THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

आमच्या गणरायालाही गुळगुळीत रस्ते चालतील

Normal 0 false false false EN-US X-NONE MR
                                                                                                                         
                          
Normal 0 false false false EN-US X-NONE MR
                                                                                                                         
                         
मुंबई -ठाणे -पुणे या ठिकाणचे 'गणराय ' एका अर्थाने जास्त सुदैवी म्हणावे लागतील . गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर
वर्तमानपत्रे - टीव्ही वाहिन्या द्वारे  या शहरातील रस्त्यांची  दुर्दशा , त्यावरील खड्ड्यांची मोजदाद  हा विषय ऐरणीवर आणला जातो . त्यानंतर मग
सबंधित प्रशासन अगदी युद्धपातळीवर हालचाल करून बाप्पांसाठी गुळगुळीत  रस्ते बनवतात . "नेमची येतो पावसाळा...."या नुसार प्रतिवर्षी
कुठलाही खंड न पडता हा सगळा सोपस्कार विनाव्यत्यय पार पडत असतो . दरवर्षी डागडुजी करूनही पुन्हा पुन्हा गणरायाच्या  आगमन रस्त्यावर
खड्डे कसे पडतात हा प्रश्न यापैकी कोणाच्याही मनाला शिवत नाही ( कदाचित राष्ट्रद्रोहाचा गुन्हा मागे लागेल म्हणून गप्प बसत असावेत ....बाप्पा
त्यांना तशी सुबुद्धी देत असावेत )

                      
या उलट ग्रामीण भागात ( म्हणजेच सगळीकडे ! मागासलेला हे  बिरूद मिरवणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबाद हे प्रगत शहर आहे
...हि अफवा आहे ) रस्ता/रोड  हि संकल्पनाच इतिहास जमा झाल्यासारखी आहे . "खड्ड्यांची सलग मालिका म्हणजे रोड" हि नवी कल्पना गेल्या
काही वर्षात रुजताना दिसत आहे . 'पोटातले पाणी हलत नाही' हा एक रस्त्याचा दर्जा ध्वनित करण्याचा प्रघात , पण पाणी प्यायलाच नाही
त्यामुळे हा रस्ता तपासणीचा मार्गही कुचकामी ठरतो .एकदा रस्ता बनवला कि पुन्हा त्याकडे बघणे नाही हा इथला शिरस्ता .  जे काही होत असेल
ते फक्त कागदोपत्रीच . मराठवाड्याला तसा या बाबतीत प्रदीर्घ अनुभव आहे . इथे विहिरी , शाळा , सौचालये सर्व काही कागदावरच असते .

         
शहरात जशी माणसे राहतात तशीच जिवंत माणसे खेड्यातही राहतात याचाच विसर याच खेड्यातून मुंबईला जाऊन 'साहेब ' झालेल्या
अधिकारी व राज्यकर्त्याना नाही  हेच आमचे दुर्दैव्य. गर्भपातावर बंदी आल्यापासून म्हणे शहरातील माणसे आमच्या गावाकडच्या रस्त्यावरून गाड्या
नेवून आपले इप्सित साध्य करतात ( कृपया कुठे वाच्यता करू नका ,गुप्तता पाळा!)

      
माननीय मुख्यमंत्र्यांना समस्त जनतेतर्फे विनम्र निवेदन आहे कि , आम्हीही या महाराष्ट्रातील मतदार आहोत आणि आमच्या 'गणरायालाही '
गुळगुळीत रस्त्यावरून यायला मनापासून  आवडेल .......एकदातरी ते भाग्य आम्हाला आणि आमच्या गणरायाला लाभू दे हि इच्छा .....आमच्या
बाप्पाचा आवाज मुंबई पर्यंत पोहचत नसेल तर मुंबई -पुणे -ठाण्यातील  प्रसिद्ध गणराय व त्यातील राजांना मागणं आहे कि ,किमान आमचा आवाज
तुमच्या मार्फत तरी महाराष्ट्राच्या मंत्रालयातील राजा पर्यंत पोहचू दे .( थेट आवाज ऐकण्याची सवय नसल्यामुळे आपण 'मध्यस्थी' करावी ,आदत     से मजबूर ....)
        सध्या  श्वेतपत्रिका काढण्याचे  फ्याड आले  आहे  मा. मुख्यमंत्र्यांनी एकदा संपूर्ण राज्यातील रस्त्यांचे त्रयस्त यंत्रणे मार्फत तपासणी
करावी म्हणजे दुधात पाणी किती व दुध किती (रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते ) हे उजेडात येईल . स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही 'भारत ' रस्ते
,पाणी ,निवारा ,आरोग्य ,वीज यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे , जो काही थोडाफार विकास झाला आहे तो 'इंडियाचा '. संपूर्ण भारताचे
इंडियात रुपांतर होईल तेव्हाच  सर्वसमावेशक विकास झाला असे म्हणता येईल .

ता.क .: आमच्या गजराजालाही रोषणाई / प्रकाशाचे  वावडे नाही . तूर्त ४० चा बल्ब पेटण्या इतकी वीज मिळाली तरी गणपतीच्या आगमनाचे
सार्थक झाल्यासारखे आहे .

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा