THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

…… अन्यथा " प्रामाणिक पंतप्रधान " हि अंधश्रद्धाच ?



      
         प्रामाणिकता , स्वच्छ प्रतिमा हि केवळ मिरवण्याची आभूषणे नसून ते प्रत्यक्ष कृतीतून

सातत्याने सिध्द करावायचे सदगुण असतात . एखाद्या व्यक्तीने सुवर्णपदक मिळविले तर तो तहयात

' सुवर्णपदक विजेता ' हि बिरुदावली आपल्या नामामागे मिरवू शकतो , नव्हे तो त्याचा हक्कच

ठरतो . डॉक्टरची पदवी प्राप्त केली की प्रत्यक्षात दवाखाना चालवला नाही तरी ती व्यक्ती ' डॉ. '  हे

बिरुद वापरू शकतो परंतु ' प्रामाणिक ' बिरुदाच्या बाबतीत तसे संभवत नाही,

पदोपदी त्या व्यक्तीला हा गुण कृतीतून सिद्ध (च)

करावा लागतो अन्यथा प्रामाणिकता हि वांझोटी ठरण्याचा धोका संभवतो . दुर्दैवाने 

देशाच्या पंतप्रधानाच्या बाबतीत हाच धोका संभवतो आहे .


       देशातील नं .२ (चांगल्या अर्थाने !) पदावर मा . मनमोहनसिंग गेल्या ९ वर्षापासून कार्यरत

आहेत . त्यांची ख्याती ते पराकोटीचे ' प्रामाणिक ' अशी आहे

आणि त्याची प्रचीती त्यांनी आपली अर्थतज्ञ या नात्याने वेळोवेळी अधोरेखीत केली आहे .

देशाच्या सुदैवाने ते पंतप्रधान झाले आणि देशवासीयांच्या त्यांच्या बाबतच्या आशा अधिकच

पल्लवित झाल्या . दुर्दैवाने गेल्या ९ वर्षाचा कार्यकाळाचे सिंहावलोकन करता देशात जे काही मोठे

आर्थीक घोटाळे झाले , गैरप्रकार उघडकीस आले त्याचा आलेख स्वातंत्र्यपश्चात काळात सर्वाधिक आहे

हे नाकारता येणार नाही .


     संविधानिक दृष्ट्या सर्वात महत्वाचे पंतप्रधान हे पद असल्यामुळे ' चांगले - वाईट ' याचे

संपूर्ण श्रेय-अपयश नैसर्गिक न्यायाने त्यांचाकडेच जाते. 'आघाडीचे सरकार ' हे मनमोहन

सिंगच्या प्रामाणिक कार्यशैलीतील सर्वात मोठा अडसर ठरतो हि ढाल त्यांच्या समर्थकाकडून

सातत्याने पुढ केली जाते परंतु ती सबब लटकी / तकलादू ठरते . अणुकराराचा विषय

असो कि नुकतेच मा . सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधीना अपात्र

ठरविण्याच्या निवाड्याला लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करून शोधलेली 'पळवाट ' असो ते  

त्यांना हवे ते आणि त्यांची इच्छा असेल तर " करून दाखवतात " हेच सिध्द करते . " आले

सोनियांच्या मना  " याची पूर्तता करण्यासाठी सरकार दावणीला लावण्याचे धारिष्ट्य

अन्नसुरक्षा विधेयकासाठी लावणाऱ्या पंतप्रधानांना 'आघाडीचे सरकार ' आडकाठी ठरते हे ग्राह्य धरावे

असा अट्टाहास असणाराऱ्यानी मूर्खाच्या नंदनवनात राज्य करणे इष्ट ठरते.  सांघिक सोडा जे खाते

स्वतः पंतप्रधानाच्या अखत्यारीत येते त्या कोळसा खात्यातील 257 फाईल गहाळ होतात हे

कोणत्या प्रामाणिकतेच्या भाषेत मोडते याचा खुलासा होणे गरजेचे वाटते . फाईल  गहाळ झाल्या हे

मान्य  केले हेच जर " प्रामाणिकता " ठरत असेल तर हि प्रामाणिकता देशाला कोणत्या

'महासत्तेच्या ' दिशेने नेणार याचेही संशोधन व्हावयास हवे .


       राजकीय आरोप -प्रत्यारोपातून प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभा करणे एक वेळेस


प्रसामाध्यमांनी आणि जनतेने दुर्लक्षित करणे क्षम्य ठरू शकते परंतु ज्या प्रकारे सामाजिक स्तरावर

विविध विचारवंताच्या भाषणातून , उद्योगपतींच्या मतातून , सोशियल साईट च्या माध्यमातून ,

चौकाचौकातून सामान्य माणसाच्या प्रतिक्रियातून जेंव्हा देशाच्या संविधानिक दृष्ट्या सर्वोच्च पदावर

असणाऱ्या  व्यक्तीच्या प्रामाणिकते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते  हे निश्चितच प्रगतीशील

लोकशाही देशासाठी सुचिन्ह नव्हे . त्याचा गांभिर्याने विचार व्हावयास (च)हवा .


     आज देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे .  रिझर्व बँकेने वेळोवेळी उपाय


योजूनही  रुपया डॉलर समोर अक्षरशः सास्टांग दंडवत घालतो आहे , पौंडाने शभरी ओलांडली आहे ,


विकास दर ढासळतो आहे या सम  गोष्टी होण्यामागे सरकारची ढासळती विश्वासार्हता हे  प्रमुख

कारण आहे हे नाकारण्यात शहाणपण नाही . सरकारचे कप्तान म्हणून याचे  संपूर्ण उत्तरदायित्व 

पतंप्रधाना कडेच  जाते या विषयी दुमत संभवत नाही . या नैसर्गिक आणि संविधानिक

 उत्तरदायित्वाच्या न्यायाने हि संपूर्ण जबाबदारी  मा  पंतप्रधान मनमोहन सिंगाची  आहे . भविष्यात

आपल्या प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या (?) जोरावर संपूर्ण भारतवासियांना  आश्वस्त करावे जेणे

करून देशात आर्थिक स्थैर्य लाभेल , भ्रष्टाचाराला प्रतिबंध बसेल , सामाजिक सुरक्षितता वृद्धिगत होईल

हे पाहावे . प्रामाणिकता हि  वेळोवेळी सिद्धच करावयाचा गुण  आहे  , प्रामाणिकता हे मिरवण्याचे

आभूषण नक्कीच नाही  म्हणून जो  पर्यंत देशाचा  प्रमुख या नात्याने  जो पर्यंत प्रत्येक निर्णयात

-घटनेत  प्रामणिकतेचे  प्रतिबिंब पडत नाही आणि सामान्य नागरिकांना त्याची  प्रत्यक्ष प्रचीती 

येत नाही तो पर्यंत भविष्यात पंतप्रधान " प्रामाणिक " हा अपप्रचार थांबवावा ! अर्थातच व्यापक

अर्थाने  राज्यात आणि केंद्रात  ज्या -ज्या व्यक्तीच्या  त्याची  काळानुसार प्रत्येक ठराविक

काळानंतर पुनर्परीक्षण करायला हवे . व्यक्ती म्हणून पंतप्रधानाविषयी आदर निश्चितच आहे परंतु

लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी जे असमत असतील त्यांनी गेल्या १ ० वर्षात व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त

होण्यासाठी , व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी कोणते उपाय योजिले , त्याची प्रत्यक्षात

अंमलबजावणी झाली आणि त्याचे परिणाम दिसून आले या विषयीची माहिती जनतेसमोर मांडावी .

आंधळे समर्थन कोणत्याही व्यक्ती बाबत घातकच ठरते .


     …. …. कोणत्याही व्यक्तीचा केवळ इतिहास त्याच्या वर्तमान कर्तुत्वाच्या परिमाणाचे मोजमाप

करण्यास पुरेसा ठरत नाही , कर्तुत्वान व्यक्तीला आपल्या प्रत्येक पदावर ते कोरूनच

भविष्यातला इतिहास घडवावा लागतो हा आपला इतिहास आहे हे लक्षात घ्यायला हवे .

....अन्यथा प्रसारमाध्यमांनी पुन्हा पुन्हा " प्रामाणिक पंतप्रधान " असा उल्लेख

हि अंधश्रद्धाच ठरते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा