THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७



प्रति ,
मा . आयुक्त ,
पनवेल महानगर पालिका , पनवेल .
विषय पनवेल पालिका हद्दीतील  डक्ट  (Multilayer Ducts ) सुविधा अनिवार्य करणे        
                 बाबत .
संदर्भ :       सकाळ नवी मुंबई डिसेंबर वृत्त : "दरामुळे महावितरणला धक्का "महापालिकेला हवेत रस्ता     
                  पुनर्रदुरुस्तीसाठी मीटरमागे हजार ".

      महोदय ,


         वर्तमान युग हे विज्ञान -तंत्रज्ञानाचे आहे . कोणाची इच्छा असो वा नसो , आगामी /१० वर्षात सर्वच व्यवहार 'ऑनलाईन ' होणार आहेत . राज्य सरकारे आणि केंद्र सरकार देखील डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहत आहेत . परंतू प्रश्न हा आहे की , त्या साठी अत्यावश्यक विनाव्यत्यय नेटवर्क देण्यासाठी आपली प्रशासकीय व्यवस्था सक्षम आहे का ? अतिशय खेदाने नमूद करावे लागेल की , आजची आपली प्रशासकीय व्हिजन कार्यसंस्कृती  हि  "रस्ते खुदाईची  " आहे . उपरोक्त वृत्त याचीच साक्ष देते .

    रस्ते खुदाईमुळे वारंवार केबल तुटणे आणि त्यामुळे नेटवर्क मध्ये वारंवार व्यत्यय येणे हे आपल्याकडे नित्याचेच आहे . नव्हे ते ग्राहकांनी आणि सर्व सरकारी यंत्रणांनी गृहीतच धरलेले आहे . रस्ता बनवणे आणि तदनंतर अगदी / महिन्याच्या कालावधीतच ते पालिकेच्या परवानगीने खोदणे हा देखील एक प्रशासकीय भागच झाला आहेअर्थातच यास देशातील कुठलीच स्थानिक स्वराज्य संस्था अपवाद असत नाही , अगदी  "स्मार्ट , एकविसाव्या शतकातील शहरांच्या महानगर पालिका देखील "

   महोदय ,

    भविष्यात खऱ्या अर्थाने डिजीटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी तयार रहावयाचे असेन , सक्षम रहावयाचे असेन तर वर्तमान दृष्टिकोनात आमूलाग्र बदल करत रस्ते खोदता ,अस्तित्वात असणाऱ्या पब्लिक यूटिलिटीजना हानी पोहचवता देखील अधिकच्या पब्लिक युटिलिटीज जसे एमएसईबीच्या वीजवाहिन्या , टेलिफोन विभागाच्या केबल्स , गॅस पाईपलाईन .... अन्य ... टाकता येतील अशी सुविधा निर्माण करणे . आणि यासाठीचा सर्वोत्तम आणि अनेक विकसीत देशात वापरात असणारा पर्याय म्हणजे  बहुस्तरीय भुयारी डक्टस( Multi-layer Ducts )  रस्ता तिथे डक्ट हे व्हिजन काळाची गरज आहे आणि पनवेल पालिकेने त्या दिशेने पाऊले उचलावीत त्यासाठीचा हा पत्र प्रपंच .

डक्ट म्हणजे काय ?: 


                 डक्टम्हणजे रस्ता तयार करत असताना ( आपल्याकडे रस्ते "बनवतात" ?)  रस्त्याच्या कडेला विविध आकाराचे पाईप टाकून ठेवणे . रस्त्याच्या स्वरूपानुसार खाली मोठ्या आकाराचे पाईप तर वरती लहान आकाराचे पाईप टाकणे . तदनंतर मागणीनुसार त्या त्या संस्थेला विशिष्ट पाईप वापरावयास द्यावयाचा आणि त्या बदल्यात भाडे आकारायाचे . सध्या २७०० ते ३५०० प्रति मीटर खोदाई चार्ज आकाराला जातो त्या ऐवजी कमी दार आकारून रस्त्ये खुदाईमुळे रस्त्याची होणारी हानी आणि पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीची हानी रोखली जाऊ शकते .

   महोदय , आपण या पत्राची दखल घ्याल या अपेक्षेने थांबतो .
     सकारात्मक प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत .
                धन्यवाद .



                                                                        कळावे ,
                                                                सुधीर लक्ष्मीकांत दाणी                                          

                                                                                                                                                    ९८६९ २२ ६२ ७२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा