THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

पालिकेने सूर्योदय -सूर्यास्ताच्या वेळेस अनुसरून पथदिव्याचे नियोजन करून वीजबचतीचा कृतियुक्त अंगीकार करावा ...

 

प्रति ,                                                                                                                १५ मार्च २०२१

मा .आयुक्त ,

नवी मुंबई ,

महानगर पालिका नवी मुंबई .

 

विषय : पालिकेने सूर्योदय -सूर्यास्ताच्या वेळेस अनुसरून पथदिव्याचे नियोजन करून वीजबचतीचा कृतियुक्त अंगीकार करावा ...

 

 महोदय ,

             आज १५ मार्च . ग्राहक हक्क दिन . आम्ही करदाते हे नवी मुंबई पालिकेच्या विविध सेवांचे ग्राहक आहोत . आमच्या ग्राहक हक्कातून आम्हा करदात्या नागरिकांची हि मागणी आहे की , आम्ही भरलेल्या कराचा विनियोग वीज उधळपट्टीच्या बिलावर नव्हे तर तो विकासकामांवर व्हायला हवा . या अनुषंगाने हा पत्रप्रपंच.

  उक्तीस विसंगत कृती हा बहुतांश शासकीय यंत्रणेचे व्यवच्छेदक लक्षण झालेले आहे . नवी मुंबई महानगर पालिका देखील त्यास अपवाद दिसत नाही . एकीकडे 'वीज बचतीचे संदेश " देणारे भित्तीपत्रके तर दुसरीकडे 'सूर्याशी स्पर्धा करणारे पथदिवे ". 

       नवी मुंबईत सुमारे ४० हजारांच्या आसपास पथदिवे आहेत. पालिकेने या पथदिव्याच्या नियोजनासाठी २२ विभागात कंत्राटदारांची नियुक्ती केलेली  आहे . मोठ्या मोठ्या रकमेचे कंत्राट पथदिवे 'चालू -बंद " करण्यासाठी दिलेले असताना आणि 'photo  sensitive  ' पद्धतीचा अवलंब करण्यासाठी करोडो रुपये खर्च केलेला असताना देखील पथदिवे "अवेळी " सुरु असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे .

             जी पालिका वीजबचतीसाठी सोडियम व्हेपर लॅम्प्स बदलून एलईडी लावण्यावर करोडो रुपये खर्च करते तीच पालिका दुसरीकडे पथदिव्यांच्या अनियोजित -अनियंत्रित व्यवस्थापनातून करोडो रुपयांच्या विजेची उधळपट्टी करताना दिसते . किती हि विसंगत कृती

   प्रातिनिधिक स्वरूपात सोबत जोडलेले फोटो हे  दिनांक ११ मार्च २०२१ आणि १४ मार्च २०२१ चे  पारसिक हिलवरील असून  त्यात पथदिवे  सांयकाळी  ५. ४० आणि ५.४७ वाजता सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे . यात चालू असलेला पथदिवा आणि सूर्य हे दोन्हीही दिसत आहेत .  याचा अर्थ तो त्या  आधीच काही वेळे पासून सुरु असणार . पारसिक हिलवरून पाहिले तर अनेक ठिकाणचे पथदिवे हे सूर्यास्ताच्या खूप वेळ आधी आणि सकाळी सूर्योदयानंतर देखील खूप वेळ सुरु असतात .

     दिनांक ११ मार्चची सूर्योदयाची वेळ हि . ४८ ची असून सूर्यास्ताची वेळ हि . ४६ वाजताची आहे  . सर्वसाधारणपणे सूर्योदयाच्या १५ मिनिटे आधी आणि सूर्यास्ताच्या १५ मिनिटे नंतर पर्यंत 'स्ट्रीट लाईटची ' आवश्यकता नसते .  आगामी काळात सूर्योदयाची वेळ अधिक लवकर तर सूर्यास्ताची वेळ अधिक उशिराची होत जाईल .  सर्वसाधारणे पणे  उन्हाळ्यात ते . १५ पर्यंत सूर्याचा प्रकाश असतो .

         नवी मुंबईकर नागरिकांची हीच मागणी आहे की , नवी मुंबई महानगर पालिकेने पथदिव्याचे नियोजन हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस अनुसरून  करावे . अशा प्रकारच्या  नियोजनामुळे लाखो रुपयांची वीज आणि त्या पोटी नागरिकांच्या कराचा होणारा अपव्यय टाळला जाऊ शकतो .

 



  आजवर अनेक प्रसारमाध्यमांनी हा  विषय 'प्रकाश'झोतात आणलेला आहे तरी देखील नवी मुंबई पालिका प्रशासनाच्या डोक्यात 'प्रकाश ' का पडत नाही हा संशोधनाचा विषय आहे .

    जनतेच्या सूचनांना  , प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना कानाआड करत विजेची उधळपट्टी करून पालिका नेमके काय साध्य करू पाहत आहे . पालिका प्रशासनाचा कंत्राटदारावर  अंकुश राहिलेला नाही का ? कंत्राट देताना  पथदिवे चालू -बंद करण्याचे काही निकष असतात की नाही ? असतील तर त्याचे पालन का केले जात नाही ? कंत्राटातील अटी -शर्तींचा भंग होत असेल तर पालिका प्रशासन सदरील कंत्रादाराना आर्थिक दंड का ठोठावत नाही ? त्यांचे कंत्राट का रद्द करत नाही .

             पालिका प्रशासन आधी आपला स्वार्थ आणि मग लोकहित या सूत्रानुसार चालत असले तरी किमान विजेची उधळपट्टी करण्यात पालिकेचा नेमका काय  स्वार्थ आहे ?  नागरिकांनी किती वेळा या विरोधात आवाज उठवायचा ? पालिकेला नागरिकांच्या सूचना /भावना लक्षातच घ्यायच्या नसतील तर पालिका प्रशासनाने एकदा परिपत्रक काढून " पालिकेच्या कारभारात नागरिकांनी ढवळाढवळ करू नये " असे जाहीर करावे जेणेकरून नागरिकांच्या वेळेचा अपव्यय तरी टाळला जाऊ शकेल .

              पथदिवे नियोजनात नागरिकांचा सहभाग वाढणव्यासाठी पालिकेने एखादा व्हाटसप नंबर द्यावा किंवा अन्य सुविधा द्यावी

 

सुधीर दाणी , बेलापूर , नवी मुंबई . 9869226272

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा