“मिसिंग लिंक” जुळली… पण द्रुतगती मार्गावरील अतार्किक वेगमर्यादेची ‘मिसिंग लॉजिक’ कधी दुरुस्त होणार?
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली–कुशगाव दरम्यानच्या बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेलेले असल्याने मिसिंग लिंक सुरु होणार हि वाहनचालकांसाठी खुशखबर आहे . सरकारचे मिसिंग लिंकसाठी अभिनंदन .
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करून अत्याधुनिक बोगदे, पूल आणि वळणे सुधारण्याचे काम शेकडो कोटी रुपये खर्चून केले जात आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या निमित्ताने एक उपरोधिक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो—अभियांत्रिकीतील ‘मिसिंग लिंक’ शोधून ती दुरुस्त करण्याची तयारी दाखवणारे प्रशासन, द्रुतगती मार्गावरील ‘अतार्किक वेगमर्यादे’तील स्पष्ट विसंगतीकडे कधी लक्ष देणार?
सध्या पुण्याहून मुंबईकडे येताना घाट विभागात हलक्या वाहनांसाठी ६० किमी प्रति तास आणि जड वाहनांसाठी ४० किमी प्रति तास अशी वेगमर्यादा आहे. प्रत्यक्षात घाटाच्या तीव्र उतारावर चालकाने एक्सलरेटर न दाबताही वाहनाचा नैसर्गिक वेग ६० किमीपेक्षा अधिक होतो. अशा परिस्थितीत ब्रेक दाबून वेग रोखत बसणे हे तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य असून वाहनाच्या यांत्रिक सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारे ठरते.
त्यातच नवी मुंबईच्या वेशीवर ३० ते ५० किमी प्रति तास इतकी अत्यल्प वेगमर्यादा लावण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर एवढी कमी मर्यादा ठेवणे हे सुरक्षिततेपेक्षा वाहनधारकांना दंडाच्या सापळ्यात अडकवण्याचे साधन ठरत असल्याची भावना निर्माण होते.अपघात टाळणे हे निश्चितच महत्त्वाचे उद्दिष्ट आहे; मात्र त्यासाठीचे नियम वास्तववादी आणि व्यवहार्य असणे आवश्यक आहे.
प्रत्यक्षात अपघातांचे प्रमुख कारण केवळ वेग नसून ‘लेन शिस्तीचा अभाव’ हे आहे. जड वाहने दुसऱ्या व तिसऱ्या लेनमध्ये विनाअनुशासन धावत असतात, अचानक लेन बदलणे , दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे यांसारख्या बाबी अपघातांना आमंत्रण देतात. या गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून केवळ वेगमर्यादा घटवणे हा समस्येवरचा परिणामकारक उपाय ठरत नाही.म्हणून प्रशासनाने द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेची पुनर्रचना वैज्ञानिक पद्धतीने करणे गरजेचे आहे.
सरसकट हलक्या वाहनांसाठी १०० किमी प्रति तास आणि जड वाहनांसाठी ८० किमी प्रति तास अशी तार्किक मर्यादा निश्चित करावी. तसेच ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित तंत्रज्ञानाचा वापर केवळ वेग मोजण्यासाठी न करता, लेन शिस्त मोडणारे, अचानक कट मारणारे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी करावा. यामुळे सुरक्षितता आणि प्रवासाचा वेग या दोन्ही गोष्टींचा समतोल साधता येईल.ज्याप्रमाणे आधुनिक अभियांत्रिकीने डोंगर छेदून ‘मिसिंग लिंक’ जोडली, त्याचप्रमाणे जुनाट आणि अतार्किक वेगमर्यादेतील ‘मिसिंग लॉजिक’ दूर करून नियमही आधुनिक आणि व्यवहार्य करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा रस्ते ‘स्मार्ट’ होत असताना नियम मात्र ‘जुनाट’ राहतील, अशी विसंगती कायम राहील.
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी कळते की , रोज मुंबई पुणे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी व अन्य व्यावसायीक वाहनांची यादी वाहतूक पोलीस यंत्रणेकडे असून त्यांच्याकडून मासिक शुल्क वसूल केले जात असल्याने अशी वाहने निर्धास्तपणे वेग मर्यादेचे उल्लंघन करत सुसाट धावत असतात .
=====================================🚧 “मिसिंग लिंक” जुळली…
❗ पण द्रुतगती मार्गावरील अतार्किक वेगमर्यादेची ‘मिसिंग लॉजिक’ कधी दुरुस्त होणार?
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली–कुशगाव दरम्यानच्या बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून 🚗💨 वाहनचालकांसाठी ही नक्कीच मोठी खुशखबर आहे!
👉 सरकारचे यासाठी मनापासून अभिनंदन 👏
🏗️ अभियांत्रिकी सुधारली… पण नियम?
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करून:
- अत्याधुनिक बोगदे 🚇
- मजबूत पूल 🌉
- सुरक्षित वळणे ↩️
यावर शेकडो कोटींचा खर्च करण्यात आला — ही नक्कीच स्वागतार्ह बाब 👍
👉 पण एक प्रश्न मात्र कायम:
अभियांत्रिकीतील ‘मिसिंग लिंक’ सापडली…
मग वेगमर्यादेतील ‘मिसिंग लॉजिक’ कधी सापडणार? 🤔
⚠️ अतार्किक वेगमर्यादा = धोकादायक वास्तव
📍 घाट विभागात सध्याची वेगमर्यादा:
- हलकी वाहने: ६० किमी/तास 🚗
- जड वाहने: ४० किमी/तास 🚛
👉 प्रत्यक्षात काय घडते?
घाटातील तीव्र उतारावर वाहनाचा वेग नैसर्गिकरित्या ६०+ किमी/तास होतो!
❗ सतत ब्रेक दाबून वेग नियंत्रित करणे:
- तांत्रिकदृष्ट्या अव्यवहार्य ⚙️
- ब्रेक सिस्टमसाठी धोकादायक 🔥
- अपघाताचा धोका वाढवणारे ⚠️
🚨 नवी मुंबई वेशीवरील ‘स्लो ट्रॅप’?
📍 नवी मुंबईच्या वेशीवर वेगमर्यादा:
👉 ३०–५० किमी/तास 😳
👉 द्रुतगती मार्गावर एवढी कमी मर्यादा म्हणजे:
- सुरक्षिततेपेक्षा ❌
- दंड वसुलीचे साधन ✔️
अशी भावना वाहनचालकांमध्ये निर्माण होत आहे.
📊 अपघातांचे खरे कारण काय?
🚫 फक्त वेग नाही… तर:
- लेन शिस्तीचा अभाव 🚧
- अचानक लेन बदल 🔀
- सुरक्षित अंतर न ठेवणे 📏
- चुकीचे ओव्हरटेक ⚡
👉 या गोष्टींमुळेच अपघात होतात!
❗ मग फक्त वेगमर्यादा कमी करून उपाय होणार का?
👉 नाही!
🤖 स्मार्ट रस्ते vs जुनाट नियम?
आज रस्ते “स्मार्ट” झाले आहेत…
👉 पण नियम अजूनही “जुनाट” आहेत! 😐
✅ काय असावे उपाय?
✔️ हलकी वाहने: १०० किमी/तास 🚗
✔️ जड वाहने: ८० किमी/तास 🚛
👉 वैज्ञानिक आणि व्यवहार्य मर्यादा लागू करणे आवश्यक
🤖 AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर:
- फक्त स्पीड कॅमेरे नाही ❌
- लेन उल्लंघन पकडणे ✔️
- चुकीचे ओव्हरटेक रोखणे ✔️
- धोकादायक ड्रायव्हिंगवर कारवाई ✔️
👉 यामुळे सुरक्षितता + वेग = संतुलन साधता येईल ⚖️
⚠️ आणखी एक गंभीर मुद्दा
माहितीनुसार 🚨
👉 काही व्यावसायिक वाहने (टॅक्सी इ.)
👉 मासिक “सेटिंग” करून 😶🌫️
👉 वेगमर्यादा उल्लंघन करून मोकळेपणाने धावत असतात
❗ हे असेल तर…
👉 नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का? ❓
🔥 अंतिम प्रश्न
👉 डोंगर फोडून “मिसिंग लिंक” जोडली…
👉 पण नियमांतील “मिसिंग लॉजिक” कधी जोडणार?
❗ अन्यथा:
रस्ते स्मार्ट… नियम आउटडेटेड…
आणि नागरिक कायम दंडाच्या जाळ्यात! 🚫
✍️ सुधीर लक्ष्मीकांत दाणी
📍 बेलापूर, नवी मुंबई
💬 तुमचे मत काय? वेगमर्यादा बदलायला हवी का? कमेंटमध्ये जरूर सांगा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा