" मतदानाला डिसेंबरचा मुहूर्त ?" अशी प्रसारमाध्यमातून चर्चा आहे . निवडणूक आयोगाची स्वायत्तता यातून प्रश्नांकित होते . त्या त्या पक्षा प्रतीचा अंधभक्तांचा चष्मा उतरवून डोळसपणे पाहिल्यास एकुणातच सर्वच यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते . अगदी राज्य सरकार देखील त्यास अपवाद असत नाही .
!!
महाराष्ट्राचे गेल्या ५ वर्षाचे खास वैशिष्ट्य हे की २०१९ च्या निवडणूक निकालानंतर आजपर्यत सर्वच राजकीय पक्षाचे आमदार हे सत्ताधारी आणि विरोधी भूमिकेत राहिलेले आहेत . ५ वर्षाच्या कार्यकाळात महाआघाडी आणि महायुती या दोन्हीची राजवट जनतेला अनुभवाची संधी प्राप्त झालेली आहे . दोघांच्या कारभाराची तुलना करता एकाला झाकावा तर दुसरा उघडा पडतो अशा प्रकारात मोडताना दिसते . जनतेच्या सेवेसाठी अशा वलग्ना करत दोघांनीही सत्ताप्राप्ती केलेली असली तरी दोघांनाही एकमेकांवर कुरघोडीच्या खेळात जनतेच्या ईच्छा आकांक्षाला पायदळी तुडवलेली दिसते . दिवभरात १२/१४ काम करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांचा वेळ हा राजकीय कुरघोडीतच वाया जातो आहे .
सर्वात खेदाची गोष्ट हि की , राजकीय कुरघोडीच्या नादात सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कमरेचे काढून डोक्याला गुंडाळण्यात धन्यता मानलेली असल्याने प्रशासनावर ना आघाडी सरकारची पकड दिसली ना महायुतीची .
प्रशासन प्राप्त संधीचे सोने करून "लाचखोरी , भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सरकारी तिजोरी लुटण्यात मग्न आहे . शिक्षण , आरोग्य , कायदा सुव्यवस्था याबाबतीत महाराष्ट्राची पीछेहाट होताना दिसते आहे . करोडो रुपये खर्च करून डांबरी आणि सिमेंटचे रस्ते एकाच पावसाळ्यात उघडले जात असल्याने "भ्रष्टचार मुक्त पारदर्शक कारभाराचे " पितळ जनतेसमोर उघडे पडलेले आहे . एकुणातच केलेल्या कारभाराच्या जोरावर पुन्हा जनता सत्तेवर बसवेल की नाही याची खात्रीच उरलेली नसल्याने "लाडक्या योजनांचे " पांघरूण टाकण्याची वेळ आलेली दिसते .
विरोधी पक्ष देखील एकीकडे "लाडकी बहीण " योजनेवर टीका करताना दिसतो तर दुसरीकडे आम्ही सत्तेत आल्यावर हि योजना जास्त जोमाने राबवू अशी घोषणा देखील करते . अशी दुट्टपी भूमिका 'दिशाहीनता ' अधोरेखित करते . योजनाच मुळात योग्य नसल्यास ती वर्तमान सरकारने राबवली काय किंवा भविष्यात सत्तेत आल्यास वर्तमानातील विरोधी पक्षाने राबवली काय , गैर ते गैरच ! माझा तो बाळ्या , दुसऱ्याचे ते कार्टे हि भूमिका क्या उपयोगाची ?
असो ! गेल्या ५ वर्षातील सर्वच राजकीय पक्षांचा कारभार पाहता जनतेची हि इच्छा आहे की , महाराष्ट्रात वर्तमान विधानसभेची मुदत संपल्यानंतर पुढील ६ महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लावावी . त्या ६ महिन्यांच्या काळात 'पुरोगामी महाराष्ट्रातील " सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना मोकळा वेळ लाभेल व त्या काळात एकमेकांवर काय आरोप -प्रत्यारोप करायचे आहेत ते करण्याची 'सुवर्ण संधी ' मिळू शकेल .
होय ! त्याच बरोबर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आरोपांना योग्य त्या प्रकारे कव्हरेज मिळावे यासाठी वर्तमानातील वृत्तवाहिन्यांनी या कालावधीसाठी आपला संपूर्ण 'बहुमूल्य वेळ " हा राजकीय कुरघोडींचे लाईव्ह करून आपली लोकशाहीचा चौथा स्तंभ हि भूमिका प्रामाणिकपणे बजावावी .
तसेही गेल्या ३/४ वर्षांपासून बहुतांश ठिकाणी नगरसेवक नसूनही जनतेला त्यांची तसूभरही उणीव भासलेली नाही . अर्थातच हे त्यांच्या आजवरील कर्माचे ते फळ आहे . तद्वतच आमदार असले काय आणि नसले काय ? सरकार असले काय आणि नसले काय सामान्य नागरिकांना काय फरक पडतो .
संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची हीच जनभावना झालेली आहे की .... पुरे झाला आता राजकीय तमाशा! महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगू नका !! बस झाला ! सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा राजकीय तमाशा !
सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .
प्रथम भाजपा शिवसेना युतीला जनतेने बहुमताने निवडून दिले. तो पर्यंत ठिकठाक होते असे म्हणावे लागते.
उत्तर द्याहटवात्यानंतर जनतेच्या निर्णयाचा अपमान करत, ज्या पक्षाला सुज्ञ जनतेने बाहेर बसवले त्यांच्याशी युती करुन जनतेला त्यांची खरी जागा दाखवली आणि आपला इरादा,
मनसुबा प्रत्यक्षात आणला. लोकशाहीतील अमोघ सवलतींचा उपयोग करुन सत्तेवर लडखडत बसले.
नंतर तत्कालीन विरोधी पक्षांनी जमवाजमव करत सत्ता प्राप्त केली. येतील त्यांना पावन करुन सहभागी करुन सत्ता वाटून घेतली.
आता या सर्वांचे मनःपुर्वक आभार मानुन या
सर्वांनां राजकिय तडजोडी, कुरघोडी करण्यासाठी सहा महिने तरी घरी बसवलेच पाहिजे.
एकूणच ह्या देशात राजकीय परिस्थिती फार वेगळी नाही. सर्व जनादेश धाब्यावर मांडून सत्तेसाठी काहीही म्हणजे, केंद्रीय स्वायत्त यंत्रणेचा वापर स्वतःसाठी करून सर्व नीतिमत्ता गुंडाळून सत्ता काबीज करण्याची वृत्ती देशाला घातक आहे.
उत्तर द्याहटवाविरोधी पक्ष औषधालाही ठेवायचा नाही असा सत्ताधार्यांनी चंगच बांधलेला दिसतो.
एक दिवसाचा मतदार राजा सुद्धा आता विकला जाऊ लागला. आता खरं म्हणजे जनतेला राजकारण समजवून त्याचे महत्त्व समजावून सांगणारा राजकारणापलिकडील तयार होऊन अश्या प्रवृत्ती च्या विरोधात क्रांती घडविण्यासाठी जाणकार आणि निष्कलंक लोकांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांती झाली तशीच क्रांती देशाला वाचवू शकते.
आपण हे योग्य कार्य करत आहात, आपले शतशः आभार,
धन्यवाद