भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे , महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे
हा दांभिकपणा
जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येवर भाष्य
करणे , प्रतिक्रिया देणे निरर्थक ठरते .
दाभोलकरांच्या
निकटवर्तीयांनी त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर
एका वाहिनीला दिलेली प्रतिक्रिया मात्र
सरकारच्या डोळ्यात ( बंद ? ) झणझणीत अंजन
घालणारी आहे . त्यांनी सांगितले
( खरे बोलू !) " मला सरकारकडून
फारशी काही आशा
नाही ". याचा अर्थ असा की मारेकरांना पकडून काही शिक्षा होईल
वा भविष्यात अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक संमत होईल याविषयी आशादायी चित्र नाही .
अर्थातच जनसामान्यांची
देखील हीच भावना आहे आणि या पूर्वीच्या अनुभवातून
ती निर्माण झालेली आहे . माहिती कार्यकर्ते
सतीश शेट्टीचे उदाहरण यासाठी पुरेसे बोलके
आहे .
भारतीय लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांचे
सरळ सरळ " धार्मिक ध्रुवीकरण "
झालेले दिसते . त्यामुळे धर्मनिरपेक्षता हि
केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे हे वास्तव
आहे
. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य
आहे अशी सातत्याने दवंडी पिटली जाते , यात
प्रसारमाध्यमांचा देखील सिंहाचा वाटा आहे . प्रत्यक्षात ज्या राज्यात
अंधश्रद्धे विरोधातील
विधयक सातत्याने डावलले जाते , जातपंचायतीच्या निर्णयावर समाजाला नाचवले
जाते ,
स्रीभृणहत्या थांबत नाहीत
, बलात्कार करणाऱ्यांना वर्षानुवर्षे शिक्षा होत
नाही त्या राज्याला पुरोगामी म्हणून संबोधणे हिच खरी अंधश्रद्धा आहे असे म्हणणे
खचितच अयोग्य ठरणार नाही . पुरोगामित्वाच्या परिभाषेत
हे सर्व बसते का ?
याचा उहापोह होणे गरजेचे वाटते , अन्यथा हे केवळ मृगजळ / दिशाभूलच ठरते.
आज दाभोलकरांच्या हत्तेनंतर प्रसारमाध्यमे
खास करून टीव्ही वाहिन्या 'टीव -टीव ' करत
आहेत . या सर्वाना सामान्य जनतेचा प्रश्न हा आहे की , हे विधेयक
सरकारच्या गळी उतरविण्यासाठी , ज्यांचा याला विरोध आहे त्यांचे पितळ उघडे
पाडण्यासाठी म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणते कर्तव्य बजावले .
प्रसारमाध्यमांची केवळ ' प्रतिक्रिया ' वादी भूमिका सवेंदनशुन्यच ठरते . अंधश्रध विधेयक
पास करून घेणे हि केवळ
एकट्या दाभोलकरांची जबाबदारी होती काय ? डॉ .
दाभोलकरांची ची हत्या हि केवळ व्यक्तीची
हत्या नसून दुष्ट्प्रवृतीने अहिंसात्मक -
सतप्रवृती -विवेकी विचारांचा गळा घोटण्याचा
प्रकार आहे . विरोधाला थेट संपवायचेच
हि नवी संस्कृती महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात
रुजताना दिसते आहे आणि हे सर्वात
जास्त घातक दिसते .
सर्वात महत्वाचे हे की , ज्या राजकीय पक्षांनी -नेतृत्वानी दाभोलकर प्रस्तुत
महाराष्ट्राच्या अंधश्रध विधेयकाला आजपर्यंत त्यांनी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस
मंत्रालयाचा उबराठा
झिजवूनही केवळ वाटण्याच्या अक्षदा दाखविल्या त्यांना दाभोलकर
कुटुंबियांचे सांत्वन
करण्याचा , हत्तेविषयी हळहळ करण्याचा नैतिक अधिकार
उरतो का ?
जर सरकारला 'हो ' असे वाटत असेल तर पुढच्या अधिवेशनाच्या
पहिल्या दिवशी संबंधीत
विधयक एकमताने संमत करावे , हीच खरी या दिव्य आत्म्याला आदरांजली ठरेल
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा