THIRD EYE VISION या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी सुधीर दाणी सहर्ष स्वागत करतो .

पृष्ठे

एकूण पृष्ठदृश्ये

BSNL लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
BSNL लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

व्यवसायिक दृष्टिकोणा अभावी सरकारी कंपन्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह !!!

   केंद्राने वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे निर्देश दिल्यानंतर 'महावितरणाच्या खाजगीकरणास विरोध ' करताना महाराष्ट्राच्या  ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केलेली मते हि एकुणातच सरकारी कंपन्यांकडे  नेत्यांचा  'व्यवसायशून्य दृष्टिकोन " अधोरेखित करणारी   आहेत. वीज  वितरणचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य ग्राहक हिताला बाधा पोहचेल , राखीव जागांच्या नोकऱ्यावर गदा येईल , मोदी सरकारचे धोरण हे सरकारी कंपन्यांचे खच्चीकरण करून तो व्यवसाय खाजगी कंपन्यांच्या खिशात घालण्याचा डाव आहे हि केवळ "राजकीय अर्थाची"  मते दिसतात .  

            सन्माननीय ऊर्जा मंत्र्यांना महावितरण विषयी एवढेच प्रेम असेल तर त्यांनी सर्वात आधी महावितरणच्या  कारभाराकडे "डोळसपणे " पहावे . महावितरण मध्ये ‘कमाल ‘दर देऊन केली जाणारी’ किमान’ दर्जाच्या साहित्याची खरेदी , ग्राहक -कर्मचारी/अधिकारी यांच्या अर्थपूर्ण संबंधातून होणारी वीजगळती , लोकप्रतिनिधी व बडे उद्योगपती यांच्याकडून  'उघडपणे' केली जाणारी 'वीज चोरी '  , ग्रामीण भागात ५० टक्क्याहून असणारी अनधिकृत वीजजोडण्या , स्थानिक स्वराज्य संस्थाकडून वीज बिल न भरता केला जाणारा विजेचा अपव्यय , आजही कर्मचारी -अधिकाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय न मिळणारे वीज कनेक्शन या गोष्टींचा विचार करत उपाय योजना कराव्यात . महावितरणाचा कारभार सुधरवण्यासाठी कुठल्याही उपाययोजना न करता  केवळ महावितरणचे खाजगीकरण नको ! या 'अर्थशून्य ' मताला  काहीच अर्थ उरत नाही .

       सर्वप्रथम , सर्व पक्षीय नेत्यांनी  "सर्वच सरकारी कंपन्या या  उत्तोमोत्तम सेवा देत ग्राहकहितास प्राधान्य देतात" तर  "खाजगी कंपन्या या ग्राहकांची लूट करत निव्वळ नफेखोरी करतात " हा अपप्रचार थांबवावा . 



           मुळात मोदी सरकार येऊन ६ वर्षे झालेली आहेत व रेल्वे ,दूरसंचार , महावितरण या कंपन्या ६ दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहेत .

        सरकारी कंपन्यांचा कारभार दिवाळखोरीकडे वाटचाल करणारा कसा असतो याचे आणखी मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एअर इंडिया .  एकेकाळी महाराजा अशी बिरुदावली मिरवणारी एअर इंडिया हि आज 'लिलावात ' निघाली आहे .  लोकप्रतिनिधी व सरकारी कंपन्यांचे प्रशासन यांचा दृष्टिकोनच व्यावसायिकतेचा नसल्यामुळे आज एखादा दुसरा अपवाद वगळता बहुतांश कंपन्या या दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत . हे  कटू असले तरी जमिनीवरील वास्तव आहे . ग्राउंड रियालिटी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ती झाकता येणार नाही . 

        प्रश्न हा आहे की , इतक्या वर्षाच्या काळात काय दिवे लावले या  सरकारी कंपन्यांनी.  ?  मंत्री महोदयांनी दूरसंचार कंपन्यांच्या उल्लेख केला आहे .

 एकदा सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल व एमटीएनएल च्या सेवेची गुणवत्ता तपासा व खाजगी दूरसंचार सेवेची गुणवत्ता तपासा म्हणजे आपसूकच  'खाजगी कंपन्यांचे महत्व ग्राहकात का वाढले ' हे समजू शकेल . लाखभर पगार घेऊन सदरील कंपन्यातील कर्मचारी -अधिकारी  गेली ७ दशके कोणती ग्राहक हिताची काम करत होते हे एकदा डोळसपणे पहा  . 

ग्राहकांच्या नजरेतून पाहिल्यास हि गोष्ट स्पष्ट होते की , दूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाल्यामुळे एकतर या क्षेत्राचा विस्तार झाला व दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकांचा आर्थिक फायदाच झाला .  एकेकाळी इनकमिंग कॉल ला १६ रुपये दयावे लागायचे आज तिथे काही पैशात सेवा मिळते आहे . स्पर्धेमुळे खाजगी कंपन्या ग्राहकांच्या दारात जाऊन सेवा देत आहेत , पूर्वी सरकारी कंपन्यांच्या दारात लाईन लावून देखील सेवा देण्यात सरकारी कंपन्यांना स्वारस्य असल्याचे दिसत नाही . अजूनही सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या कर्मचारी -अधिकाऱ्यांची वृत्ती बेफिकीरीचीच आहे .  अजूनही ग्राहकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्यावसायिक नसल्याचे सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या कार्यालयात कामासाठी गेल्यावर पदोपदी जाणवते .

           शरमेची बाब हि आहे की , या सरकारी दूरसंचार कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचारी -अधिकारी -नेत्यांचाच या कंपन्यांच्या  सेवांवर विश्वास नसल्यामुळे या कंपन्यांशी निगडित ९० टक्के कर्मचारी -अधिकारी -नेते हे   खाजगी कंपन्यांचे सिम व इंटरनेट कनेक्शन वापरतात .  

 सरकारी दूरसंचार कंपन्या व्यावसायिक दृष्टीकोनातून न चालविल्यामुळे  खाजगी कंपन्यांचा दूरसंचार क्षेत्रात विकास झाला . उत्तोमोत्तम सेवा देत या कंपन्या खऱ्या अर्थाने ग्राहकहित जपत आहेत . खाजगी कंपन्या ५जी विषयी घोषणा करत असताना सरकारी दूरसंचार कंपन्या २जी /३ जी च्या पुढे सरकत नाहीत हे विसरता कामा नये .  या पार्श्वभूमीवर सरकारी कंपन्यांचे अंधपणाने केलेले समर्थन ग्राहकहिताचे नक्कीच नाही हे सिद्ध होते .

             कुठल्याही व्यवसायाची भरभराट तेंव्हाच होते जेंव्हा "दर्जा"  उत्तम असतो . "जे जे सरकारी ,ते ते दर्जाहीन" असा सध्या राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील  सेवेच्या /कंपन्यांचा  नावलौकिक आहे . विविध राजकीय पक्षांची सरकारी आली आणि गेली पण सरकारी कंपन्यांच्या दर्जा मात्र घसरतच गेला हे जमिनीवरील वास्तव आहे . याचे उत्तरदायित्व आजवरच्या सर्व सरकारे व नेत्यांवर जाते . सरकारी कंपन्यांच्या अधःपतनास हे सर्व जबाबदार आहेत . त्यामुळे सरकारी कंपन्यांच्या नावाने मगरीचे आश्रू ढाळण्यात काहीच 'अर्थ ' नाही .  

            राखीव जागांच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगाराला मुकावे लागेल म्हणून  सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण नको  हे मंत्र्यांचे मतच अव्यावसायिक दृष्टीचे आहे . हा  दृष्टिकोन ' हलवायाच्या घरावर तुळशीपत्र '  मानसिकता दर्शवणारा आहे .   हे मत राजकीय पोळी भाजण्याच्या दृष्टीने योग्य  असले तरी 'कंपनी व्यावसायिक दृष्टीने चालण्याच्या दृष्टीने ' समर्थनीय नाही . कुठलाही ग्राहक हा त्या त्या कंपनीत कोण कोण व्यक्ती काम करतात हे पाहून कंपनीस प्राधान्य देत नसतो . त्याला हवी असते ती केवळ दर्जेदार सेवा .  केवळ सरकारी पैशाने रोजगार देण्याचे साधन म्हणजे सरकारी कंपन्या हा संकुचित दृष्टिकोनच सरकारी कंपन्यांच्या भवितव्यासाठी मारक असून तो खाजगीकरणास पूरक आहे .

  राहतो प्रश्न तो महावितरणचा . महावितरण किती ग्राहक हित जपते हे टाळेबंदीच्या काळातील अवाजवी -अव्यवहार्य  हजारो रुपयांच्या बिलांनी दाखवून दिलेले आहे . ६ महिने घर /दुकान  बंद असून देखील २५/३० हजार रुपये  आलेले बिल आधी भरावेच लागेल हीच आहे का महावितरणची 'ग्राहकहिताची ' परिभाषा ?. जी कंपनी गेली काही दशके हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात आहे त्या कंपनीचे मंत्रीच जर १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे स्वप्न पाहत असतील तर त्या महावितरणचे भविष्य काय असणार आहे हे सांगण्यास नक्कीच कोणा  भविष्य वेत्याची गरज नाही .

अव्यावसायिक दृष्टिकोनामुळेच "सरकारी कंपन्या"  नामशेष होण्याच्या मार्गावर !

        महावितरण असो की अन्य कुठलीही सरकारी कंपनी , तिचे भविष्य तेंव्हाच उज्वल असू शकते जेंव्हा ती कंपनी व्यावसायिक दृष्टीने चालवली जाईल , तिचा दर्जा हा मार्केटमधील स्पर्धेत टिकाव धरणारा  असेल . अन्यथा सरकारने कितीही ठरवले तरी तोट्यात चालणाऱ्या कंपन्या फार दिवस चालवल्या जाऊ शकत नाहीत . वर्तमान स्पर्धेच्या युगात तर नक्कीच नाही . वर्तमानातील ग्राहक हा अतिशय चोखंदळ व चंचल आहे . सेवेच्या बाबतीत समाधान झाले तरच तो त्या त्या कंपनीशी नाते जोडून ठेवतो , अन्यथा कुठल्याही भावनिक आहारी न जाता  तो सरळपणे त्या त्या कंपनीला  'राम -राम '   करण्यास मागे पुढे पाहत नाही 


सर्वच सरकारी कंपन्या या ग्राहकहित जपतात व सर्वच खाजगी कंपन्या या ग्राहकांची लूट करतात हे दोन्हीही विधान दिशाभूल करणारे आहे ,  सेवा देणाऱ्या कंपन्या या सरकारी असूदेत की  खाजगी , व्यावसायीक सत्य हेच  आहे की  भविष्यात " जे दर्जेदार सेवा देतील " तेच टिकतील .


सुधीर लक्ष्मीकांत दाणी , ९००४६१६२७२/९८६९२२६२७२  danisudhir@gmail.com

 


सोमवार, १० फेब्रुवारी, २०२०

बीएसएनएल -एमटीएनएलमधील "मेगा स्वेच्छानिवृत्ती " टेलिकॉम कंपन्यांचे पुनरुजीवन की टाळेबंदी ???




                      

       समस्या /रोगाच्या निदानासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे रोगाचे अचूक निदान . 
         अचूक निदान म्हणजे अर्धी लढाई जिंकणे एकदा का निदान अचूक झाले की पुढची पायरी असती ती म्हणजे समस्येच्या निराकारणासाठी समस्येच्या कारणांचे समूळ उच्चाटनासाठीची सुयोग्य 
उपाय योजनांची अंमलबजावणी  .
              पण ..... याचा अर्थ असाही होतो की , समस्येच्या कारणाचे निदानच चुकले तर मात्र त्यावरील
 उपचारासाठी केलेले उपाय म्हणजे " सगळे मुसळ केरात जाणे ". गेल्या काही दिवसात बीएसएनएल एमटीएनएल सेवांचा उडणारा बोजवारा पाहता , कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी "व्हीएसआरएस " नामक योजलेला उपाय म्हणजे "रोगापेक्षा इलाज भयाण " असे तर होणार नाही ना ? अशी शंका 
निर्माण होऊ लागलेली आहे . 

                केंद्र सरकारच्या अखत्यारीतील बीएसएनएल वएमटीएनएल या दोन पीएसयू  मधील " मेगा 
स्वेच्छा निवृत्तीयोजनेची अंलबजावणी  या घटनेचे भविष्यात टेलिकॉम ग्राहक    क्षेत्रावरील संभाव्य  परिणाम  या अनुषंगाने हा लेखप्रपंच .

                   बीएसएनएल  एमटीएनएल या देशात टेलिकॉम सेवांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सरकारी कंपन्या . देशाच्या कानाकोपऱ्यात आपली सेवा विस्तार असलेल्या कंपन्या . डिजिटल इंडियाची स्वप्नपूर्ती साठी अंत्यत महत्वाच्या अशा या टेलिकॉम कंपन्या .


     एमटीएनएलचे कार्यक्षेत्र हे दिल्ली -मुंबई या शहरांपुरते मर्यादित तर उर्वरित भारतात सर्वदूर बीएसएनएल या कंपनीचा दबदबा . कुठलेही नैसर्गिक संकट असले तरी या कंपन्यांची सेवा देशाच्या सेवेत  हजर असायची .  एकेकाळी टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या याच कंपन्या आज मात्र  संकटात सापडलेल्या दिसतात .

    आता  प्रश्न  हा आहे की , २००८ यामध्ये २१८ करोडचा  नफा असणारीजवळपास १४ लाख लँडलाईन , १० लाख मोबाईल्स   लाख ब्रॉडबँड असा ग्राहक बेस असणाऱ्या एमटीएनएल चे अस्तिव धोक्यात का आले ? संपूर्ण देशात सर्वाधिक ग्राहक विस्तार असणाऱ्या बीएसएनएल वर हि वेळ का आली ? नेमके कुठे चुकले , कोणाचे चुकले  काय चुकले ?  मेगा स्वेच्छानिवृत्ती हे पाऊल या दोन्ही कंपन्यांसाठी मारक ठरणार की तारक ? या दोन्ही कंपन्यांचे पुनरुजीवन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे हाच एकमेव मार्ग आहे कि त्याच बरोबर प्रशासनाने अन्य उपाय देखील तातडीने  योजण्याची गरज असणार आहे ?


वास्तव स्वीकारण्यास नकार :  पुनरुजीवनातील सर्वोच्च अडथळा :

          कुठलीही गोष्ट सुधारवायची असेल तर सर्वात महत्वाचे असणारी गोष्ट म्ह्णजे , " जमिनीवरील वास्तवाचा स्वीकार करणे , त्यासाठी कारणीभूत अशा गोष्टींचा साधक -बाधक विचार करणे  तदनंतर त्या वर मात करण्यासाठी अत्यंत  अभ्यासपूर्ण पद्धतीने  प्रामाणिकपणे वास्तवदर्शी  उपाययोजना आखणे  त्याची प्रामाणिक अमंलबजावणी करणे ".        

             सरकारी टेलिकॉम कंपन्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे प्रमुख  कारणे  म्हणजे टेलिकॉम क्षेत्रात  खाजगी कंपन्यांचा शिरकाव  त्यांनी कालसुसंगत तंत्रज्ञानात बदल करत ग्राहकांना आकर्षित करण्याचे योजलेले धोरण  सरकारी कंपन्यांना त्यात आलेले अपयश .

      आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे . बाजारात टिकवायचे असेल तर कालसुसंगत  ग्राहकाभिमुख  सेवा  गुणवत्तापूर्ण -दर्जेदार सेवा अनिवार्यच ठरतात .  आज खाजगी कंपन्या ४जी - जी ची भाषा करत असताना सरकारी कंपन्या मात्र अजूनही २जी -३जी च्या रेंज बाहेर पडताना दिसत नाहीत .

       सोशल मीडियाच्या प्रचंड वापरामुळे ग्राहकांना स्पीड महत्वाचा असतो , डेटा कॅपॅसिटी अधिकची लागते . दर्जेदार सेवांबरोबरच ग्राहकांना ती सेवा माफक दरात मिळावी हि अपेक्षा देखील असते . सरकारी कंपन्या या बाबतीत 'आऊट ऑफ रेंज ' असल्यामुळेच या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

रिव्हायवल  (पुनरुज्जीवन) दृष्टीक्षेपात पण वाट बिकटच .. :

               कुठल्याही स्वप्नपूर्तीसाठी सर्वात गरजेचे असते ते म्हणजे "स्वप्नपूर्तीचा दिशेने सुयोग्य नियोजन ". व्हीआरएस पश्चात ग्राहक केंद्रांना टाळे , मोबाईल सेवेचा उडालेला बोजवारा , बँका -सरकारी कार्यालयांच्या कामकाजात  नेटवर्क अभावी होणारा दीर्घकालीन व्यत्यय अशा बातम्या पाहता या दोन्ही कंपन्यांचे प्रशासन व्हीएआरएस पश्चात आवश्यक ती पर्यायी व्यवस्था करण्यात संपूर्णतः असफल झालेले दिसते . 

                        मान्य आहे की , या दोन्ही कंपन्यांसाठी हे स्थित्यंतराचा काळ आहे . पण त्याच बरोबर हे देखील ध्यानात घेणे अत्यंत गरजेचे आहे की ,  हाच काळ कंपनीची ग्राहकात प्रतिमा निर्मिती व संवर्धनासाठी  महत्वाचा असतो . त्यामुळेच प्रशासनाने एमटीएनएलच्या १४ हजार  बीएसएनएलच्या ७८ हजार कर्मचाऱयांना स्वेच्छानिवृत्ती एकाच टप्यात  देता ती वयानुसार टप्याटप्याने दिली असती तर ती सकारात्मक दुर्ष्टीने अधिक परिणामकारक ठरली असती .

दूरदृष्टीचा अभाव :
             कुठलीही पर्यायी व्यवस्था  करता , एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी कर्मचारी निवृत्त करणे हा पूर्णपणे अव्यवसायिक , अविचारी ,अतार्किक , जाणीवपूर्वक अपयशाकडे वाटचाल करणारा निर्णय ठरतो . खरे तर ,  ५० ते ६० या वयोगटातील सर्वच कर्मचाऱयांना एकत्रित व्हीआरएस  देता , ती ५८ ते ६० , ५५ ते ५८ , ५२ ते ५५  ५० ते ५२ अशी टप्याटप्याने राबवली असती तर कुठल्याच सेवा एकदम विस्कळीत झाल्या नसत्या . एकदमच कार्यालये मोठया प्रमाणात खाली झाल्यामुळे,  या कंपन्या चालू राहणार की सरकार त्या बंद करणार ?  अशी ग्राहकांच्या मनात साशंकता निर्माण झाली नसती . एकुणातच सरकारचा हा मेगा स्वेच्छानिवृत्ती निर्णय 'नोटबंदीच्या निर्णयाची पुनरावृत्ती वाटतो . सुज्ञास अधिक सांगणे  लगे !

           व्हीआरएस पश्चात / दिवसाच्या आतच कंत्राटी पद्धतीने कमर्चारी भरती साठीचे टेंडर काढून  कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती आणि म्हणून  कंपन्यांना तोटा होत होता हा प्रशासनाचा निष्कर्ष किती तकलादू आहे हे स्वतः प्रशासनच अधोरेखित करताना दिसते .

 पुनरुज्जीवन / रिव्हायवलसाठी  या  कारणांचे निराकारण आवश्यकच :

     प्रशासनात व्यवसायिक  दूरदृष्टीकोणाचा अभाव , कर्मचाऱ्यांची  अधिकाऱ्यांची 'आओ -जाओ घर तुम्हारा हि कार्यसंस्कृती  कार्यपद्धती , विविध कर्मचारी -अधिकारी संघटनांचा प्रशासनातील वाजवी हस्तक्षेप , अकुशल कर्मचाऱ्यांना वारंवार दिली जाणारी बढती , काम  पगाराचे व्यस्त प्रमाण , ग्राहकाभिमुक सेवेचा अभाव , ऑप्टिकल फायबर केबलचे वारंवार तुटणे  ती पूर्ववत होण्यास होणारा विलंब  त्यामुळे ग्राहकांच्या मनात कंपनी विषयी निर्माण होणारी नकारात्मक भूमिका , बीएसएनएल -एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे प्रशासन ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आहे ते गेली २० वर्षे डेपोटेशन वरच असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांमध्ये असणारा उत्तरदायित्वाचा अभाव , कालसुसंगत टेक्नॉलॉजीचे अपग्रेडेशन करण्यात प्रशासनाला आलेले अपयश  त्यासाठी सरकार कडून जाणीवपूर्वक केली जाणारी आडकाठी , इमारत दुरुस्तीवर पाण्यासारखा केला जाणारा खर्च , निधीचा नको त्या योजनांवर केलेला अपव्यय ,  महिला कर्मचाऱ्यांची केवळ  तासांची ड्युटी करण्याची मानसिकता  अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यास संघटनाच्या वा अन्य कारणांच्या माध्यमातून केली जाणारी अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी , संगणकाशी वैर असलेले  केवळ टाईम बाउंड प्रमोशन पद्धतीने मॅनेजर , उपप्रबंधक झालेले अधिकारी असे हनुमानाच्या शेपटी प्रमाणे लांबणारी यादी बीएसएनएल -एमटीएनएल च्या अधःपतनास कारणीभूत आहेत . सरकारला या दोन्ही कंपन्या प्रामाणिकपणे वाचवायच्या असतील उपरोक्त सर्व कारणांचे निराकारण करण्यासाठी योग्य प्रयन्त करणे निकडीचे आहेत .

... तर कायमस्वरूपी टाळेबंदी टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमा :
       बीएसएनल -एमटीएनएल प्रशासन  सरकारला वर उल्लेखित कारणे रास्त वाटत नसतील तर त्यांनी  तज्ज्ञांच्या माध्यमातून सरकारी टेलिकॉम  कंपन्यांच्या ऱ्हासाची कारणे  जाणून घ्यावीत .   टेलिकॉम कंपन्यांचे पुनर्रुजीवन बाबतचा  सरकार  प्रशासनाचा हेतू हा जर प्रामाणिक  शुद्ध असेल तर त्यांनी  कंपनीच्या अधःपतनास केवळ कर्मचाऱ्यांची संख्या कारणीभूत आहे या 'अंधश्रद्धेवर ' विसंबून  राहता,  त्रयस्त तज्ज्ञांची समिती स्थापन करून सर्व पायभूत सुविधा उपलब्ध असताना देखील या कंपन्यांना तोटा का होत गेला ? विविध सेवांचा दर्जा खालावत का केला , यासाठी अन्य प्रशासकीय कारणे कोणती याबाबतचा आढावा घेऊन तातडीने उपयोजना आखून त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करावी अन्यथा आगामी / वर्षातच या दोन्ही सरकारी टेलिकॉम कंपन्याचा वर्तमानातील  ग्राहक वर्ग 'आऊट ऑफ रेंज ' होऊन सरकारी टेलिकॉम कंपन्यांना कायमस्वरूपी टाळेबंदी निश्चित असेल.हे सांगण्यासाठी  कोणा भविष्यवेत्याची वा टेलिकॉम तज्ज्ञाची नक्कीच गरज असणार नाही .

सरकारचे पीएसयू बाबतीतील धोरण सुनिश्चित-समन्यायी  हवे    :  सरकारने एकदा  सार्वजनिक उपक्रमाबाबत  आपले धोरण  सुनिश्चित करणे गरजेचे वाटते . सरकार नफ्यातील पीएसयू जसे बीपीसीएल ची निर्गुंतवणूक करत आहे तर दुसरीकडे बीएसएनएल -एमटीएनएल या तोट्यातील पीएसयू साठी पुनरुजीवन प्लॅन जाहीर करत आहे .  सरकारने ,  बीएसएनएल -एमटीएनएल या टेलिकॉम कंपन्यांच्या पुनरुजीवनासाठी सरकारने ६९ हजार करोडचे पॅकेज जाहीर केलेले  आहे . सरकारचा हा प्रयत्न म्हणजे तोट्यात चालवणाऱ्या प्रशासन  कर्मचाऱयांच्या पाठीवर टाकलेली शाबासकीची थापच ठरते .

              अत्यंत महत्वाचा प्रश्न हा आहे की , या कंपन्या दिवाळखोरीत जातातच कशा ?  देशाची राजधानी दिल्ली   आर्थिक राजधानी मुंबई या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एमटीएनएल प्रशासनाला खरे तर सरकारने प्रश्न विचारवयास हवा की , देशातील  सर्वाधिक ग्राहक घनता असणाऱ्या ठिकाणी कंपनीचे कार्य मर्यादित असून देखील तोटा का ? सेवेचा दर्जा उत्तम का नाही ? तीच गत आहे , बीएसएनएल ची . संपूर्ण देशात इन्फ्रास्ट्रक्चर असताना  अन्य टेलिकॉम कंपन्यांच्या जन्माआधी स्थिरस्थावर  झालेली कंपनी असून देखील कंपनीची आर्थिक दुरावस्था का ?  खेदाची गोष्ट हि आहे की , सरकार जनतेच्या पैशातून अशा उपक्रमांना करोडो रुपये भविष्यात तरी पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी कुठलीही हमी  घेता देते  आहे .
            या सार्वजनिक उपक्रमांचे प्रशासन हे अती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असते , या अधिकाऱ्यांचा पगार दोन /अडीच लाख असतो , त्यांना  गाड्या -घोडया सर्वच सुविधा असतात तरी देखील सर्वच पीएसयू चा कारभार दिवाळखोरीत कसा याचे   उत्तर सरकारने शोधायला हवे .  देशांतर्गत पीएसयू च्या अधिकाऱ्यांना कंपनी तोट्यात घालण्याचे प्रशिक्षण देऊनच सेवेत घेतले जाते का ?

                   खरे तर देशातील सर्वच पीएसयूचा आर्थिक लेखाजोखा घेऊन , सर्वच पीएसयू बाबत समन्यायी भूमिका स्वीकारावी . सातत्याने तोट्यात चालणारे हे पांढरे हत्ती जनतेच्या  पैशातून  पोसण्याचा 'उद्योग ' सरकारने बंद करावा . 
    देशातील सर्वच पीएसयूचा 'आर्थिक इतिहास ' लक्षात घेऊन  देशाच्या भविष्याचा योग्य वेध घेत , सर्वच सार्वजनिक उपक्रमाच्या प्रशासनाला , योग्य प्रशासन करत आगामी / वर्षात त्यांची वाटचाल उलट्या दिशेने म्हणजेच आर्थिक तोट्यातून -सुदृढ आर्थिकतेकडे निर्देश द्यावेत . नव्हे तशी अटच घालावी .  ... प्रशासनाची वाटचाल त्या दृष्टीने होणार नसेल तर .. ... तर देशातील सर्वच आर्थिक दिवाळखोरीतील  पीएसयू  लिलावात काढा .
                                   सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर ,  नवी मुंबई .
danisudhir@gmail.com  9004 61 62 72
लेखक एमटीएनएल मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधिकारी आहेत )