिन्हाला मतदान केले आहे त्याचे चित्र ७ सेकंदासाठी डिस्प्ले होईल व त्याची प्रिंट जमा करणारा बॉक्स म्हणजे व्हीव्हीपॅट होय .
 

*अशी असेल मतमोजणी प्रक्रिया* :   उद्या सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम मशिन्स निवडणूक अधिकारी , सर्व पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडून मतदान मोजणी कक्षात आणल्या जातील . सकाळी आत वाजता पोस्टाने आलेले बॅलेट पेपर मोजले जातील .  ईव्हीएम मशीनच्या काउंटींगला ८. ३० वाजता प्रत्यक्ष सुरुवात होईल . साधारण १२ ते २० टेबल्स असतील आणि प्रत्येक टेबलवर एक इव्हीएमची काऊंटिंग केली जाईल . ईव्हीएम मशिन्स ने डिस्प्ले केलेला रिजल्ट प्रत्येक प्रतिनिधीस दाखवणे , त्याची नोंद करणे यासाठी साधारणपणे एका एव्हीएमची मोजणी करण्यास २० ते ३० मिनिटांचा कालावधी आवश्यक असतो .    मतदार संघांच्या आकारानुसार २२ ते ४० फेऱ्या असतील .
एकदा संपूर्ण ईव्हीएम मशिन्सची मोजणी झाल्यानंतर पूर्वी निकाल घोषित केला जात असे . यावेळेस मात्र निकाल घोषित करण्यापूर्वी मा . न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ बूथची  लॉटरी पद्धतीने निवड करून एव्हीम वरील निकाल व त्या ईव्हीएम मशीनशी संलग्न व्हीव्हीपॅट मधील चिठ्या यांची पडताळणी केली जाईल . सर्व साधारणपणे एका लोकसभा मतदार संघात ४ ते ६ विधानसभा मतदार संघ आहेत . अशा प्रकारे प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ बूथच्या व्हीव्हीपॅट ची पडताळणी करूनच निकाल घोषित केला जाईल . एका व्हीव्हीपॅट ची पडताळणी करण्यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागू शकतो . यामुळे अधिकृत अंतिम निकालासाठी साधारणपणे १२ ते १६ तास लागण्याची शक्यता आहे .
   व्हीव्हीपॅट पडताळणीमुळे मतमोजणी प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक झाली आहे हे मात्र निश्चितपणे दिसून येते .. चला तर वाट पाहू या प्रत्यक्ष निकालाची .. सुधीर दाणी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा