टाटा समूहाला कँसर हॉस्पिटल्स साठी
मुंबई -नवी मुंबई सह प्रत्येक जिल्हयात मोफत
भूखंड देऊन १४० करोड जनतेच्या मनातील
"भारत रत्न " असणाऱ्या रतन टाटांना महाराष्ट्र सरकारने आदरांजली द्यावी
!
सचोटी , दर्जा व मूल्याधिष्टित उद्योग या गोष्टींशी बांधिलकी जपत आपला उद्योग -व्यवसाय करणाऱ्या टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने तातडीने भारत सरकारकडे टाटांना भारतरत्न देण्याची शिफारस केलेली आहे . खरे तर टाटांनी आपल्या कर्तृत्वाने , सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करोडो नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलेले आहे . त्यांनी देशाप्रती दिलेल्या योगदानातून प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केलेले असल्याने टाटांच्या निधनानंतर काही करोड नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणारे स्टेट्स ठेवून ते खऱ्या अर्थाने भारतरत्न असल्याचे सप्रमाण स्पष्ट केलेले आहे .
आरोग्य सेवा हे खरे तर सरकारचे घटनात्मक कर्तव्य परंतू टाटा समूहाने गेली अनेक दशके कॅन्सर हॉस्पिटल चालवून तो भार आपल्या खांद्यावर घेऊन करोडो नागरिकांच्या वेदनेवर फुंकर घातलेली आहे . कॅन्सर उपचार अधिकाधिक सुलभ व वेदनाशून्य व्हावे यासाठीच्या संशोधनावर करोडो रुपयांचा निधी खर्च केलेला आहे . आज संपूर्ण भारतात कोणाही व्यक्तीला कँसरचे निदान झाले की पहिले डोळ्यासमोर येते ते टाटांचे मुंबईतील कॅन्सर हॉस्पिटल . हॉस्पिटल समोरील फुटपाथवर राहून आपल्या कुटुंबीयांतील सदस्यांवर ट्रीटमेंट घेतली जाते .
महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की , टाटांना " भारतरत्न " देण्याची शिफारस करण्याबरोबरच स्वतःचे उत्तरदायित्व या नात्याने टाटा समूहाला कॅन्सर हॉस्पिटलसाठी मुंबई -नवी मुंबईत मोठा भूखंड मोफत द्यावा . त्याच बरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर वरील उपचार करण्यासाठी हॉस्पिटल सुरु करण्यासाठी भूखंड द्यावेत . टाटा समुहावरील विश्वासामुळे अनेक कंपन्या त्यांना आपला सीएसआर फंड मोठ्या प्रमाणावर देतील. आपल्या राज्यात अनेकांना दान करायची ईच्छा असते परंतू त्या पात्रतेचे हात दिसत नसल्याने ते हात आखडता घेतात ते देखील जिल्ह्याजिल्ह्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी आर्थिक योगदान सढळ हाताने देऊ शकतील .
असे ही राज्य सरकारकडे भूखंडाची कमी नाही हे लोकप्रतिनिधींच्या संस्थांना { घरगुती संस्थांना } सढळ हाताने दिल्या जाणाऱ्या भूखंड वाटपावरून स्पष्ट दिसते . त्यामुळे सरकारने टाटा समूहाला तातडीने भूखंड द्यावेत . जन मनातील भारतरत्न असणाऱ्या 'द कम्प्लिट मॅन रतन टाटांना ' ती खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल .
खूप छान कल्पना...टाटा हयात असतानाच सरकारने त्यांना प्रस्ताव दिला असता तर आज कॅन्सर पीडितांना अजून खूप मोठा दिलासा मिळाला असता...सुधीरसर, तुमच्या कल्पनाशक्तीला व विचारांना सॅल्युट...!
उत्तर द्याहटवा
हटवाधन्यवाद सर
दाणी सर, खरोखर तुम्ही जे सरकारला हॉस्पिटल साठी जागा देण्याचे सांगितले आहे. हे सामान्य जनतेच्या मनातील भावना, वेदना मांडल्या आहेत आणि ह्याच्यावर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही माझी नम्र व कळकळीची विनंत्ती आहे.
उत्तर द्याहटवारतन टाटा सर आपल्या कार्याला सलाम तुम्हाला भारत रत्न द्यायची काय जरूरत तुम्ही स्वताच एक भारत रत्न आहात आजच्या नंतर रतन टाटा सर हाच एक पुरस्कार आसला पाहिजे
उत्तर द्याहटवाकल्पना आवडली आहे पण सरकारला जागे करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो
उत्तर द्याहटवा