आपले सण-धार्मिक उत्सव आणि निसर्ग यांची सूत्रबद्ध सांगड आहे .प्रत्येक उत्सवाचे
स्वरूप, साजरे
करण्याची पद्धत हि ऋतुचक्राशी सुसंगत असते .
निसर्गाचे जतन ,संवर्धन
यास सर्वोच्च प्राधान्य असते . निसर्गाप्रतीचा
डोळस दृष्टीकोन हे आपले खास वैशिष्ट्य .
आराध्य दैवत "गणरायाच्या " आगमनासाठी सर्व आतुर आहेत . वातावरण मंगलमय होते आहे . गेल्या काही दशकामध्ये उत्सवांचे व्यापारीकरण ,बाजारीकरण आणि उद्दातीकरण होताना मात्र मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . वृत्ती-प्रवृत्ती बदलली मात्र दृष्टीकोन मात्र कालानुरूप बदलला नाही . त्याचा फटका निसर्गाला ( पर्यायाने आपल्याला ) बसतो आहे आणि याचे उत्तम उदहरण म्हणजे उत्सवाच्या अंधानुकरणामुळे होणारे विविध प्रकारचे प्रदूषण . या वर्षीची पाणी परिस्थिती लक्षात घेता 'जलप्रदूषण ' टाळणे आत्यंतिक आवश्यक आहे .
पूर्वीच्या काळात श्री गणेशाची मूर्ती मातीची असे . आरास -सजावटी करिता पाने -फुले या सारख्या निसर्गातून मिळणाऱ्या आणि निसर्गातच मिसळणाऱ्या वस्तूंचा उपयोग होत असे . उत्सवाचे स्वरूपही मर्यादित होते . सर्वच क्षेत्रात बदल झाले तद्वतच धार्मिक उत्सवही यास अपवाद असत नाही . काही गोष्टी सोयीनुसार तर काही अपरिहार्यतेतून बदलल्या आहेत . घरगुती उत्सवालाही आजकाल सार्वजनिक स्वरूप आले आहे , मग सार्वजनिक उत्सव तर बघायलाच नकोत ! शाडू मातीच्या मूर्तींची जागा आता पीओपीने घेतली आहे . आरास -सजावट थर्माकोलचे मखर तर नैसर्गिक पाना-फुलाच्या ऐवजी कुत्रिम पाना-फुलांचा वापर करण्याकडे कल वाढला आहे .
उत्सवांचे स्वरूप बदलले पण दृष्टीकोनात कालानुरूप बदल न झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत . त्यापैकी एक म्हणजे 'निर्माल्याचे विसर्जन '. मूर्तीला वाहिलेल्या फुले / हार ,वस्त्र ,आरास यांचे पावित्र्य जपण्यासाठी ते पाण्यातच विसर्जन करण्याचा अटटाहास दिसतो . पूर्वी पाणी वाहते असायचे आज त्याचे दुर्भिक्ष आहे . या वर्षी तर आहे ते पाणी कसे पुरवायचे याची चिंता आहे , त्यामुळे उपलब्ध पाण्याचे प्रदूषण परवडणारे नाही .

मुलभूत प्रश्न हा आहे कि निर्माल्य कुठेही
विसर्जित केले तरी अपवित्र कसे होऊ शकते .उलटपक्षी ते ज्या ठिकाणी पडेल ते ठिकाण
पवित्र होईल हि श्रद्धा असायला हवी. निर्माल्य पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून ते
पाण्यातच विसर्जित करण्याचा दुराग्रह परमेश्वरावरील भक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण
करणारे आहे.याला श्रद्धा असे संबोधण्या ऐवजी अंधश्रद्धा म्हटल्यास वावगे
ठरणार नाही . परमेश्वराच्या सानिध्यात आलेली वस्तू पुन्हा अपवित्र होऊच कशी शकते .
अगदी उच्च शिक्षित नागरिक सुद्धा जेंव्हा सुटाबुटात
महागड्या गाडीतून उतरून प्लास्टिक
पिशवी सह उदबत्ती पुडे , प्लास्टिक हार/ फुले
, थर्माकोलचे मखर ,वस्त्रे ,प्रसादाचे
खोके इ.... साहित्य पाण्यात टाकतात तेंव्हा शिक्षणाने
सुद्धा श्रद्धा व अंधश्रद्धा यातील अंतर पुसले जात नाही हेच खरे . हि कृती करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला
हवी कि आपण जरी निर्माल्य
पाण्यात टाकले तरी ते शेवटी ते इतर कोणाच्या
तरी माध्यमातून
डम्पिंग ग्राउंड लाच जाते . त्या पेक्षा आपणच ते 'निर्माल्य
कलशात ' टाकल्यास किमान पाण्याचे
होणारे प्रदूषण तरी रोखले जाईल .
इतरांकडे बोट दाखवत वेळ निभाऊन नेण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरवात करून श्री .गणेशा हि आरंभ देवता आहे हि श्रद्धा सार्थ ठरवावी . जो पर्यंत आपल्या कृतीत बदल होत नाही तो पर्यंत " भैया , ये श्रद्धा और अंधश्रद्धा कि बिचकी दिवार तुटेगी कैसी और कब " हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा