THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

राजकारणातील प्रामाणिक 'पाटीलकी 'ची अकाली एक्झि


       'आबा गेले …' हे वृत्त मनाला चटका लाऊन गेले . आपला माणूस गेल्यावर मनात जेवढे वादळ उढते तेवढेच वादळ आबाच्या जाण्याने उठले . आबांच्या अकाली जाण्याने प्रामाणिकपणाची हिच किंमत परमेश्वराकडे असते का ? असा प्रश्न क्षणभर चाटून गेला . प्रत्यक्ष 'असणारा ' आणि 'दाखवायचा ' असे २ चेहरे राजकारण्याचे असतात हे आता लोकांच्या पचनी पडले आहे मात्र त्यास आबा मात्र निसंशयपणे अपवाद होते . राष्ट्रवादी सारख्या पक्षात असूनही आणि दीर्घकाळ विविध अशी अत्यंत महत्वाची ' खाती ' सांभाळूनही आबावर मात्र कोणीही अंगुलीनिर्देश करू शकला नाही हीच त्यांच्या प्रामाणिकपणाची सर्वोत्तम पावती होय . पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य नेता असूनही आबांची कुठलीही शैक्षणिक संस्था , कारखाना नाही यातूनच स्पष्ट होते की आबांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग हा केवळ जनतेच्या कल्याणासाठीच केला हे अधोरेखीत होते आणि म्हणूनच त्यांच्या अंतयात्रेत "आपला माणूस '' चे फलक झळकताना दिसत असावेत .


         यशस्वी राजकारणी व्हायचे असेल तर निर्णय हे ' हितसंबंध , आर्थिक नफा -तोटा ' याची बेरीज-वजाबाकी करूनच घ्यावयाचे असतात या (अघोषित ) राजकीय संस्कृतीला छेद देत आबांनी ' डान्सबार बंदी ' सारखा  अनेक कुटुंबांची वाताहत थांबवणारा क्रांतिकारी निर्णय घेतला . पोलिसभरतीत पारदर्शकता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला  आणि म्हणूनच सामन्याच्या मनात राजकारणी असूनही आबांविषयी सहानुभूती होती . आबांनी अनेक महत्वपूर्ण पदावार कार्यरत असूनही सरकारी खर्चाने आपल्या कुटुंबाची ' जीवाची मुंबई ' करण्याचे कटाक्षाने टाळले हे अभावानेच आढळते .

         अजातशत्रू , निष्कलंक ,सुसंकृत , मातीशी नाळ कायम ठेवणारा , प्रामाणिक , सच्चा लोकसेवक 

यासम बिरुदावल्या अन्य राजकारण्यांच्या बाबतीत केवळ सोपस्कार म्हणून वापरल्या जात 

असल्यातरी मा. आबांच्या बाबतीत मात्र त्या तंतोतत लागू होतात आणि त्या लावताना हात 

धरधरत नाहीत यातच सर्व काही आले .  हिंदू -मुस्लिम 'तरुण -तरुणीने वा तरुणी -तरुणाने ' आपले एकमेकांवरील प्रेम सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणारी घटना जितकी दुर्मिळ आणि अपवादात्मक ठरते तितकीच ' निष्कलंक- प्रामाणिक -लोकसेवेला वाहून नेणारा आणि तोही राजकारणी असणे ' हेही वर्तमान आणि खास करून मागील २/३ दशकापासून दुर्मिळ- अपवादात्मक ठरत आहे . या पार्श्वभूमीवर राजकारणातील प्रामाणिकपणाची ' पाटीलकी ' जपनाऱ्या आबाच्या अकाली जाण्याने ' प्रामाणिक राजकारणाचे ' नुकसान झाले आहे  हे निश्चित .

       एक खंत मात्र कायम मनात राहील . आबांचे तंबाखू खाणे सर्वज्ञात होते आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली . या पार्श्वभूमीवर  नियतीने आबांना एखाद्या  ENTRYची संधी अजून दिली असती तर आबांनी राज्यात 'तंबाखू बंदी ' आणून अनेकांचे अकाली दुर्दैवी EXIT थोपवली असती हे निश्चित . अर्थातच आबांविषयी हळ हळ व्यक्त करणारे सर्वपक्षीय राजकारण्यांनी ठरवले तर ते आताही शक्य आहे आणि अशी "कृतीशील " श्रद्धांजली प्रामाणिक व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिक श्रद्धांजली ठरेल असे वाटते .

      शेवटी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे कदाचीत आबा अन्य पक्षात असते आणि गृहमंत्री असते तर त्यांनी भ्रष्टाचाराचा महामेरू ठरणाऱ्या पोलीस 'खात्यात ' पराकोटीची पारदर्शकता आणत एक आदर्श निर्माण केला असता. पराकोटीची संवेदनशील आणि प्रामाणिक व्यक्तीकडूनच जनतेला कृतीशील प्रामाणिकतेची अपेक्षा असते .


        दीर्घकाळ राजकारणात राहूनही आपल्यातला 'आम आदमी ' जिंवत ठेवणारया मा . रावसाहेब राजराम तथा आरआरना महाराष्ट्रातील तमाम आम आदमीच्या वतीने मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा