आता “ हे ” स्वातंत्र्य हवे .....
कृषी प्रधान देशात आता
शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे ,
...ते बाजार समित्यां , दलालां पासून !
पालक
-विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य हवे ,
...ते लूट
करणाऱ्या शिक्षण संस्थांपासून !
माता-भगिनींना
स्वातंत्र्य हवे ,
... ते बलात्कारी नराधम-पिशाच्च वृतीपासून
!
रोग्यांना स्वातंत्र्य
हवे ,
... ते रोगापेक्षा भयाण ठरणाऱ्या मेडिकल
बिलांपासून !
जनतेला स्वातंत्र्य
हवे ,
... ते संवेदनशुन्य प्रशासन आणि कोडग्या
राजकारण्यांपासून !
प्रवाश्यांना स्वातंत्र्य
हवे ,
.... ते टोलमुक्त-खडेमुक्त रस्त्यांपासून !
समाजाला स्वातंत्र्य हवे ,
... ते धर्म-जातीच्या नावाने
विष पेरणाऱ्यांपासून !
गुंतवणूक दारांना स्वातंत्र्य हवे ,
... ते सहकारातील स्वार्थी अपप्रवृत्ती
पासून !
समाजाला स्वातंत्र्य हवे ,
... ते स्थानिक स्वराज्य
संस्थातील भ्रष्ट नोकरशहा- नगरभक्षकापासून !
विधानसभा - संसदेला
स्वातंत्र्य हवे ,
... ते
गोंधळी आमदार - खासदारां पासून !
श्रद्धेला स्वातंत्र्य हवे ,
... ते बाबा-बुवांच्या अंधश्रद्धेच्या 'जादू' पासून !
उद्योगधंदे -शेतीला
-गावांना स्वातंत्र्य हवे ,
... ते
वीज भारनियमना पासून !
निसर्गाला स्वातंत्र्य हवे ,
... ते
मानवी अतिक्रमणापासून !
घर खरेदीदाराला स्वातंत्र्य हवे ,
... ते अवास्तव लूट करणाऱ्या
बिल्डरा पासून !
मुलींना स्वातंत्र्य हवे ,
....
ते गर्भातच मारणाऱ्या माता-पिता आप्तास्वकीयांपासून !
उपवर मुलींच्या माता -पित्यांना स्वातंत्र्य हवे ,
... ते हुंड्यासाठी
अडणाऱ्या-मारणाऱ्या 'वरां ’ पासून' !
कुपोषित बालकांना स्वातंत्र्य हवे ,
... ते टाळूवरचे लोणी
हडपणाऱ्या यंत्रणा पासून !
सैनिकांना स्वातंत्र्य हवे ,
सैनिकांना स्वातंत्र्य हवे ,
खरतर " लोकशाही "
लाच आता स्वातंत्र्य हवे ,
... ते लोकशाहीचा गळा
घोटनाऱ्या 'सर्व (च) ' घटकांपासून !!!
........... आणि तरीही सर्व
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या
शुभेच्छा !!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा