THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, ७ जुलै, २०२४

सायबर फ्रॉडच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वैयक्तिक सजगता , सतर्कता हाच एकमेव सर्वोत्तम पर्याय !

 

[सौजन्य : google ]

    विशेष सूचना : जनजागृती साठी हा ब्लॉग शेअर करण्यास हरकत नाही . शेअर करण्याबरोबरच या विषयावर आपल्या कुटुंबातील सदस्यांशी या विषयावर नक्की चर्चा करा .  जागृती , सजगता हाच फसवणूक टाळण्यावरील सर्वोत्तम उपाय आहे .

 

            विषयाला हात घालण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंतीवजा सूचना आहे की  अलीकडच्या काळात  सायबर फ्रॉड म्हणजेच  तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक फसवणुकीचे प्रकार अत्यंत मोठ्या प्रमाणावर  वाढलेले आहेत .  मोबाईलवरून कॉल , अनधिकृत लिंक्स , व्हाट्सअँप कॉल ,मेसेज अशा विविध माध्यमातून  रोज अनेकांची फसवणूक केली जात आहे .  यावरील सर्वोत्तम एकमेव उपाय म्हणजे "वैयक्तिक पातळीवरील सजगता ,सतर्कता "  . त्यामुळे अशा पद्धतीने फसवणूक टाळावयाची असेल तर सतर्क रहा ! आर्थिक  फसवणूक टाळा !! 

              स्वतःची ,कुटुंबाची , समाजाची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत हा मेसेज  पोहचायला हवा त्यावर   प्रत्येक कुटुंबातीत चर्चा व्हायला हवी ,  मुला -मुलींना जागृत केले जावे या उद्देशाने हा लेख लिहला आहे .

      फसवणारे फसवत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे सायबर क्राईम बाबत , सायबर फ्रॉड बाबत असणारे अज्ञान .  त्यामुळे हि गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घेणे आवश्यक आहे की  कुठलीही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठीचा एकमेव आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येकाने अत्यंत सजग असणे , सतर्क असणे नागरिक सजग नसल्याने रोज अनेकांची आर्थिक फसवणूक होते आहे . अगदी सुशिक्षित , उच्चशिक्षित मंडळी देखील 'सायबर क्राईम ' चे बळी ठरत आहेत .  यावरील एकमेव उपाय म्हणजे प्रत्येकाने अत्यंत सजग ,सतर्क राहणे .

फसवणुकीचे प्रकार संभाव्य उपाय :

]  मी पोलीस अधिकारी असून   मुलामुलींना ड्र्ग्स केस मध्ये पकडले आहे  . त्यात तुमचा मुलगा -मुलगी आहे . त्याची /तिची अटक टाळण्यासाठी अमुक -तमुक खात्यावर विशिष्ट रक्कम जमा करा अन्यथा तुमच्या मुला -मुलीला अटक केली जाईल .    मी कस्टम अधिकारी असून तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आढळले आहे  . पार्सल सोडवणूक करण्यासाठी अमुक -तमुक रक्कम विशिष्ट खात्यात  ट्रान्स्फर करा .

सतर्कता : घाबरून जाऊ नका .  एक साधी गोष्ट लक्षात घ्या . लाच कधी बँक अकाऊंटच्या माध्यमातून स्वीकारली जाते का ? नाही ना ! याचा थेट अर्थ हाच निघतो की  समोरील व्यक्ती पोलिसांच्या ड्रेसच्या वेशात , पोलिसांचे  फेक आयकार्ड वापरून तुमची फसवणूक करत आहे .  फसवणूक झाल्यास तातडीने १९३०  हा क्रमांक डायल करा .   ( हा नंबर प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर सेव्ह करावा ) या क्रमांकावर तातडीने डायल केल्यास पैशाचे ट्रान्स्फर (Transaction ) थांबवले जाऊ शकते .  त्याच बरोबर National Cyber Crime Reporting Portal वर जाऊन आपली तक्रार नोंदवावी .

 पार्सल मध्ये ड्रग्स असेल तर तुम्ही दोषी कसे ? तो पाठवणारा दोषी ठरतो . ड्रग्सचे व्यवहार हे 'अधिकृत ' पणे  होऊच शकत नाही त्यामुळे पार्सल मध्ये ड्रग्स आहे असा फोन आला तर घाबरू नका .

] न्यूड कॉल : समोरील व्यक्ती  व्हाट्सअँप व्हिडीओ कॉल करून आपले कपडे हळू हळू उतरवून ,  , तुम्हाला देखील कपडे काढण्यास भाग पाडते . त्याचे चित्रीकरण करून तदनंतर  हा व्हिडीओ तुमच्या कुटुंबियांना पाठवू , मित्र -मैत्रिणींना पाठवू , सोशल मीडियावर टाकू अशा प्रकारची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जातो .  मोठ्या रकमेची मागणी केली जाते .

सतर्कता : अनोळखी क्रमांकावरील व्हिडीओ कॉल कटाक्षाने टाळाच  कारण  सर्वसाधारणपणे आपण ज्या नातेवाईकांशी व्हिडीओ कॉल करून बोलतो त्यांचे मोबाईल नंबर सेव्ह असतात  . अनोळखी व्यक्ती तुम्हाला थेट व्हिडीओ कॉल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .  चुकून कॉल स्वीकारला आणि काही गैरप्रकार घडला तरी  घाबरून जाऊ नका . सर्वात आधी तो नंबर ब्लॉक करा . त्यानंतर काही दिवस कुठलेही अनोळखी कॉल स्वीकारू नका .  प्रत्येक शहरात सायबर क्राईम बाबत स्वतंत्र विभाग असतात त्या ठिकाणी  माहिती द्या .

 

] केवायसी  {KYC: KNOW  YOUR CUSTOMER} व्हेरिफिकेशन :    आम्ही बँकेतून बोलतोय , आम्ही टेलिफोन कंपनीकडून बोलतोय आणि तुमचे  केवायसी  करणे गरजेचे आहे . अन्यथा तुमचे खाते ब्लॉक केले जाईल , सिम कार्ड बंद केले जाईल असे सांगितले जाते .  तुमच्याकडून आधार , मोबाईल क्रमांक आणि ओटीपी घेऊन थेट खात्यातून रक्कम काढली जाते .

सतर्कता :  केवायसी  म्हणजे तुमची ओळखीची खात्री करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे . असा कॉल आल्यास लक्षात घ्या की  हा फेक कॉल आहे . कारण बँक , टेलिफोन कंपन्या शक्यतो ग्राहकांना थेट फोन करत नाहीत . आपण सिम कार्ड सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच सिमकार्ड घेत असतो त्यामुळे टेलिफोन कंपन्या केवायसी साठी कॉल करत नाहीत . बँकेत वर्षांनी  केवायसी  करणे गरजेचे असते . परंतू  केवायसी साठी कधीच तातडीने अकाउंट ब्लॉक केले जात नाही . ग्राहकांना वारंवार ईमेल केला जातो , एसएमएस केला जातो .  त्यामुळे शक्यतो मोबाईल कॉल वर केवायसी च्या भानगडीत पडू नका . थेट बँकेत जाऊनच संपर्क करा .  आणखी एक उपाय म्हणजे वर्षाच्या कालावधीत एकदा बँकेत जाऊन केवायसी अपडेट करून घेणे .

]  लाईटचे कनेक्शन कट करण्याबाबत:  तुम्ही लाईट बिल भरलेले नसल्याने आज अमुक तमुक वाजता तुमचे वीज कनेक्शन कट केले जाईल . आपणास पाठवलेल्या  लिंकवर क्लिक करून  तातडीने वीज बिल भरा . 

सतर्कता : वीज बिल भरण्यासाठी प्रत्येक वीज कंपनीचे अधिकृत अँप असतात . लिंक पाठवून वीज बिल भरण्याची मागणी कोणतीच वीज कंपनी करत नाही . सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉल करणाऱ्याला थेट सांगायचे की  " या आणि वीज कापा " . त्यानंतर अधिकृत अँप वर जाऊन आपल्या  बिला बाबतची स्थिती जाणून घ्या .  ज्या कंपन्या त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर लवकर प्रतिसाद देत नाहीत त्या कंपन्या एवढी कार्यक्षमता दाखवत ग्राहकांना कॉल कशाला करतील ?

] शेअर ट्रेडिंग व्हाट्सअँप ग्रुप : अलीकडच्या काळात शेअर ट्रेडिंग बाबतचे ग्रुप मध्ये तुम्हाला ऍड केले जाते . त्या ग्रुपवर सातत्याने असे मेसेज टाकले जातात की  मी अमुक तमुक रक्कम गुंतवली आणि मला महिन्यातच त्याच्या काहीपट फायदा झाला .  असे टाकणारी मंडळी फसवणूक करणाऱ्यांचेच साथीदार असतात .

सतर्कता : सर्वात महत्वाची बाब हि लक्षात ठेवा की  एखाद्या ठिकाणी फायदा होत असेल तर आजच्या स्वार्थी दुनियेत स्वतःचा त्याचा लाभ घेता तो लाभ दुसऱ्याला कशासाठी करून दिला जाईल  . "  कमी कालावधीत मोठा फायदा " अशा स्कीम १०० टक्के नव्हे तर अगदी १००० टक्के फसव्या असतात हि बाबत लक्षात ठेवा . 

सर्वात महत्वाची बाब : अशा फ्रॉड कॉल्स मुळे तुमच्या सतर्कतेमुळे फसवणूक झाली नाही तरी तो  येणारा मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्या बरोबरच  रिपोर्ट करा . वारंवार रिपोर्ट केले जाणारे मोबाईल क्रमांक  मोबाईल कंपन्याकरून ब्लॉक केले जातात . त्यामुळे त्या सिम कार्डच्या माध्यमातून  इतरांची होणारी फसवणूक टाळली जाऊ शकते .

] फिशिंग :फिशिंग हॅकिंगची अशी पद्धत आहे ज्यामध्ये हॅकर आपल्या बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे आयडी पासवर्ड माहीत करुन घेण्यासाठी आपल्याला एसएमएस किंवा -मेल पाठवतात.

सतर्कता :  क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड , इंटरनेट बँकिंग संदर्भातील पासवर्ड कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही शेअर करून नका . त्यांना 'गोपनीय ' या संबोधले जाते की  ते कोणालाही शेअर करू नये . आर्थिक लोभापाई कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका .

सायबर क्राईम करणारी मंडळी कालसुसंगत नवनवीन फसवणुकीचे प्रकार शोधून काढत असतात . गरज आहे त्यांच्या पुढे एक पाऊल राहण्याची आणि ते पाऊल म्हणजे प्रत्येक नागरिकाची सतर्कता ,सजगता .

 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी  संपर्क : ९८६९२२६२७२  ईमेल : danisudhir@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा