THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

public health service लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
public health service लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

आरोग्य व्यवस्थेचे युद्धपातळीवर योजनाबद्ध रीतीने सक्षमीकरण हाच एकमेव " कळवा हॉस्पिटलची पुनरावृत्ती " टाळण्याचा एकमेव उपाय !

 

संपूर्ण जगभर व्यक्ती ,समाज देशाच्या बाबतीत सर्वमान्य नियम हा आहे की : जी व्यक्ती , जो समाज , जो देश   भूतकाळातील वर्तमानकाळातील  समस्या -प्रश्नांच्या मुळाशी असणाऱ्या कारणांचा 'डोळसपणे' वेध घेतो , त्या कारणांच्या निराकरणासाठी ' अभ्यासपूर्ण पद्धतीने  ' उपाययोजना योजतो त्या योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करतो  त्या व्यक्तीचे ,त्या समाजाचे , त्या देसाचे भविष्य  उज्वल असते कारण अशा दृष्टिकोनामुळे समस्या ,प्रश्नांची पुनरावृत्ती टाळली जाते .

                  भारतीय समाज ,भारतीय लोकशाही  यंत्रणा , या यंत्रणा चालवणारे सत्ताधारी ,विरोधी पक्षातील मंडळी , प्रशासकीय उत्तरदायित्व असणारी नोकरशाही यांना निरंतर त्याच त्या समस्या -प्रश्नांना सामोरे जावे लागते .

         अर्थातच असे होते कारण मुळात समस्या -प्रश्न होण्याचे सर्वात आधी टाळतो , अगदीच डोक्यावरून पाणी वाहू लागल्यावर समस्या -प्रश्न मान्य करतो , मग त्या समस्या -प्रश्नांची कारणे उघड उघड दिसत असून देखील समस्या -प्रश्नांची कारणे जाणण्याकरिता 'उच्च स्तरीय समितीची ' स्थापना  (उच्च स्तरीय या साठी म्हटले जात असेल की  ती समिती इतक्या उच्च स्तराची असती की  ते समस्येच्या मुळाशी जातच नाहीत ) केली जाते , समितीला वारंवार चौकशीचा कालावधी वाढवून दिला जातो , कालांतराने समितीचा अहवाल येतो . आलेला अहवाल वर्षानुवर्षे धूळखात पडला जातो . पुन्हा केंव्हा काही कारणाने ओरड झाली तर त्या समितीच्या 'अभ्यासपूर्ण "(?)  उपायांची अंमलबजावणी केली जाते . या दरम्यान अन्य वावटळ आलेली असते त्या वावटळीत सर्व काही विरून जाते .

                 या सर्व घटनांची पुनरावृत्ती पुन्हा त्याच क्रमाने अशीच एखादी समस्या -घटना घडल्यानंतर होत राहते ... त्याचा ही  कालांतराने विसर पडतो आणि पुन्हा काही काळाने तेच ते आणि तेच ते  .

             भारताच्या भविष्यकाळात  भूतकाळातील  वर्तमान काळातील येणाऱ्या अनुभवांचे  प्रतिबिंब  उमटताना दिसत नाही याचे प्रमुख आणि मूलभूत कारण म्हणजे भारतीय नागरिक , भारतातील राजकीय मंडळी , भारतीय लोकशाहीचे सर्व स्तंभ यांच्या नसानसात "दांभिकता , नाटकीपणा " ढासून भरलेला  आहे .गेली ७५ वर्षे हा खेळ निरंतरपणे आणि 'प्रामाणिक ' पणे  लोकशाहीशी निगडित सर्व यंत्रणा आणि नागरिक खेळत आहेत आणि म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी असणाऱ्या समस्या आजही  तितक्याच तीव्रतेने अस्तित्वात आहेत .

             त्यापैकी एक म्हणजे  ठाणे जिल्ह्यातील कळवा रुग्णालयात २४ तासात १८ रुग्णांच्या मृत्यमुळे पुन्हा एकदा चर्चेत , ऐरणीवर आलेली  'सार्वजनिक आरोग्य व्यवस्था " .

                     सत्तेबाहेर असणारी राजकीय मंडळी  अशा प्रकारे या घटनेला प्रतिसाद देत आहेत की आपण पर ग्रहावरून आलेलो आहोत  .असे प्रकार त्यांनी अगदी पहिल्यांदाच पाहिलेले आहेत .  राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत सक्षम , सर्व सुविधांनी सुसज्ज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  लोकसंख्येस पुरेशी असून  कळवा रुग्णालयातील घटना हि अपवादात्मक असून त्यास पूर्णपणे त्या ठिकाणी कार्यरत डॉक्टर मंडळी जबाबदार आहेत  , सरकार जबाबदार आहे  आणि  कळवा घटना घडण्यास असणाऱ्या कारणांप्रती  आपले कधीच उत्तरदायित्व नव्हते .  प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडिया देखील वार्तांकन करताना  राज्यातील अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ घटना  अशा प्रकारे त्याचे वार्तांकन करताना दिसतात आणि म्हणूनच दांभिकता  हा आपल्या लोकशाही व्यवस्थेशी निगडित सर्वच घटकांना  जडलेला रोग आहे  हे वर नमूद केलेले मत गैर ठरत नाही .

कळवा हॉस्पिटलच्या दारुण अवस्थेस कोणी एकटा दोषी नसून हे आपल्या लोकशाही व्यवस्थेच्या 'अव्यवस्थेचे बळी ' आहेत . त्यामुळे राजकीय पोळी भाजण्यासाठी या घटनेचा उपयोग  निव्वळ ढोंग ठरते .  कळवा हॉस्पिटल हे अपवादात्मक उदाहरण नसून पुण्याचे ससून रुग्णालय असो की   संभाजी नगरचे घाटी हॉस्पिटल . सर्वत्र सारखीच अवस्था आहे .

आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाच्या  "खऱ्या स्वप्नपूर्तीसाठी " दांभिकता , राजकीय अभिनिवेश ,नौटंकी ला पूर्णविराम आवश्यक :       

                  राज्यातील -देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था खऱ्या अर्थाने किमान पुढील /१० वर्षात सक्षम करण्याचे स्वप्न पूर्णत्वास न्यायचे असेल तर राजकीय मंडळी आणि लोकशाहीशी निगडित सर्वच स्तंभांनी 'दांभिकतेला ' तातडीने पूर्णविराम देणे निकडीचे आहे . आजवर अशाच 'दांभिक ' पद्धतीने प्रतिसाद दिला जात असल्याने आपण अजूनही आरोग्य ,शिक्षण या बाबतीत उद्दिष्टपूर्तीच्या कोसो दूर आहोत . ते आता तरी टाळले जायला हवे .

               भक्कम ,दीर्घकाळ टिकणाऱ्या   वास्तूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे " इमारतीचा अभ्यासपूर्ण आरखडा ' तयार करणे आणि   स्वप्नांतील इमारत उभारण्यासाठी आवश्यक अशा  " पाया " ची पायाभरणी करण्यासाठीचे पाऊल तातडीने उचलणे .

        सरकारने सर्वात आधी प्रत्येक जिल्ह्याचे  जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांना सयुंक्त पद्धतीने आपापल्या जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रे , प्राथमिक आरोग्य केंद्रे , तालुका रुग्णालये  , जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेशी सर्वच घटकांशी निगडित जसे उपलब्ध इमारती , उपलब्ध मनुष्यबळ उपलब्ध पायाभूत सुविधा , उपलब्ध  अद्ययावत यंत्रणा अन्य आवश्यक घटक यांची   "वस्तुनिष्ठ " (Grass Root level  Objective Information)  माहिती गोळा करण्याचे निर्देश द्यावेत .  यासाठी महिन्यांचा काळ पुरेसा ठरू शकतो .

   अशा प्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांची माहिती पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून देण्यासाठी  "आरोग्य डॅशबोर्ड "ची निर्मिती करावी . असे केल्याने जमिनीवरील खरे  चित्र मांडण्याचे उत्तरदायित्व प्रशासनवर येऊ शकेल . त्या नंतरच्या आगामी महिन्यात आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी स्थानिक आवश्यकतेनुसार उपाययोजना सुचवण्यासाठी सांगावे . अशा प्रकारे टप्याटप्याने आरोग्य व्यवस्थेचे उच्चीकरण, आधुनिकीकरण, अद्ययावतीकरण , मनुष्यबळ सक्षमीकरण करण्यासाठी चा आरखडा तयार करून त्याची अंमलबजाणी प्रामाणिक कठोरपणे  करावी .

 

दृष्टीक्षेपातील अन्य उपाय :

 

) जिल्हापातळीवरील रुग्णालयात पेशंटची गर्दी वाढण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे " आरोग्य उपकेंद्रापासून ते तालुका रुग्णालयात   सुविधांचा अभाव , डॉक्टरांची वानवा . ड्युटीला असणाऱ्या  नर्सेस ,डॉक्टरांची अनुपस्थिती . यावर मात करण्यासाठी सरकारने आगामी वर्षात राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षमीकरणासाठी युद्धपातळीवर नियोजन करावे .

) बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची माहिती आरटीआय अंतर्गत प्राप्त झाल्यानंतर असे निदर्शनास आले की  पंचायत समिती ,जिल्हा परिषद , स्थानिक नेत्यांना अधिक स्वारस्य दिसते ते  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या , उपकेंद्राच्या इमारती उभा करण्यात . एकदा इमारत बांधकामाचे बिल उचलले की  वर्षानुवर्षे त्या विनावापर धुळघात पडलेल्या आहेत  . हा निधीचा अपव्ययच ठरतो . त्यामुळे शासनाने 'एक ना धड , भारंभार चिंध्या ' अशी अवस्था टाळण्यासाठी सगळीचकडे अर्धवट आरोग्य सुविधा उभा करण्यात धन्यता मानता  नियोजनबद्ध पद्धतीने इमारतींबरोबरच आवश्यक यंत्रसामुग्री , आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे आणि नंतरच  नवीन आरोग्य सुविधा निर्मितीकडे लक्ष द्यावे .

) वर्तमानात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेपुढील यक्षप्रश्न म्हणजे ड्युटीला असणाऱ्या कर्मचारी -डॉक्टरांची अनुपस्थिती . यासाठी सरकारने ड्युटीच्या ठिकाणी निवासाची सक्ती या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्या बरोबरच आरोग्य व्यवस्थेतील सर्व कर्मचारी -अधिकारी -डॉक्टरांचे वेतन हे बायोमेट्रिक हजेरीशी जोडावे .

) सर्वांसाठी आरोग्य सुविधा मोफत अशा गाजावाजा करणाऱ्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेला प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी करावा  .

) आमदार निधी -खासदार निधी आगामी वर्षाकरिता पूर्णपणे बंद करून त्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांची युद्धपातळीवर उभारणी करावी .

) ग्रामीण भागातील नागरिक मंदिरांच्या उभारणीसाठी १०/२० लाखांची वर्गणी करताना दिसतात . नागरिकांना 'आरोग्य मंदिरांचे ' महत्व पटवून देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करावे आणि  नागरिकांच्या पैशाचा विनियोग खेडोपाडी आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरणासाठी करावा .

) राज्याच्या एकूण बजेटच्या किमान १० टक्के रक्कम हि आरोग्य रक्षणासाठी अनिवार्य करण्याचा कायदा करावा .

) अनावश्यक गोष्टींवर महानगरपालिकेत होणारी  करोडोंच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेला "प्रभाग तिथे , प्राथमिक आरोग्य केंद्र " या उपक्रमा बरोबरच एकूण निधीच्या १०/१५ टक्के निधी आरोग्य व्यवस्थेवर खर्च करणे सक्तीचे करावे .

          सरतेशेवटी हि गोष्ट लक्षात ठेवायला हवी की  कोरोना आपत्तीने आपल्याला एक इशारा दिलेला आहे . त्यातून योग्य बोध आता घेतला नाही तर भविष्य आपल्याला माफ करणार नाही आणि पुन्हा तशी परिस्थिती दुर्दैवाने ओढवली तर एकमेकांकडे  बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार देखील आपण सर्वाना राहिलेला नसेल .

 

रात्र वैऱ्याची आहे ... वेळीच जागे होणे अत्यंत -अत्यंत आवश्यक आहे .





 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी

संपर्क ईमेल : danisudhir@gmail.com

संपर्क मोबाईल : ९८६९२२६२७२

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सुदृढ -निरोगी भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आरोग्य व्यवस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विस्तार विकासास सर्वोच्च प्राधान्य निकडीचे ...

                          एप्रिलला संपूर्ण जगभर ७१ वा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला . जागतिक आरोग्य संघटनेने १९५० पासून याची सुरुवात केलेली आहे .

         महाराष्ट्रात आणि भारतात देखील तो साजरा करण्यात आला . वेदनादायी गोष्ट हि की , जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशीच महाराष्ट्रात -भारतात चर्चा सुरु होती ती कोरोनावरील लसीच्या तुडवड्याबाबत  आणि रेमडेसीवर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराबाबत . एकुणातच कोरोना आपत्तीने भारतीय आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे . या विषयवार विचारमंथन करणारा ब्लॉग .

         प्रत्येक दिन साजरा करण्यामागे काही विशिष्ट औचित्य असते . या निमित्ताने त्या दिनाच्या घटकाच्या इतिहास ,वर्तमान आणि भविष्याचा धांडोळा घ्यावयाचा असतो . भूतकाळाच्या उदरातच उज्वल भविष्याचे उत्तर दडलेले असते . भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळत वर्तमानात त्या दृष्टीने पाऊले टाकत अपेक्षित भविष्य घडवले जाऊ शकते हे ते ऊतर .

     संकटातच व्यक्ती आणि व्यवस्थेची खरी कसोटी असते . कोरोनाने आपल्या आरोग्य  व्यवस्थेची गेल्या १३ महिन्यांपासून परीक्षा पाहिली जाते आहे . स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरोग्य सारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय आरोग्य व्यवस्थेचे कसे तीन -तेरा वाजलेले आहेत हे कोरोनाने अगदी स्पष्टपणे अधोरेखित केले . विकासाच्या निकषात आरोग्य कुठेच गृहीत धरले जात नसल्याची किंमत आज १३० करोड जनता भोगत आहे .

 

आपले  धोरणकर्ते आणि प्रशासन भविष्यातील चुकांतून योग्य बोध घेत  चुकांची पुनरावृत्ती टाळत नसल्यामुळे अनेक प्रश्न ज्ञात असून आणि त्यावरील ऊपाय ज्ञात असून देखील त्या समस्यांचे भिजत घोंगडे दशकानुदशके  पडलेले असते .  लोकसंख्येस पुरेशी दर्जेदार आरोग्य व्यवस्थेची वानवा हि त्या पैकीच दीर्घकाळ प्रलंबित एक समस्या .

      आरोग्य व्यवस्थेचा धांडोळा घेण्याआधी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे मांडवायची आहे की , आपली आरोग्य व्यवस्था कोरोनाचा सामना करण्याच्या बाबतीतअनुत्तीर्णठरलेली असली तरी त्यात काम करणारे वार्डबॉय पासून ते डॉक्टरांपर्यंत अविरत सेवा करणारे कोरोनायोध्ये मात्र 'मेरिट 'मध्ये उत्तीर्ण झालेले दिसतात . उपलब्ध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून त्यांनी आपले बेस्ट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे . याकरीता आरोग्य सेवेतील सर्व मंडळींचे मनापासून आभार अभिनंदन . लोकसंख्येच्या प्रमाणात जागतिक निकषानुसार भारतात आरोग्य व्यवस्थेची निर्मिती झालेली नसल्यामुळे ती अनुत्तीर्ण झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरते . याचे प्रमुख कारण म्हणजे धोरणकर्त्याचे  अपयश .

         आज महाराष्ट्रात ४० हजार  खेड्यापैकी किती ठिकाणी 'प्राथमिक आरोग्य केंद्र ' आहेत . अगदी /१० टक्क्यांच्यावर नक्कीच नाहीत .  बरे ! असणारे ग्रामीण आरोग्य केंद्रे , तालुका आरोग्य केंद्रे , जिल्हा आरोग्य केंद्रे उपलब्ध कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत  किती सक्षम आहेत याकडे जर "उघडा डोळे ,बघा नीट " या एबीपी माझाच्या दृष्टीने पाहिले तर आवश्यक निकषाच्या कसोटीवर यापैकी किती केंद्रे उत्तीर्ण ठरतात हे देखील तितकेच महत्वाचे आहे . दुर्दैवाची गोष्ट हि की याचे उत्तर देखील 'नकारात्मकच ' आहे .

   मान्य आहे की  , कोरोना हि एक अपवादात्मक आव्हान आहे आणि त्याचा सामना करताना अगदी स्वतःला महासत्ता समजणारे देखील मेटाकुटीस आलेले आहे . असे असले तरी अन्य कोरोना पूर्व परिस्थितीचा विचार केला तरी आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था अजूनही 'बाल्यावस्थेतच ' आहे हे नाकारता येणार नाही . अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे हे केवळ कागदोपत्री संख्यात्मक पूर्तता करणारी आहेत .

                  निसर्ग हा सर्वानांच संधी देतो. संधीचे सोने केले तर समस्येचे निराकरण शक्य होते . अर्थातच संधी योग्य वेळी साधली नाही  तर निसर्ग ती संधी हिरावून देखील घेतो . समतोल हा निर्सगाचा स्थायीभाव असल्यामुळे संधी जशी दिली जाते तसेच आपत्ती देखील निसर्गाचीच देणं असते . संधीचा उपयोग करणे हे  देखील कधी कधी आपत्ती ठरू शकते तद्वतच  आपत्तीत देखील  संधीची शक्यता असते .

           सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा   विस्तार , सक्षमीकरण , सार्वत्रीकरण करण्याची  संधी कोरोना आपत्तीने दिलेली आहे आणि तिचे सोने करण्याशिवाय अन्य पर्याय आपल्यासमोर नाही . सुदैवाची गोष्ट हि की ,प्रशासन आणि राज्यकर्त्यांची आरोग्याबाबतची धारणा बदलताना दिसत आहे . वर्तमानात किमान त्यांच्या उक्तीत तरी आरोग्य  हा  विषय आलेला दिसतो .  भारतीय आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याविषयीची मानसिकता आणि कर्तव्यतत्परता स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केंद्र सरकारच्या धोरणात प्रतिबिंबीत होताना दिसते आहे . .  केंद्र सरकारने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात  तब्बल २३७ पट झालेली  वाढ हा त्या दृष्टीने प्रवासाचा "श्रीगणेशा " आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही .

 

निधी नव्हे प्रामाणिक इच्छाशक्तीचा " अडथळा " : 

          आपल्या देशात आजवर आरोग्य व्यवस्थेच्या निर्मितीसाठी -देखभालीसाठी करोडो रुपये खर्च झालेले आहेत . प्रत्येक अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेसाठी निधीची तरदूत केलेली असते . करोडो रुपयांचा निधी कागदावर खर्च होऊन देखील आपण आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत किमान पातळीवर देखील पोहचू शकलेलो नाहीत याचे कारण म्हणजे 'अगदी मढ्याच्या टाळूवरचे लोणी देखील खाण्याची आपली राजकीय आणि प्रशासकीय संस्कृती .   "प्रामाणिक इच्छाशक्ती" हि कुठल्याही समस्या -प्रश्नाच्या निराकारणासाठीचे  प्रमुख भांडवल असते . 

                    भारतातील अनेक समस्यांचा मुळाशी आणि त्या समस्येच्या सार्वत्रिकरणामागचे प्रमुख कारण कुठले असेल तर ते म्हणजे "प्रशासकीय आणि राजकीय घटकात  असणारा प्रामाणिक इच्छाशक्तीचा अभाव ".  " आधी स्वार्थ मग सुद्धा स्वार्थ आणि चुकून घडलाच तर  परमार्थ "  अशी आपल्या नोकरशाहीची आणि सर्वच पक्षीय लोकप्रतिनिधींची गल्ली पासून दिल्ली पर्यंत कार्यपद्धती असल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्ती पासून  गेली दशके  अनेक योजनांवर करोडो -करोडो रुपये खर्च करून  सुद्धा त्या त्या व्यवस्था आज ही  व्हेंटिलेटरवर आहेत .  जे जे सार्वजनिक आणि सरकारी ते ते दर्जाहीनच असायला हवे अशी जणू लोकशाही व्यवस्थेतील अलिखित अटच आहे की  काय ?  असे वाटावे अशी सरकारी व्यवस्थांची -योजनांची अवस्था आहे .

 

हा सूर्य आणि हा जयद्रथ :

      वास्तव नाकारणे हा आपल्या नोकरशाही आणि राजकीय व्यवस्थेचा स्थायीभाव झालेला आहे . समोर सर्व काही स्पष्ट दिसत असताना देखील प्रशासन आणि राज्यकर्ते वास्तव नेहमीच नाकारताना दिसतात . अर्थातच याचे प्रमुख कारण म्हणजे समस्याच नाकारली तर त्याच्या सोडवणुकीच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न देखील आपसूकच निकालात निघतो .

             ज्या व्यक्तीच्या घरात कोरोना पेशंट आहे आणि त्याला बेड मिळवण्यासाठी ज्याला जीवाचा आटापिटा करावा लागतो तीच व्यक्ती वर्तमानात आरोग्य व्यवस्थेचे वास्तव काय आहे हे सर्वात वास्तवादी रित्या सांगू शकतो

       " सरकारी आरोग्य व्यवस्था सक्षम आणि दर्जेदार नाही " हि जनभावना असली तरी हे सरकार आणि नेते कधीच मान्य करणार नाहीत . म्हणून वास्तव झाकले जाईल असे नाही .  सरकारी आरोग्य व्यवस्थेबाबत  हा सूर्य आणि हा जयद्रथअशा पद्धतीने धोरणकर्त्यासमोर वास्तव मांडले जाऊ शकते .

    जे जे उत्तम -दर्जेदार त्या कडे मानवी ओढा असतो हे सार्वत्रिक सत्य आहे . या सत्यानुसार सरकारी आरोग्य यंत्रणा धोरणकर्ते म्हणतात त्यानुसार  खऱ्याच दर्जेदार असत्या तर सर्वात आधी  या व्यवस्थांचा लाभ हा नोकरशाही आणि लोकप्रतिनिधींनी घेतला असता . पण प्रत्यक्षात काय  दिसते ?

                महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील आमदार -खासदारांना कोरोनाची लागण झाली तर ते तातडीने "मुंबईतील खाजगी हॉस्पिटलची वाट धरताना दिसले " . हे कशाचे प्रतीक मानायचे ?  जी मंडळी आपला जिल्हा , आपला मतदारसंघ हा विकसित असल्याचे दवंडी पिटवत होते ते सर्व मंडळी प्रत्यक्षात मात्र वेळ आल्यावर आपल्या विकसित जिल्ह्याकडे /मतदारसंघाकडे पाठ फिरवताना दिसत होते . हे का ?

                  दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य व्यवस्था हे विकासाचे प्रमुख निकष मानले जातात . ज्या अर्थी राज्यातील एकाही लोकप्रतिनिधीने आपल्याला झालेल्या कोरोनाच्या उपचारासाठी आपल्या जिल्हयातील आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवला नाही त्या अर्थी विकासाच्या निकषानुसार "सक्षम -दर्जेदार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बाबत महाराष्ट्र आणि त्याच बरोबर देश देखील अनुत्तीर्ण ठरला आहे " असे म्हटले तर अव्यवहार्य -अतार्किक अतिशोयुक्तीचे ठरणार नाही .

                  कोरोना हे केवळ प्रातिनिधिक  उदाहरण झाले , बहुतांश उपचाराच्या बाबतीत गल्ली ते मुंबई हाच प्रवास दिसतो .   मग आता आपल्या देशातील -राज्यातील एका तरी नोकरशहाने वा लोकप्रतिनिधीने ते स्वतः दर्जदार आरोग्य व्यवस्थेचा लाभ का घेत नाहीत याचे जाहीर ऊतर द्यावे जेणेकरून  सरकारी हॉस्पिटल विषयीचा जनतेचा भ्रम दूर होईल .

वर्तमानात   डॉक्टरांचे प्रमाण अत्यल्पच :

          डबल्यूएचओ  म्हणजेच आरोग्य संघटनेच्या निकषानुसार  "एक  हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर"  असायला हवेत . या प्रमाणानुसार भारतात कोटी ३४ लाख डॉक्टर हवेत!  भारतात २०१७ पर्यंत ॅलोपॅथिक डॉक्टरांची संख्या होती १० लाख ४१ हजार ३९५, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी आणि अन्य डॉक्टरांची संख्या होती लाख ७३ हजार ६६८. दंत आरोग्य तर वाऱ्यावरच आहे. कारण सबंध देशात दंतवैद्यकांची संख्या आहे केवळ ,२३९. ॅलोपॅथिक डॉक्टरांपैकी एक टक्का म्हणजे लाख डॉक्टर सार्वजनिक वैद्यकीय सेवेत आहेत.

           सरकारी इस्पितळांत ११,०८२ पेशंट्समागे एक डॉक्टर, तर २०४६ रुग्णांसाठी एक बेड असे भारतात प्रमाण आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ आणि इतर साधनांच्या अभावामुळे एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण खासगी वैद्यकीय सेवा स्वीकारतात . ( संदर्भ : ‘नॅशनल हेल्थ प्रोफाइल- २०१८)

 

आरटीआयतून प्राप्त माहिती द्वारे जमिनीवरील वास्तव:

      भाताची वर्तमानस्थिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण पातेल्यातील भाताची चाचपणी आवश्यक नसते . शितावरून भाताची परीक्षा करता येते . तद्वतच संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे दर्शन एका जिल्हयातील परिस्थितीवरून होऊ शकते .  बीड जिल्हा आरोग्य व्यवस्थेविषयी केलेल्या आरटीआय मधून प्राप्त माहितीनुसार जिल्हयातील अनेक महत्वाची प्रमुख आरोग्य पदे रिक्त असल्याचे दिसते . 

         तालुका आरोग्य  अधिकारी वैद्यकीय अधिकारी याची  शासनाने मान्य केलेली पदे १२६ असली तरी त्यातील १५ पदे रिक्तच आहेत . आरोग्य पर्यवेक्षकांची पदे ( मंजूर पदे २० ) औषध निर्माण अधिकारी १९ पदे ( मंजूर ६८ ) आरोग्य सहाय्यक पुरुष १०(मंजूर ६७) ,आरोग्य सहाय्यक महिला १४ (मंजूर पदे ५७) ,युनानी मिश्रक ( मंजूर ) , आरोग्य सेवक पुरुष १६७ ( मंजूर ३०८) , आरोग्य सेवक महिला  २५९  ( मंजूर ४९५ )  रिक्त आहेत . संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी मंजूर ११५० पैकी तब्बल ४९६ पदे रिक्त  आहेत .

            रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे बारा वाजलेले दिसते , जिल्हयातील सार्वजनिक आरोग्य  व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते .  या परिस्थतीमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आरोग्याबाबत ससेहोलपट होते  आहे .  शितावरून भाताची परीक्षा असे म्हटले जाते . या सूत्राने एका जिल्ह्यातील 'अधिकृत ' परिस्थितीवरून एकुणातच राज्याच्या,देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेचे चित्र स्पष्ट होते .

दृष्टिक्षेपातील   संभाव्य उपाय :

  • ·        सर्व स्थानिक स्वराज्यसंस्था ,राज्य सरकारे आणि केंद्र सरकारला आपल्या बजेटच्या १० टक्के निधी  हा आगामी वर्षांसाठी आरोग्य व्यवस्थेवर 'प्रामाणिकपणे खर्च" करण्याची सक्ती करावी .
  • ·        कोविडचा सामना करण्यासाठी उभारलेल्या तात्पुरत्या  हॉस्पिटलचे रूपांतरण कायम स्वरूपाच्या हॉस्पिटल्स मध्ये करावेत .

 

  • ·        सरकारी हॉस्पिटलची सेवा सक्तीची करावी : जितका रोग जालीम ,तितका इलाज देखील जालीम असायला हवा . या सूत्राने खऱ्या अर्थाने सरकारी आरोग्य सेवा सक्षम ,सुसज्ज आणि दर्जेदार होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावयाचे असेल तर लोकप्रतिनिधी नोकरशाहीला "करदात्या नागरिकांच्या पैशातून खाजगी हॉस्पिटलची सेवा घेण्याची सुविधा पूर्णपणे बंद करायला  हवी ".  सरकार प्रशासनाशी निगडित सर्वाना सरकारी आरोग्य सेवा अनिवार्य करण्याचा नियम करावा .

 

  • ·        ग्रामीण आरोग्य व्यवस्था पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी खाजगी कंपन्यांच्या सिएसआर फंडाचा ( सामाजिक दायित्व निधी ) वापर करावा .  टाटा-रिलायन्स -बजाज  सारख्या कंपन्यांनी  आपल्या कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून  सार्वजनिक हॉस्पिटल्स बांधावीत .

 

  • ·            मुंबई -पुणे -ठाणे -नागपूर -नाशिक अशा महानगरपालिकांना त्यांच्या एकूण अर्थसंकल्पाच्या टक्के निधीतून  दरवर्षी त्यांच्या त्यांच्या बजेटनुसार ५००/१०० गावे दत्तक घेऊन तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करणे अनिवार्य करावे .

 

  • ·          मेडिकल  अभ्यासक्रम / कॉलेजेसचे सुलभीकरण /सार्वत्रीकरणाचा  अवलंब करावा :

 

  • ·        स्तर निहाय शिक्षण हवे :     आज वैद्यकीय शिक्षण अत्यंत महागडे झालेले आहे . खाजगी महाविद्यालयातून डॉक्टर होण्यासाठी किमान कोट -दिडकोट रुपये लागतात . इतकी गुंतवणूक करत तयार होणारे डॉक्टर्स शासनाच्या  ५०/७०  हजार पगारावर नोकरी करण्यास कशाला येतीलआज बहुतेकांचा ओढा हा विशिष्ट विषयात प्राविण्य /तज्ज्ञ होण्याकडे असतो . अशा स्पेशालिस्ट डॉक्टरची फीस हजारात असते .

              या सगळ्या परिस्थितीचा विचार करत सरकारने वैद्यकीय शिक्षणात वेगवेगळे स्तर करावेत . प्रत्येक रुग्णाला स्पेशालिस्ट डॉक्टरचीच गरज असते असे नाही . ५० टक्के पेशंट हे प्राथमिक उपचाराची गरज असणारे असतात .  अशा रुग्णांसाठी / वर्षाचा वैद्यकीय ज्ञान असणारे कोर्सेस सरकारने सुरु करायला हवेत . अशा प्रकारचे वैद्यकीय कॉलेज सुरु करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची निश्चितच गरज असणार नाही . तालुका /जिल्हा पातळीवर असे मेडिकल कॉलेजेस निर्माण केल्यास स्थानिक विद्यार्थी त्याकडे वळतील आपल्याच तालुक्यात सेवा देऊ शकतील . यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार देखील निर्माण होईल .

  • ·        करदात्याच्या पैशाने लोकप्रतिनिधी आणि नोकरशाहीला खाजगी हॉस्पिटलची  सुविधा  पूर्णपणे बंद करावी.
  • ·        उपलब्ध निधीचा वापर योग्य रीतीने होण्यासाठी आरोग्य केंद्राच्या इमारतींची निर्मिती स्थानिक स्वराज्य संस्थांकडे  ठेवता ती राज्यपातळीवर ऑनलाईन  टेंडरपद्धतीने  एल अँड टी , टाटा सम संस्थांना द्यावी तर आणि तरच योग्य दर्जा राखला जाऊ शकतो .

 

सुधीर लक्ष्मीकांत दाणी 

लेखक संपर्क : ९८६९२२६२७२

danisudhir@gmail.com