THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

IAS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
IAS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

राज्य -केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन” बायोमेट्रिक हजेरी “ शी जोडा !...

 

                  सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सर्वात कठीण गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे सरकारी कार्यालायत गेल्यावर कार्यालयीन वेळेत त्या त्या टेबलवर कर्मचारी ,अधिकारी  उपस्थित असणे . हजरच नसेल तर काम होणे दूरच .  अशा तक्रारींची दखल घेत सरकारने बायोमेट्रिक हजेरीचा उपाय अंमलात आणला आहे परंतू  आपल्या  देशातील कार्यसंस्कृती प्रमाणे वर्तमानात 'बायोमेट्रिक हजेरी मशिन्स ' या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत . कोरोना हे कारण तर 'निनांदीला बारा वाटा " अशा अर्थाने बायोमेट्रिक हजेरीला लाथाडण्याचे एक कारणच बनले आहे .

                 वेतन आयोग हवा , दिवसांचा आठवडा हवा पण बायोमेट्रिक हजेरीचे वावडे असे वर्तन राज्य -केंद्र सरकारी कर्मचारी -अधिकाऱ्यांचे दिसते . अर्थातच यास  वरिष्ठ अधिकारी मंडळी आणि कार्यरत कर्मचारी -अधिकारी संघटनाचा देखील सक्रिय पाठिंबा असतो . काही कार्यालयात संघटनांचा सक्रिय पाठिंबा इतका असतो की जाणीवपूर्वक मशीन नादुरुस्त केल्या जातात , वायर तोडले जातात .   दिवसांचा आठवडा लागू करताना कार्यालयीन कामाच्या वेळेत वाढ केली असली तरी अशी वाढीव वेळ केवळ 'कागदी सोपस्काराच' ठरताना दिसत आहे . आज हि अनेक महानगरपालिका कार्यालयात , जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयांची वेळ हि अलिखीतपणे  ११ ते अशीच दिसते .  अगदी मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या कोकणभवन मध्ये देखील अनेक कर्मचारी ११ /१२ वाजता येताना दिसतात .

              राज्य आणि केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मचारी ,अधिकाऱ्यांना वेतन हे करदात्या नागरिकांच्या पैशातून दिले जाते आणि नागरिकांचे काम करण्यासाठीच त्यांची नियुक्ती केलेली असते .  बोटावर मोजता येतील असे अपवाद वगळता बहुतांश कार्यालयांना याचा विसर पडलेला दिसतो . काळ बदलला आहे असे वारंवार म्हटले जात असले तरी सरकारी कार्यालयातील  ' कार्यालयीन वेळेचे पालन ना करण्याची आणि हजर असेल तेंव्हा नागरिकांची अडवणूक करण्याची संस्कृती " मात्र अद्याप बदलेली दिसत नाही . 

      देवळात देवच नसेल तर पावणार कसा या  तत्वाने   सरकारी कार्यालये हे लोकाभिमुख होण्यासाठी सर्वात महत्वाचा निकष म्हणजे 'निर्धारित वेळेत कर्मचारी -अधिकाऱ्यांची उपस्थिती ".  यावरील सर्वोत्तम तोडगा म्हणजे  सर्वच्या सारवण राज्य -केंद्र सरकारी कार्यालयातील कर्मचारी -अधिकाऱ्यांचे वेतन हे बायोमेट्रिक हजेरीशी जोडणे .  बायोमेट्रिक हजेरीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रवृतींना लगाम घालण्यासाठी 'नो बायोमेट्रिक हजेरी , नो वेतन ' हे धोरण राबवावे.  




                 कोरोना आपत्ती ध्यानात घेत सरकारने बायोमेट्रिक हजेरीला काही काळासाठी स्थगिती दिलेली होती . नोव्हेंबर पासून पुन्हा सर्व कार्यालयांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केल्याचे  परिपत्रक जारी केलेले आहे . असे असले तरी 'सोयीचे असले म्हणजे रीतसर मार्गाने परिपत्रक मिळाले तरी अंमलबजावणी करायची तर गैरसोयीचे असेल तर अजून  रीतसर परिपत्रक प्राप्त नाही या कारणास्तव अंमलबजावणी टाळायची ' या रुजलेल्या धोरणानुसार अजूनही काही महिने  बायोमेट्रिक हजेरी टाळली जाईल .

          "सरकारी नियमांचे उल्लंघन  " या कारणास्तव नागरिकांवर कारवाई करणाऱ्या विविध कार्यालयाने सर्वात आधी आपण देखील 'बायोमेट्रिक हजेरी ' या सरकारी नियमांचे उल्लंघन करत नाही ना  याची काळजी घ्यायला हवी .    नियमानुसार आयोग द्या , दिवसांचा आठवडा करा पण त्याच बरोबर  हे लागू करताना घालण्यात आलेल्या "बायोमेट्रिक हजेरी "या अटीची पूर्तता करण्यासाठी राज्य -केंद्र कार्यालयातील सर्वांचें वेतन बायोमेट्रिक हजेरीशी जोडा अशी जनतेची मागणी आहे . त्याची पूर्तता करा हि जनभावना सरकार दरबारी पोचवण्यासाठी हा प्रपंच .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई