THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

GADKARI लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
GADKARI लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पासपोर्टच्या धरतीवर आरटीओ कार्यालयांचे खाजगीकरण आवश्यक ...

                              " आरटीओ कार्यालये म्हणजे भ्रष्टाचाराची आगारे " हे समीरकरण वर्षानुवर्षे अधोरेखीत झालेले आहे .  अनेक सरकारे आली  आणि गेली परंतू दुर्दैवाने आजही हेच समीकरण आहे आणि त्यात तिळमात्र बदल झालेला नाही याची प्रचिती नागरिकाना सातत्याने येते आहे .

         नवी मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्सच्या नूतनीकरणासाठी गेलो असता अजूनहीएजेंट राज” असल्याचे स्पष्टपणे दिसते .थेटपणे अर्जावर एजेंटचा 'मार्क ' केला जातो .   मुळात काही नियम हे सरकारी खाबुगिरीला खतपाणी घालण्यासाठीच असतात असे वाटते आणि त्यातील एक म्हणजे 'मेडिकल सर्टिफिकेट्चा 'सोपस्कार होय . प्रश्न आहे तो यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा.

        पासपोर्ट ऑफिसच्या बाबतीत देखील हीच संस्कृती होती .पासपोर्ट कार्यालयाचे खाजगीकरण केल्यामुळे वर्तमानात पासपोर्ट काढणे हे  वाहन परवाना काढण्यापेक्षा अधिक सुलभ झालेले आहे .   खाजगीकरणामुळे अतिशय शिस्तबद्ध पारदर्शक व्यवस्था हे वर्तमानातील पासपोर्ट ऑफिसचे वैशिष्ट्य ठरते आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे पासपोर्ट सेवेचे निम -खाजगीकरण होय . पासपोर्ट साठीची सर्व प्राथमिक प्रक्रिया टीसीएस पार पाडते केवळ ओरिजिनल कागदपत्रांची तपासणी सरकारी अधिकारी करतात .



                     आज भारतात अपघातात बळी जाणारयांची संख्या हि अन्य कुठल्याही आपत्तीमुळे खूप अधिक आहेत आणि याचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे याकार्यालयातील भ्रष्टाचार आणि अनियमितता” . ज्या व्यक्तीला संगणकाचे कीबोर्ड माहित नाही त्या व्यक्ती देखील 'ऑनलाईन ' परीक्षेत पास होतात यातच सर्व काही आले .

        ब्लाईंड टर्नवर थेट उजवीकडून वळणारा वाहनचालक ,  इंडिकेटर देता भसकन डावी -उजवीकडे वळणारी वाहने , सिग्नलवर थेट डावी कडून अनेक वाहनांना वळसा घालत मागून येणाऱ्या वाहनासमोरून उजवीकडे वळणारे वाहन चालक , वाहनांना काळ्या काचाचे बंधन  हा नियम करून / वर्षांचा कालावधी झालेला असताना देखील काळ्या काचा लावून 'थाटात ' चालणारे वाहने ... या  पेक्षा व्यवस्था दर्शवणारा "आरसा" काय असू शकतो .          

             होय ! हे कोणीच नाकारू शकत नाही की ,गेल्या काही वर्षात आरटीओ कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत . तांत्रिक दृष्टीने वर्तमान व्यवस्था अधिक सक्षम झालेली आहे या विषयी दुमत संभवत नाही . खरा प्रश्न आहे तो ती व्यवस्था चालवणाऱ्या मानसिकतेचा . आरटीओ विभागात नोकरी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी ' हि भावना रक्ताच्या थेंबाथेंबात रुजलेली असल्यामुळे सरकारच्या अनेक प्रयत्नानंतर देखील त्यात बदल होताना दिसत नाही . त्यामुळे आता एकमेव पर्याय दिसतो तो म्हणजे "व्यवस्थाच फुलप्रूफ 'करणे आणि त्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 'पासपोर्टच्या धर्तीवर ' आरटीओ कार्यालयांचे निम खाजगीकरण करणे .

                   लर्निग आणि कायमचा वेगवेगळा परवाना अशी गुंतागुंतीची वेळखाऊ प्रक्रियेला मूठमाती देत 'सिंगल स्ट्रोक फुलप्रूफ़ व्यवस्था ' अंगिकारायला हवी .    दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे , रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठवता , पाशात्य देशातील नियमाप्रमाणे लायन्सस धारकाला लायसन्स देताना १२ क्रेडीट पॉईंट दयावेत , भविष्यात त्याच्या कडून वाहतूक नियमांचे केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या स्वरूप गांभीर्यतेनुसार त्याच्या खात्यातून क्रेडिट पॉईंट्स वजा करावेत आणि त्याचे पॉईंट्स शून्य झाल्यावर त्यास देशात वाहन चालवण्यास संपुर्णतः बंदी असावी .

सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई .