THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

'धर्मनिरपेक्ष राष्ट्र' : दांभिकतेचा कळस

Normal 0 false false false EN-US X-NONE MR
Normal 0 false false false EN-US X-NONE MR
                    आसाम मधील हिंसाचाराकडे तटस्थपणे पह्ण्याचा दृष्टीकोन असो की ११ ऑगस्टच्या आझाद मैदानावरील "दबंग शाहीला " हाताळण्याचा प्रश्न असो, राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका "लोकशाहीला " मारक आहे याविषयी सामान्य नागरिकांच्या मनात दुमत नाही . मुळातच 'धर्मनिरपेक्ष राष्ट्रहि आपली संकल्पना दांभिकतेचा कळस आहे . "विशिष्ट धर्माचे लांगून-चालन म्हणजे धर्मनिरपेक्षता" या एकमेव तत्वावर जी आजवर राजकीय वाटचाल झाली आहे तिची परिणीती म्हणजेच वरील घटना होत .
                       
देशाला कुठला धर्म नसतो हे वादापुरते मान्य केले तरी ' राष्ट्रधर्म ' हाच खरा देशाचा धर्म असतो हे हि विसरता कामा नये आणि दुर्दैवाने आज आपल्याला त्याचाच विसर पडलेला दिसतो . मतांच्या राजकारणाच्या झापडबंद दृष्टिकोनामुळे स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतरही देशाचा नागरिक हि ओळख नि:संधीगद्पणे पटवणारे ओळखपत्र आपण देऊ शकलो नाहीत या पेक्षा दुर्दैव्य काय असू शकते . सीमा संरक्षणावर करोडो रुपये खर्च करूनही अनेक नागरिक भारतात प्रवेश करतात , इथे येऊन निवडणूक ओळखपत्र बनवतात, सर्व सरकारी यंत्रणाच लाभ घेतात . ज्यांची मजल तिथपर्यंत पोहचत नाही ते कुठलाही पुरावा नसताना बिनदिक्कतपणे राहू शकतात हे सर्व आश्चर्यकारक आहे .
                        
आज बांधकाम मजूर हे बहुतांश बांगलादेशी आहेत , डान्स बारमधील ५० % पेक्षा अधिक बारबाला ह्या बांगलादेशी आहेत हे नागडे सत्य आहे . राज ठाकरेंनी आझाद मैदानावर हजारो नागरिक व शासनासमोर सिंगल एन्ट्री  बांगलादेशाचा पासपोर्ट दाखवून 'अनधिकृत नागरिकांचा प्रश्न' ऐरणीवर आणला आहे . आसाम मधील हिंसाचार भारताची भवीश्यातील वाटचाल अधिक बिकट असणार आहे हेच अधोरेखित करतो .  भारत म्हणजे बांगलादेशी नागरिकांसाठी अधिकृत 'धर्मशाळा ठरत आहे असे असताना आपली प्रशासकीय  यंत्रणा  आणि राजकीय पक्ष मात्र एकमेकावर दोषारोप करण्यात मश्गुल आहेत . प्रश्न , समस्यांच्या मूळाशी न जाता तो भिजत ढेवणे हे जास्त सोयीस्कर वाटते हि भूमिका त्वरित बदलाने आवश्यक आहे . प्रश्नाची दाहकता समजूनही त्याकडे यापुढेहि  याच प्रकारे दुर्लक्ष होणार असेल तर भारताचे भविष्य काय व ते कोणाच्या हातात असेल हे सांगण्यासाठी कोण भविष्यावेत्याची आवशकता नसावी . असंवेन्दनशील राज्यकर्ते आणि प्रशासकीय निष्क्रियता हा हि वर्तमान परिस्थितीत देशापुढील सर्वात महत्वाची समस्या आहे .
                    
अनधिकृत नागरिकांचा प्रश्न अतिशय कणखरपणे हाताळणे आवशक आहे  आणि दुर्दैवाने ती हाताळण्याची राजकीय , प्रशासकीय इच्छा शक्ती आज कुठल्याही राजकीय पक्ष वा सरकारकडे नाही .
दृष्टीशेपातील उपाय :
  • पोलीस यंत्रणाचे राजकीय ध्रुवीकरण थांबवण्याकरिता देशातील संपूर्ण पोलीस यंत्रणा स्वायत करा .
  • विविध प्रकारचे ढीगभर ओळखपत्र देण्यापेक्षा एक आणि एकमात्र  'ग्रीनकार्ड 'च्या धर्तीवर अद्ययावत  , नवनवीन तंत्रज्ञानने ट्रक (track ) ठेऊ शकणारे  इंटेलीजन्ट ओळख पत्र द्यावे . ( आधार ओळखपत्रही आजच्या काळात तकलादू आहे ).
  • रेल्वेस्टेशन , विमानतळ , गर्दीचे सार्वजनिक ठिकाणे , सरकारी -खाजगी आस्थापने  याठिकाणी  मेटल डिटेक्टर सोबत या ओळखपत्रांची स्वयंचलित नोंद ठेवणारी यंत्रणा विकसित करावी.
  • आर एफ तंत्राद्यानाच्या सहायाने प्रत्येक नागरिकाचा रिमोट  ट्रक (track )  ठेवणारी यंत्रणा विकसित करावी . वर्तमान दंडुका धारी पोलीस यंत्रणा कधीच बाद झाली आहे कारण गुन्हेगार हे  आधुनिक तंत्राद्यानाने परिपूर्ण आहेत .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा